Diet

फळं खाताना ‘या’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

Trupti Paradkar  |  Sep 17, 2019
फळं खाताना ‘या’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा

फळं आरोग्यासाठी गरजेची असतात. कारण फळांमधून तुमच्या शरीराला योग्य पोषकतत्वं मिळत असतात. यासाठी दररोज एकतरी फळ खायलाच हवं.  मात्र फळं कधी आणि कशी खावीत हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही फळं खाताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होतं. यासाठी फळं खाण्याची योग्य पद्धत आणि फळे कधी खाणं योग्य ते जरूर वाचा. 

फळं केव्हा खावी

फळांचा योग्य फायदा शरीराला मिळण्यासाठी ते खाण्याची योग्य वेळ जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या मते फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. म्हणजेच सकाळी उठल्यावर आणि दुपारच्या जेवणानंतर तीन ते चार तासांनी म्हणजेच संध्याकाळी फळे खावी. मात्र अनेकांना ही गोष्ट माहीतच नसते. त्यामुळे जेवणानंतर ते फळे खातात. जर तुम्ही जेवणानंतर फळं खाल्ली तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर चुकीचा होतो. तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी यामुळे वाढते जे शरीरासाठी मुळीच चांगले नाही. यासाठीच जेवणाआधी फळं खावीत जेवणानंतर फळं खाऊ नयेत.

हेल्दी स्वीटनर इन मराठी बद्दलही वाचा

Shutterstock

रिकाम्यापोटी फळं खाण्याने काय फायदा होतो

जर तुम्ही रिकाम्यापोटी फळे खाल्ली तर त्याचे पचन योग्य पद्धतीने आणि जलद होते. फळे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करत असतात. शिवाय फळांमुळे तुमच्या शारीरिक क्रिया सुरळीत सुरू राहतात. तुमचे वजन कमी होण्यासाठी शरीराला लागणारी पुरेशी ऊर्जा तुम्हाला या फळांमधून मिळू शकते. 

फळं आहारातील सर्वात महत्त्चाचा घटक

निसर्गात विविध आकाराची, रंगाची, चवीची आणि सुंगध असलेली फळं असतात. सिझनल फळांचा आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळते. यासाठीच जेव्हा तुम्ही जेवणाआधी फळे खाता तेव्हा फळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. याचे प्रमुख कारण म्हणजे फळांमध्ये पुरेसे फायबर्स असतात. फळे आणि अन्नाचे फर्मेंटेशन झाल्यामुळे तुमच्या पोटातील पाचकरस सक्रिय होतो. ज्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. मात्र जर तुम्ही जेवणानंतर फळे खाल्ली तर ही क्रिया व्यवस्थित होत नाही आणि अन्नाचे पचनही नीट होत नाही. 

Shutterstock

फळांमुळे अपचनाचा त्रास होत नाही

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी फळे खाता तेव्हा तुमचे पोट फार काळ रिकामे राहात नाही. कारण पोटात गॅस अथवा अॅसिडिटी तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही बराच वेळ उपाशी राहता. यासाठी सकाळी उठल्यावर आणि दोन जेवणाच्या मध्ये फळे खा. 

आंबट फळांमुळे अॅसिडिटी होत नाही

अनेक लोकांना असं वाटत असतं की आंबटपणा आणि अॅसिडिटीचा जवळचा संबंध असतो. यासाठी ते संत्री, लिंबू, अननस अशा आंबट चवीची लिंबूवर्गीय फळे खात नाहीत. मात्र हा एक खूप मोठा गैरसमज आहे. कारण आहाराशास्त्राच्या मते तुमच्या शरीराला या फळांची गरज असते. 

फळं अख्खी खावीत की फळांचा रस प्यावा

फळं चावून खावीत की त्याचा रस करून प्यावा हा प्रश्न अनेकांना पडतो. वास्तविक फळे अख्खी चावून खाण्यामुळे त्यातील फायबर्स पोटात जातात. ज्यामुळे ती  तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. मात्र जर तुम्हाला फळांचा रस पिणे आवडत असेल तर घरी तयार केलेला, साखरेचा वापर कमी केलेला ताजा रसच प्या. बाजारात तयार मिळणारा, पॅक्ड बॉटल मधील रस मुळीच पिऊ नका. कारण त्यावर टिकण्यासाठी  प्रकिया केलेली असते ज्याचा तुमच्या शरीराला काहीच चांगला फायदा होत नाही. याचप्रमाणे फळांना अन्नपदार्थ तयार करण्यासाठी गरम करून मग खाऊ नका. अशा पद्धतीने फळे शिजवल्यामुळे त्यातील पोषकतत्वं कमी झालेली असतात. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा

हेल्दी राहण्यासाठी साखरेऐवजी ‘या’ नैसर्गिक गोड पदार्थांचा करा वापर

जेवणानंतर दुपारी झोपण्याआधी जाणून घ्या त्याची योग्य पद्धत

हे फायदे वाचाल तर रोज प्याल ‘गवती चहा’

Read More From Diet