DIY सौंदर्य

चमकदार त्वचेसाठी वापरा गुळवेल, असा बनवा फेसमास्क

Dipali Naphade  |  Jan 12, 2022
giloy-face-mask-benefits-for-glowing-skin

गुळवेलचा आरोग्यासाठी खूप फायदा (Benefits of Giloy) होतो. विशेषतः कोरोनाकाळात तर गुळवेलचा वापर वाढला आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (immunity system) गुळवेलचा वापर करण्यात येतो. पण गुळवेलचा फायदा तुमच्या त्वचेसाठीही होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? गुळवेलचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स अर्थात मुरूमांची समस्या, फाईन लाईन्स, डाग आणि अँटीएजिंग समस्या दूर होण्यास मदत मिळते. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही गुळवेलचा वापर करू शकता. नक्की याचा वापर कसा करायचा आणि गुळवेलचे फेसमास्क (Giloy Face Mask) कसे बनवायचे हे आपण या लेखातून पाहूया. तुम्हीही तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार करण्यासाठी याचा वापर नक्कीच करू शकता. 

मध आणि गुळवेल (Honey and Giloy)

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशीर समजण्यात येते. मध त्वचेला हायड्रेट करण्यासाठी मदत करते. मध आणि गुळवेलाचा त्वचेसाठी वापर केल्यास, त्वचा अधिक चमकदार आणि तरूण दिसण्यास मदत होते. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी गुळवेल पावडरची पेस्ट बनवून तुम्ही वाप करा. या पेस्टमध्ये मध आणि गुलाबपाणी मिक्स करा. त्यानंतर तयार करण्यात आलेला हा फेसमास्क तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही या फेसमास्कचा वापर करू शकता. यामुळे तुम्ही अधिक तरूण दिसता आणि त्वचेवरील चमक टिकून राहाते. 

गुळवेलाच्या दाण्यांचा करा वापर 

त्वचेवरील अलर्जी अथवा एक्झिमा दूर करण्यासाठी गुळवेलाचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. एक्झिमा ठीक करण्यासाठी गुळवेलाच्या दाण्यांचा वापर तुम्ही करू शकता. या दाण्यांची पेस्ट तुम्ही वाटून तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर ही पेस्ट अशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे केवळ एक्झिमाच ठीक होणार नाही तर तुम्हाला मुरूमांची समस्या असल्यास, त्यावरही हे फायदेशीर ठरेल. 

गुळवेल आणि कोरफड जेल (Giloy and Aloe Gel)

त्वचा हायड्रेट करण्यासाठी या कॉम्बिनेशनचा उपयोग होतो. गुळवेल आणि कोरफड जेल या दोन्ही गोष्टी त्वचा मऊ आणि मुलायम होण्यासाठी मदत करतात. गुळवेल आणि कोरफड जेलचा फेसमास्क बनविण्यासाठी एक चमचा गुळवेल पावडर आणि गुळवेल दाण्याच्या पावडरची पेस्ट तयार करा. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन आपल्या चेहऱ्यावरील वाढलेली चमक पाहा. 

गुळवेल आणि हळद (Giloy and turmeric)

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हळदीचा नेहमीच उपयोग होतो. अगदी लग्नामध्येही हळद याच कारणामुळे लावली जाते. हळदीचे फेसपॅकही वापरले जातात. गुळवेल आणि हळद पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. फेसमास्क बनविण्यासाठी तुम्ही एक चमचा गुळवेल पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि गुलाबपाणी मिक्स करा. हे तुम्ही फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्स चेहऱ्यावर तसंच राहू द्या. हा फेसपॅक वापरल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील. आठवड्यातून दोन वेळातरी तुम्ही हा फेसमास्क वापरा. 

गुळवेलचा वापर तुम्ही चेहरा अधिक तरूण आणि चमकदार करण्यासाठीही अशा पद्धतीने करू शकता. त्वचा संवेदनशील असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच तुम्ही याचा वापर करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य