लग्न म्हटलं की घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. लग्नात तर धमाल आपण करतोच. पण लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरीसाठी काही विशिष्ट खेळही आपण योजतो. लग्नाचे विधी झाल्यानंतर जर अरेंज मॅरेज असेल तर दोघांना जवळ आणण्यासाठी आणि अधिक जाणून घेण्यासाठी बरेचदा असेल खेळ घरात आयोजित केले जातात. असे कोणते गेम्स अधिक खेळता येतील आणि धमाल करता येईल हे आपण या लेखातून जाणून घेऊया. आपलं लग्न कायम लक्षात राहायल हवं असेल तर असे काही गेम्स खेळायलाच हवेत. यातील काही गेम्स तर तुम्ही नक्कीच हिंदी चित्रपटांमध्येही पाहिले असतील. असेच काही मजेशीर आणि धमाल गेम्स तुम्हाला आणतील लग्नात अधिक मजा!
वर की वधू?
लग्नात आलेल्या पाहुण्यांना काही कार्ड बोर्ड्स द्या. एका कार्डवर लिहिले असेल वर आणि दुसऱ्यावर वधू. अथवा या कार्डबोर्डावर वर आणि वधूचे काही विचित्र चेहरा असणारे फोटो तुम्ही चिकटवू शकता. आलेल्या पाहुण्यांना या दोघांबाबतही प्रश्न विचारायचे आणि त्यावर त्यांनी मजेशीर उत्तरे द्यायची. अर्थात हे प्रश्नही तसेच मजेशीर असायला हवेत. यामुळे नक्की नवऱ्याचा स्वभाव कसा आहे आणि नवरी कशी वागते याचा अंदाज येतो. माहेरच्या आणि सासरच्या मंडळींनाही एकमेकांबरोबर अधिक ओळख वाढवता येते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी हा अप्रतिम खेळ आहे. याशिवाय वधू आणि वराच्या सवयीही यातून कळतात.
लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी
पेपर डान्स
हा तर अगदी मजेशीर खेळ आहे. यामुळे सर्वांसमोर नव्या नवऱ्या बायकोला अधिक जवळ यायचे असते. नव्या नवरीचे लाजणे आणि तिला चिडवणे हे यातून सहज शक्य आहे. नवरा नवरी आणि इतर जोड्यांना कागदाची एक मोठी शीट दिली जाते. त्यानंतर त्या कागदावर गाणे चालू असताना नाचायचे. म्युझिक बंद झाले की त्याची घडी करायची आणि मग तितक्याच घडीवर दोघांनी नाचायचे असे अगदी कागदाची अगदी बारीक घडी होईपर्यंत करायचे असते. शेवटी अशी वेळ येते की, केवळ एकच माणूस त्या घडीवर उभा राहू शकतो. मग नवऱ्याला नवरीला उचलून घ्यावेच लागते. त्यामुळे हा मजेशीर खेळ खेळताना खूपच धमाल येते.
लग्नासाठी निवडा अशा प्रकारे दागिने, काही सोप्या टिप्स
मिठाईची स्पर्धा
या खेळामध्ये नवरा आणि नवरीला एक विशिष्ट वेळ दिली जाते. या वेळामध्ये त्यांच्यासमोर लग्नातील पक्वान्न समोर ठेवण्यात येते. हा खेळ मिठाई आवडणाऱ्यांसाठी तर पर्वणीच आहे. बऱ्याचदा नवरा आणि नवरीला लग्नात काहीच खाणे चाखायला मिळत नाही. शिवाय आयुष्याची ही नवी सुरूवात असते. त्यामुळे गोड सुरूवात करायलाच हवी.
साडी नेसविण्याची स्पर्धा
मुलाकडील आणि मुलीकडील मंडळींमध्ये अगदी नवरा आणि नवरीसह साडी नेसविण्याची स्पर्धा असा एक खेळ लग्नानंतरच्या विधीमध्ये अधिक धमाल आणू शकतो. मुलांनी मुलींना साडी नेसवणे हा एक धमाल खेळ होतो. एका विशिष्ट वेळेत कोण आपल्या पत्नीला व्यवस्थित साडी नेसवतो हे पाहणं मजेशीर ठरतं. कमीत कमी वेळामध्ये चांगली साडी नेसविणाऱ्याला काहीतरी मस्त बक्षीस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण तुम्हाला दोन्ही कुटुंबाला एकत्र आणायचे असेल आणि नवरा आणि नवरीचे अवघडलेपण दूर करायचे असेल तर नक्कीच हा खेळ तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
लग्न करण्याआधी जोडीदाराकडून घ्या गोष्टीची खात्री
चपलांचा मजेशीर खेळ
एकमेकांकडे पाठ करून आपल्या हातात जोडीदाराची चप्पल घेऊन जोड्याने खुर्चीवर बसायचे आणि तिथे उपस्थित असणाऱ्यांनी एकमेकांबद्दल त्यांना प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ सर्वात जास्त रागीट कोण आहे? यावर जोडीपैकी ज्याला समोरची व्यक्ती वाटते त्याने चप्पल उंचावून सांगायचे. पण एकमेकांकडे पाठ असल्याने दोघांनाही एकमेकांविषयी नक्कीच कळणार नाही. यातच या खेळाची मजा आहे. तुम्ही एकमेकांना किती ओळखता हे यातून कळते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From Planning
उन्हाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडा ही थंड हवेची ठिकाणं
Trupti Paradkar