दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी अनेकींची धावपळ असते ती घराला नवा लुक कसा देता येईल यासाठी. तुम्हीही तुमच्या घराच्या इंटीरियर डेकोरेशनमध्ये बदल करण्याच्या विचारात आहात का? किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या घरात शिफ्ट होणार आहात का. जर तुम्हालाही घर कसं सजवायचं याबाबत काळजी वाटत असेल आणि इंटीरियरवरही जास्त खर्च करायचा नसेल तर वाचा या टिप्स. या आहेत काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या वापरून तुम्ही तुमचं घर सजवू शकता आणि सजवताना जास्त डोकेदुखीही होणार नाही.
आपल्याला नेहमीच हा प्रश्न पडतो की, घर कसं सजवावं आणि कोणतं सामान कुठे ठेवावं. घराचं इंटिरियर करताना या गोष्टीही लक्षात घेणं आवश्यक आहे की, काय टाळावं. आज आम्ही तुम्हाला काही चुकांबद्दलही सांगणार आहोत ज्या आपण बरेचदा घर सजवताना करतो. मग ते ड्रॉईंग रूम सजवण्याबाबत असो वा बेडरूमबाबत. या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे की, घर कसं सुंदर दिसेल.
Also Read Vastu Tips For Home In Marathi
- इंटीरियर डेकोरेशनसाठी सर्वात जास्त आवश्यक गोष्ट आहे की, घरातील जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल आणि सर्व सामान व्यवस्थित कसं ठेवता येईल.
- इंटीरियर डेकोरेशनसाठी सर्वात आधी कोणतंही सामान खरेदी करताना त्याचं माप घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे ते खोलीत नीट फिट होईल. मग सर्वात आधी एक छोटासा नकाशा तयार करा. म्हणजे फर्निचर खरेदी केल्यावर ते सेट करण्यात प्रोब्लेम येणार नाही.
- इंटीरियर डेकोरेशनमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असतात ते लाईट्स. त्यामुळे ही गोष्टी आधी ठरवा की, घरातील लाईट्स कसे असले पाहिजेत. घरातील उजेडाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे लाईट्सचं सेटींग करा. ज्यामुळे नंतर ते बदलावं लागणार नाही. कारण एकदा लाईट्स सेट केले की, ते पुन्हा बदलणं कटकटीचं ठरतं.
- इंटीरियर डेकोरेशन करताना ही गोष्ट लक्षात घ्या की, जास्त छोट्या छोट्या वस्तूंनी घर सजवू नका. कारण नंतर जास्त छोट्या सामानामुळेही रूम भरलेली वाटते. ज्यामुळे त्याचा लुक खुलून येत नाही.
- खिडक्यांना कधीही गडद रंगाचे पडदे लावू नका. ज्यामुळे तुमच्या घरात अंधार वाटेल आणि घरही लहान वाटेल.
- जर तुम्ही हॉलमध्ये किंवा इतर खोल्यांमध्ये पेटिंग लावू इच्छिता. तर या गोष्टींकडे लक्ष द्या की, ते जास्त उंचीवर लावू नका. तसंच पेटिंग्ज खरेदी करण्याआधी त्याची योग्य जागा ठरवून घ्या.
- तसंच लक्षात घ्या की, सर्व सजावट एकाच रूमपुरती करू नका. याउलट त्या रूमच्या साईजनुसार आणि गरजेनुसार वस्तूंनी ती सजवा.
- इंटीरियर डेकोरेशनमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे घरातील टाईल्स. त्यामुळे याकडेही आवर्जून लक्ष द्या. शक्य असल्यास पिवळ्या टाईल्स ऐवजी ग्रे किंवा पांढऱ्या टाईल्स लावा.
जाणून घ्या कसं असावं देवघर (Vastu Shastra Tips For Pooja Room In Marathi)
मग पुढच्या वेळी घरात इंटीरियर करण्याआधी आणि घरासाठी नवीन गोष्टी विकत घेताना वरील गोष्टींची नक्की काळजी घ्या.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
वास्तुशास्त्रानुसार घरात असावेत हे पाळीव प्राणी
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स