सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटण्यासाठी सतत शुभ आणि चांगले विचार करायला हवेत. मात्र आजकाल बाहेरच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या प्रत्येक दिवसावर होताना दिसतो. बाहेरचं वातावरण कितीही नकारात्मक असलं तरी तुमची प्रत्येक सकाळ नेहमी उत्साही आणि आनंदी करण्यासाठी चांगले विचार प्रोत्साहन देतात. मात्र त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. जसं की सकाळी उठल्यावर इतर गोष्टी वाचण्याऐवजी शुभ विचार वाचणे. यासाठीच वाचा या गुड मॉर्निंग शायरी मराठीतून (Good Morning Shayari In Marathi) ज्यामुळे तुमचा प्रत्येक दिवस होईल खास
Table of Contents
सुंदर गुड मॉर्निंग शायरी (Beautiful Good Morning Shayari In Marathi)
दिवसाची सुरूवात सुंदर करणाऱ्या गुड मॉर्निंग शायरी
- कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यंत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही – शुभ सकाळ - हसत राहिलात तर सर्व जग तुमच्यासोबत आहे
नाहीतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंनापण डोळ्यामध्ये जागा नाही – शुभ सकाळ - फुले नेहमी फुलत राहतात, ज्योत अखंड तेवत राहते.
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात, त्यांना जोडा आणि आनंदी राहा – शुभ सकाळ - आवडतं मला लोकांना नेहमी गुड मॉर्निंग म्हणायला
दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात एकत्र साठवून ठेवायला – गुड मॉर्निंग - सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ – तुम्हा सर्वांना – शुभ सकाळ - रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली – शुभ सकाळ - प्रत्येक दिवसांत एक संधी दडलेली असते,
शुभ सकाळ त्याचीच होते ज्याला ती संधी साधता येते – शुभ सकाळ - निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा
आणि आपण तयार करतो ती आपली ओळख – शुभ सकाळ - अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ - नवा दिवस नवी सुरूवात
नवी प्रेरणा आणि तुझी साथ
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे
परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे – शुभ सकाळ
यासोबतच वाचा तुमची सकाळ बनवण्यासाठी सुंदर ‘शुभ सकाळ’ संदेश (Good Morning Messages In Marathi)
प्रेम व्यक्त करणाऱ्या गुड मॉर्निंग शायरी (Good Morning Love Shayari Marathi)
तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीचा दिवस नेहमी खास करण्यासाठी सकाळीच पाठवा या गुडमॉर्निंग शायरी
- पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला
तुझी आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला – शुभ सकाळ - आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय
माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवलाय
कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय – शुभ सकाळ - एकच आस, एक विसावा
तुझा मेसेज रोज दिसावा
परमेश्वराकडे हिच प्रार्थना
तुझा सहवास कायम मिळावा – शुभ सकाळ - पहाटेच्या गारव्यात तुला मी आठवले
मैत्रींच्या गारव्यात पुन्हा पुन्हा साठवले
तुला भेटून बरेच दिवस झाले
आता तरी बास झाले तुझे बहाणे – शुभ प्रभात - मोगरा दूर असला तरी त्याचा सुगंध कमी होत नाही
तसंच आपण कर्तव्यासाठी कितीही दूर असलो करी आपलं प्रेम कधीच कमी होणार नाही – सुप्रभात - मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो
कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो
जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो
कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो – शुभ सकाळ - दररोज मला तुला झोपेतून हळूवार उठवायचं आहे
तू फक्त हो म्हण तुझी प्रत्येक सकाळ मला खास करायची आहे – शुभ सकाळ - पहाटे पहाटे कळीचे फुल झाले, पक्षी त्यांच्या प्रवासासाठी दूर आकाशात उडून गेले, सूर्याचे आगमन होताच तारे चक्क लपून बसले, तुझ्यासोबत स्वप्न पाहत मला कळलेच नाही रात्रीचे प्रहर कधी सरले – शुभ सकाळ
- येणारी प्रत्येक सकाळ इतकी रम्य असावी
तुझी चिंता काळजी सर्व काही दूर पळून जावी
येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाचा असावा
तुझ्या खूष असण्याचा सर्वांनाच हेवा वाटावा – शुभ सकाळ - योग्य व्यक्तीचे हात हातात असतील तर आयुष्यात चुकीच्या माणसांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही – शुभ सकाळ
त्याचप्रमाणे शुभ रात्री संदेश (Good Night Messages In Marathi) पाठवूनही इतरांना करा आनंदी
मेसेज करण्यासाठी गुड मॉर्निंग शायरी (Good Morning Shayari For SMS In Marathi)
मित्रमंडळींना मेजेस करण्यासाठी या गुडमॉर्निंग शायरी आहेत बेस्ट
- दिवस सुंदर आणि आनंदी जाण्यासाठी
जे तुम्हाला हवे ते इतरांना द्या – शुभ सकाळ - आपण किती आनंदात आहोत यापेक्षा महत्त्वाचं आहे
आज आपल्यामुळे कितीजण आनंदात आहेत – शुभ सकाळ - धुक्याने आज एक छान गोष्ट शिकवली…
रस्ता दिसत नसेल तर फार दुरचं पाहण्यात फायदा नाही
एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होईल – शुभ सकाळ - प्रत्येक दिवस काहीतरी शिकवत असतो त्यामुळे सुट्टी असली तरी तो वाया जाऊ देऊ नका – शुभ सकाळ
- चांगली माणसं आणि चांगले विचार सोबत असतील तर जगात कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही, शून्यालाही देता येते किंम फक्त त्याच्या पुढे एक कोण ते महत्त्वाचे आहे. – शुभ सकाळ
- मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसऱ्याचे मन जिंकण्याची कला शिकून घ्यावी लागते – शुभ सकाळ
- आपली सकाळ भारी
आपली दुपार भारी
आपली संध्याकाळपण भारी
अरे….आपला तर पुरा दिवसच लय भारी ! शुभ सकाळ - प्रत्येक पहाट दररोज तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते
झोपून स्वप्न पाहा किंवा उठून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा – शुभ सकाळ - प्रत्येक सकाळी आपण नव्याने जन्माला येतो, मात्र आज आपण कसं वागतो यावर येणारा पुढचा दिवस ठरत असतो – शुभ सकाळ
- एखाद्याचा अवगुण पाहणं लोकांसाठी खेळ आहे, पण त्याच लोकांमधील गुणांचा मागोवा घेणं तुमच्यामधील खास कला आहे – शुभ सकाळ
बहिणीसाठी बेस्ट शायरी, व्यक्त करा मनातील भावना (Marathi Shayari For Sister)
स्टेटससाठी गुड मॉर्निंग शायरी (Good Morning Shayari For Status In Marathi)
या गुडमॉर्निंग शायरी स्टेटसला ठेवा आणि तुमच्या ओळखीच्या सर्वांना शायरीतून करा शुभ सकाळ (Morning Shayari Marathi )
- स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही – शुभ सकाळ - देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना
पण स्वतःवर विश्वास असेल तर देवालासुद्धा तुम्हाला जे हवे ते द्यायला भाग पाडा – शुभ सकाळ - नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील
पण ह्रदयात राहणारी माणसं क्वचितच भेटतात – शुभ सकाळ - खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे
आपली माणसं आपल्याच माणसांचा कधीच पराभव करत नाहीत – शुभ सकाळ - आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला हे ओळखता आले तर आयुष्यात प्रत्येक दिवस चांगलाच असणार – शुभ सकाळ - जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वांच्या डोळयात तुम्हीच जिंकणार ही प्रबळ इच्छा दिसते… शुभ प्रभात
- आरसा आणि ह्रदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच…
आरशात सगळे दिसतात आणि ह्रदयात फक्त आपलेच दिसतात – शुभ सकाळ - जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ दे नाही… शुभ सकाळ
- प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो.
फक्त आपल्याजवळ कृतज्ञतेची किल्ली असावी लागते, शुभ सकाळसुख म्हणजे नक्की काय असतं, कालच्या दिवसाची खंत नसणं आणि आजचा दिवस चिंता नसणं – शुभ सकाळ
देखील वाचा:
शुभ दुपार शुभेच्छा संदेश मराठीतून
सक्सेस कोट्स इन मराठी (Success Quotes In Marathi)
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade