आयुष्यात सुखसमृद्धी मिळवण्यासाठी पुरेसा पैसा कमवणं गरजेचं आहे. कारण कधी कोणाला किती पैशांची गरज लागेल हे सांगता येणार नाही. त्यमुळे तरूण वयातच बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय प्रत्येकाला असायला हवी. पैशांचे व्यवहार करताना अनेक अशा चुका होतात की त्याचा आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. यासाठी सावधपणे आर्थिक व्यवहार करायला हवेत. गुंतवणूक करताना तुम्ही कुठे, किती वेळासाठी पैसे गुंतवत आहात याचा नीट विचार करायला हवा. कधी कधी अशा काही आर्थिक चुका माणसाच्या हातून घडतात. ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो.
#MoneyTips : या सोप्या ideas ने वाचवा तुमचे पैसे (Tips To Save Money In Marathi)
पैशांचे नीट नियोजन न करणे
पैसे साठवणे आणि गुंतवणूक करणे सोपे काम नाही. म्हणूनच याचे नीट नियोजन करायला हवे. तुमचे भविष्यात काय ध्येय आहे यानुसार तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन करायला हवे. लग्न, मुलाचं प्लॅनिंग, वेकेशन्स, घर, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, निवृत्ती अशा आयुष्यातील विविध टप्प्यांसाठी तुम्ही वेगवेगळे आर्थिक नियोजन करायला हवं. त्यामुळे जर तुम्ही हे नियोजन नीट नाही केलं तर तुम्हाला उतारवयात आर्थिक चणचण जाणवू शकते.
असा सुरू करा घरगुती व्यवसाय, सहज सोप्या कल्पना (Home Business Ideas in Marathi)
गुंतवणूक करण्यासाठी उत्पन्न वाढण्याची वाट पाहणे
पगार अथवा उत्पन्न कितीही असलं तरी ते तुम्हाला पुरू शकत नाही. कारण जस जसे तुमचे उत्पन्न वाढते तस तशा तुमच्या गरजा वाढू लागतात. त्यामुळे तुमच्या जीवनातील इतर गरजा भागवण्यात तुमचे सर्व पैसे खर्च होऊ शकतात. काही तरूण मंडळी त्यांना उत्पन्न कमी मिळते म्हणून गुंतवणूक करणे टाळतात. मात्र असं केलं तर तुम्हाला तुमच्या उतार वयात आश्चर्यकारक फायदे मिळू शकत नाहीत. यासाठी तुमचा पगार अथवा उत्पन्न जितकं असेल त्याच्या कमीत कमी दहा टक्के भाग हा बचत आणि गुंतवणूकीसाठी ठेवा. यासाठी तुमच्या गरजा कमी करा ज्यामुळे जास्त पैसे खर्च होणार नाहीत.
पीएफमधील पैसे काढणे
नोकरदारांच्या पीएफ अकाउंटमध्ये पीएफचे पैसे दर महिन्याला जमा होत असतात. जर तुम्ही निवृत्तीनंतर पीएफमधील पैसे घेतले तर तुम्हाला त्यातून जास्त परतावा मिळू शकतो. मात्र अनेक जण नवीन नोकरी लागताच जुन्या नोकरीमधील पीएफचे पैसे घेतात आणि खर्च करतात. असं करणं खूप मोठी आर्थिक चूक ठरू शकते. कारण तुम्ही तुमचा सेवानिवृत्तीचा निधी तरूण वयातच खर्च करता. याची जाणिव तुम्हाला उतार वयात होते पण तेव्हा फार उशीर झालेला असतो.
लाईफ इन्सुरन्स अथवा मेडिकल इन्शुरन्स नसणे
लाईफ इन्सुरन्स अथवा मेडिकल इन्सुरन्स नसणे अथवा खूप कमी संरक्षण असलेला इन्सुरन्स घेणे ही एक आर्थिक चूक ठरू शकते. कारण जर तुम्ही योग्य विमा संरक्षण घेतले नाही तर तुमचे पैसे विनाकारण उपचार अथवा इतर गोष्टींवर खर्च होतात. या उलट तुम्ही जेव्हा दर महिन्याला ठरविक रक्कम इन्शुरन्ससाठी देता त्यामुळे तुमचे महिन्याला थोडे पैसे खर्च होतात मात्र गरजेच्यावेळी तुम्हाला पैशांची चिंता सतावत नाही. त्यामुळे स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी एवढे पैसे प्रत्येकाने खर्च करायलाच हवे.
आपात्कालीन निधी न साठवणे
प्रत्येकाला आयुष्यात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. म्हणूनच प्रत्येकाकडे पुरेसा आपात्कालीन निधी असणे गरजेचं आहे. नोकरीत झालेले बदल, आजारपण अशा गोष्टींमुळे कधीही जास्त पैशांची गरज तुम्हाला लागू शकते. यासाठी शक्य असेल तितके पैसे वेळीच बचत करून ठेवा. यासाठी खर्च आणि गुंतवणूकीबरोबर उत्पन्नातील एक भाग छोटी बचत म्हणून करा. जे पैसे तुम्ही वेळ लागेल तेव्हा पटकन खर्च करू शकता.
आर्थिक शिक्षण घेण्याचा कंटाळा करणे
प्रत्येक माणसाला योग्य आर्थिक शिक्षण असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कष्ट करून कमवलेले पैसे योग्य ठिकाणी बचत आणि गुंतवणूक करून तुम्ही त्यात वाढ करू शकता. मात्र आर्थिक शिक्षण घेण्याचा अनेकांना कंटाळा येतो. जर तुम्ही योग्य वयात आर्थिक शिक्षण मिळवलं तर भविष्यात तुमच्याकडून आर्थिक चुका कमी होतील आणि तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी योग्य निर्णय घ्याल.
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar