केस कापायचे असतील तर ते नेहमी पार्लरमध्ये जाऊनच तज्ज्ञांकडून कापून घ्यावेत असं सांगितलं जातं आणि बऱ्याचदा आपण ते करतोही. पण कधी कधी आपल्याकडे अजिबात वेळ नसतो आणि केसांनाही ट्रिमिंगची गरज असते. मग अशावेळी काय करायचं असा प्रश्न पडतो. पण तुम्ही घरच्या घरी स्वतःच स्वतःचे केस ट्रिम करू शकता. पण आता ते कसे करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू. केस ट्रिम करणं सोपं आहे. याच्या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. पार्लरला जाण्यासाठी अजिबात वेळ नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी केस ट्रिम करून घेऊ शकता. यासाठी नक्की काय करायचं याची अगदी स्टेप बाय स्टेप माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. जाणून घेऊया.
सुरूवात करा केस ओले करून
Shutterstock
पार्लरमध्ये जाण्याआधी तुम्ही जसे केस धुता तसंच तुम्ही घरीही केस ट्रिम करायचे असतील तर आधी केस स्वच्छ धुऊन घ्या. केसांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. केसांना शँपू लावा आणि मग टॉवेलने स्वच्छ पुसून वाळू द्या. लक्षात ठेवा की, केस पूर्ण सुकू देऊ नका. थोडेसे ओले राहू द्या. ओल्या केसांवरच हलक्या हाताने ब्रश फिरवून केसांमधील गुंता सोडवून घ्या आणि मग व्यवस्थित विंचरून एका सरळ रेषेत केस करून ठेवा.
मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी
केसांना विभागून घ्या
केसांना ब्रश केल्यानंतर केसांना तीन ते चार विभागात विभागून घ्या. ज्यामुळे ट्रिमिंग करणे जास्त सोपं होतं. ट्रिमिंग करताना सेक्शननुसार अर्थात विभागानुसारच करावे लागते. तुम्ही अगदी पार्लरमध्येही हा अनुभव घेतला असेल. प्रत्येक सेक्शन नंतर क्लॉ क्लिप लाऊन व्यवस्थित सिक्युर करून घ्या. जेणेकरून केसांची लांबी कळून येईल.
केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
लांबी ठरवा
Freepik.com
आता विभाग करून झाल्यानंतर तुम्हाला केसांची किती लांबी कमी करायची आहे याचा आधी विचार करून घ्या. साधारण एक, दोन अथवा तीन इंच लांबी कमी करायची की नाही याचा मनाशी विचार पक्का करा. विचार झाल्यावर सर्वात पहिले समोरच्या पहिल्या विभागाचे केस सोडा आणि मग केस दोन बोटांमध्ये पकडून खालचे केस कापायला सुरुवात करा. किती लांबी ठरवली आहे त्यानुसार केस ट्रिम करा.
इतर भागांच्या बाजूलाही असेच करा
पहिल्या सेक्शननुसार तुम्ही इतर भाग केले असतील तर तिथेही अशाच प्रकारे पहिल्या भागानुसार तितक्याच लांबीचे केस अंदाज घेऊन कापा. सर्व बाजूचे केस अशाच पद्धतीने तुम्ही ट्रिम करा. मात्र हे करत असताना तुम्ही योग्य लांबीचा वापर करत आहात की नाही हे एकदा आरशात तपासायला विसरू नका.
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
केस योग्य कापले जात आहेत की नाही ते पाहा
चारही भागाचे केस कापल्यानंतर केस योग्य कापले आहेत की नाही, कुठे लहान किंवा कुठे मोठे राहिलेत की नाही याचा तपास करा. त्यासाठी केसांमध्ये ब्रश फिरवा आणि वेगवेगळा भांग पाडून केसांच्या लांबीचा अंदाज घ्या. एखादी बट मोठी राहिली नाही ना याचीही शहानिशा करून घ्या. अन्यथा केस बांधताना अथवा सोडल्यावर विचित्र दिसू शकतात. जर नीट कापले गेले नसतील तर व्यवस्थित फायनल टच द्या आणि बस तुम्हाला हवे तसे केस ट्रिम करून झालेले तुम्हाला दिसतील.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक