स्वयंपाकघरामध्ये सर्वात कठीण काम बऱ्याच जणांना जर कोणतं वाटत असेल तर ते पोळ्या अर्थात चपाती करणं. कारण चपाती ही सर्वस्वी तुम्ही कणीक कशी भिजवता त्यावर अवलंबून असते. काही जणांच्या पोळ्या चिवट होतात तर कधी कधी तव्यालाच चिकटतात. कितीही वर्ष कणीक भिजवली तरीही नक्की त्याचं प्रमाण किती आणि कसं हे बऱ्याच जणांना कळत नाही. विशेषतः जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी आम्ही खास टिप्स देत आहोत. तुम्हाला घरच्या घरी चपातीची कणीक नीट भिजवायला शिकायचं असेल तर अर्थात तुमची आई तर तुम्हाला शिकवलेच. पण जर आई किंवा कोणी शिकवणारं नसेल तर तुम्ही या टिप्स लक्षात घेऊन कणीक कशी भिजवायची आणि त्याचा चपाती मऊ होण्यासाठी कसा उपयोग होतो ते जाणून घ्या.
फाटलेल्या दुधाचे पनीरच नाही तर येणारे पाणीही आहे फायदेशीर
कणीक कशी भिजवायची
Shutterstock
मुळात कणीक कशी भिजवायची असा लेख का असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण बेसिक अर्थात कशी भिजवायची ही पद्धत सगळ्यांनाच माहीत असते. गव्हाच्या पिठात पाणी, मीठ घालून कणीक भिजवायची हा साधासुधा नियम. पण असं जरी असलं तरीही तुम्हाला जर मऊ पोळ्या (चपाती) हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यायलाचं हवं.
- कणीक भिजवताना गव्हाचं पीठ हे परातीमध्ये काढून घ्या
- 2 कप गव्हाचे पीठ असेल तर त्यात 3 लहान चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ घाला
- हे आधी नीट मिक्स करून घ्या. लगेच पाणी ओतू नका. तेल आणि मीठ गव्हाच्या पिठात व्यवस्थित मिक्स होऊ द्या
पटकन भांडभर पाणी ओतू नका. अंदाजानुसार पाणी हळूहळू घाला आणि मीठ मळायला सुरूवात करा - पीठ अतिशय घट्ट अथवा मऊ असं अजिबातच भिजवू नका. ना पातळ ना घट्ट असं मध्यम स्वरूपाची कणीक भिजायला हवी
- कणीक भिजवून झाल्यावर वरून पुन्हा साधारण 2 चमचे तेल घ्या आणि कणीक नीट मळून घ्या
- ही मळलेली कणीक किमान अर्धा तास तरी तुम्ही तिंबू द्या
- कणीक नीट तिंबली तरच चपाती मऊसर होऊ शकते हे तुम्ही लक्षात घ्या
- चपाती करायला घेताना जेव्हा तुम्ही गोळे कराल तेव्हा तो गोळा करायच्या आधी पुन्हा एकदा कणीक नीट मळून घ्या. म्हणजे पोळ्या छान फुगायला मदत होते
- नेहमी कणीक भिजवणाऱ्यांनाही या टिप्स लक्षात घ्यायला हरकत नाही. या कणकेच्या पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होतात. तसंच तुम्हाला लाटतानाही त्याचा त्रास होत नाही.
शुगर फ्री (Suger Free) मिठाई करा आता घरच्या घरी
फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर अजिबात करू नका
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेऊ नका. फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर अजिबातच करू नका. कारण आरोग्य तज्ज्ञांच्या मते मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवली तर फ्रिजमधील हानिकारक किरणांमुळे त्यातील पोषक तत्व ही पूर्णतः नष्ट होतात आणि तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा मिळत नाही. दुसरं कारण म्हणजे फ्रिजमधील कणीक पोळी करण्यासाठी योग्यही नसते. ती अधिक प्रमाणात फ्रिजच्या थंडाव्यामुळे चिकट होते. त्यामुळे कधीही कणीक आधी भिजवून फ्रिजमध्ये ठेऊ नका. कोणत्याही दृष्टीने असं करणं योग्य नाही. वरील टिप्स लक्षात ठेऊन तुम्ही कधीही आता चपात्यांची कणीक पटकन भिजवू शकता. तुम्हाला कदाचित हे तंत्र जमायला एक आठवडा लागेल. पण प्रयत्न करत राहा. एका आठवड्यानंतर तुम्हाला ही कणीक अगदी योग्य प्रकारे भिजवता येऊन मऊ चपाताही बनवता येईल.
गोल आणि मऊ पोळ्या (चपात्या) बनवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा