Celebrity Make Up

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

Trupti Paradkar  |  May 2, 2019
तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

मेकअप करणं  ही एक कला आहे. कारण मेकअपमुळे तुमचा लुक जसा चांगला दिसू शकतो तसा बिघडूदेखील शकतो. चांगला मेकअप करण्यासाठी मेकअप किटमध्ये चांगले मेकअप ब्रशदेखील असणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याचजणी एखाद्या कॉमन ब्रशने अथवा हाताने मेकअप करतात. निरनिराळ्या मेकअप उत्पादनासाठी निरनिराळ्या मेकअप ब्रशची गरज असते. मेकअपसाठी बाजारात अनेक ब्रश विकत मिळतात. बेसिक मेकअपसाठी हे सर्व ब्रश घेण्याची मुळीच गरज नाही. मात्र 5 बेसिक मेकअप ब्रश किट्स असायलाच हवे. बाजारात गेल्यावर विविध ब्रश पाहून तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आम्ही तुम्हाला बेसिक मेकअप ब्रशविषयी सविस्तर माहिती देत आहोत ही माहिती तुम्हाला योग्य मेकअप ब्रश खरेदी करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडू शकते.

वैवाहिक प्रवेश कल्पना देखील वाचा

फांऊडेशन ब्रश

मेकअप करताना फाऊंडेशन लावणं ही एक महत्त्वाची स्टेप असते. जर तुमचं फाऊंडेशन योग्य पद्धतीने मर्ज झालं तरच तुमच्या चेहऱ्याचा टोन व्यवस्थित दिसतं. यासाठी फाऊंडेशन नेहमी फाऊंडेशन ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर स्प्रेड करा. हाताने फाऊंडेशन लावल्यामुळे ते व्यवस्थित पसरत नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर फाऊंडेशनचे पॅच दिसतात.

Read More: Easy Eye Makeup Tips In Marathi

आय लायनर ब्रश

आजकाल आयलायनर विविध पद्धतीने लावण्याची फॅशन आहे. नॅचरल स्टाईल, कॅट स्टाईल, विंग्ड स्टाईल, डबल विंग़्ड स्टाईल, फंकी स्टाईल असे अनेक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. आय लायनरचे इतके वेगवेगळे प्रकार लावण्यासाठी योग्य ब्रशची नक्कीच गरज असते. यासाठीच तुमच्या मेकअप किटमध्ये आय लायनर  ब्रश हा असालाच हवा. ज्यामुळे तुम्ही विविध कार्यक्रमांसाठी विविध प्रकारच्या आय लायनर स्टाईलची फॅशन करू शकता.

आय शॅडो ब्रश

चेहऱ्यामधील सर्वात लक्षवेधक गोष्ट म्हणजे तुमचे डोळे. डोळ्यांच्या मेकअप मुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना अधिक सुंदर करायचं असेल तर त्यासाठी आयशॅडो लावणं फार गरजेचं आहे. विविध लुकसाठी विविध प्रकारच्या आणि शेडच्या आय शॅडो बाजारात उपलब्ध असतात. मात्र त्या उत्तमरित्या लावण्यसाठी तुमच्याकडे योग्य पद्धतीचा आय शॅडो ब्रश असणं गरजेचं आहे.

वाचा – घरी मेकअप कसे करावे

ब्लशर ब्रश

ब्रशर लावल्यामुळे तुमचे चिकबोन्स उठून दिसतात ज्यामुळे तुमचा लुक सडपातळ दिसू शकतो. तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार मेकअप करताना तुम्हाला तुमचे चिकबोन्स उठावदार करावे लागतात अथवा झाकावे लागतात. यासाठी तुमच्याकडे ब्लशर ब्रश असायला हवा.

लिप ब्रश    

मेकअपमधील सर्वात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप म्हणजे लिपस्टिक लावणं. प्रत्येक स्त्रीसाठी लिपस्टिक हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. घराबाहेर जाताना, ऑफिसमध्ये जाताना अथवा  एखाद्या खास प्रसंगासाठी तयार होताना अशी नेहमीच तुम्हाला लिपस्टिक लावण्याची गरज पडते. लिपस्टिक लावल्यावर ओठ सुंदर दिसतात पण जर ती व्यवस्थित लावली असेल तरच. न्यूडपासून ते अगदी डार्क कलरपर्यंतच्या लिपस्टिक तुम्हाला लावायच्या असतात. लिपस्टिक योग्य पद्धतीने लावण्यासाठी  लिप ब्रशचा वापर जरूर करा. कारण लिप ब्रशमुळे लिपस्टिक व्यवस्थित लावली जाते आणि अशा पद्धतीने लावलेल्या लिपस्टिकमुळे ओठ फार सुंदर दिसतात.

नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल

नववधूचे रुप खुलवणाऱ्या एअरब्रश मेकअप

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Celebrity Make Up