प्रेरणात्मक कोट्स करतील आयुष्यात अधिक प्रेरित (Motivational Quotes In Marathi)

Motivational Quotes In Marathi

आयुष्यात प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी नैराश्य येतंच असतं. पण अशावेळी आपल्याला आपल्या माणसांची साथ आणि प्रेरणात्मक कोट्स (motivational quotes in marathi) नक्कीच तारून नेतात. आयुष्यामध्ये प्रेरित व्हायची बऱ्याचदा आपल्याला गरज भासते. कारण आपलं आयुष्य हे अनेक चढउतारांंना भारून गेलेलं असतं. मग अशावेळी आपल्या सगळ्यांनाच सकारात्मक प्रेरणात्मक कोट्स (positive motivational quotes in marathi) नक्कीच साथ देतात आणि आपणही आयुष्यात काहीतरी करायला हवंं हे यातून आपल्याला प्रेरित करतं. अशा कितीतरी वेळा आपल्याला व्हॉट्सअपवरही अनेक प्रेरणात्मक इमेजेस पाहायला मिळतात.

ज्या आपण प्रेरणात्मक स्टेटस(motivational status in marathi) म्हणूनही ठेवतो. जेणेकरून तो विचार आपल्याही मनात रूजला जातो. अगदी सकाळी सकाळी काही चांगले प्रेरणात्मक मेसेज (motivational good morning message in marathi) वाचून दिवस सुरू केला तरीही दिवस खूप मस्त जातो. यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते सकारात्मक विचार करणे. असेच स्टेटस आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातही वापरत असतो. अगदी तुम्ही विद्यार्थी (motivational quotes in marathi for students) असाल अथवा कितीही मोठ्या कंपनी मोठ्या हुद्द्यावर काम करत असाल., कधी ना कधी तरी आपल्याला आयुष्यात प्रेरणेची गरज ही भासतेच. कधी आपण त्यासाठी आपल्या शायरीची मदत घेतो तर कधी कवितेची. असेच काही प्रेरणात्मक कोट्स खास तुमच्यासाठी

Table of Contents

  प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये (Motivational Quotes In Marathi)

  Motivational Images Marathi

  सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही. मग अशावेळी आपल्या अशा प्रेरणात्मक कोट्सची गरज भासते. 

  1. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल

  2. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 

  3. माणसाने समोर बघायचं की मागे,  यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं - व. पु.  काळे 

  4. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 

  5. हिंमत एव्हढी ठेवा की,  तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

  6. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 

  7. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 

  8. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,  स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत - एपीजे अब्दुल कलाम 

  9. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी 

  10. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते 

  सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठीमध्ये (Positive Motivational Quotes In Marathi)

  Motivational Images Marathi

  आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते आणि त्यासाठी आपल्याकडे मराठीमध्ये असे अनेक सकारात्मक प्रेरणादायी कोट्स आहेत.

  1. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात 

  2. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे 

  3. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते

  4. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे 

  5. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात 

  6. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या  स्वप्नांच्या मागे लागा 

  7. आपल्या स्वतःबरोबर वाईट  व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या

  8. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे

  9. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.  कारण हा निसर्गाचा नियमच आहे.  ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात 

  10. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते 

  वाचा - Vishwas Nangare Patil Quotes in Marathi

  प्रेरणात्मक स्टेटस मराठीमध्ये (Motivational Status In Marathi)

  Motivational Status In Marathi

  हल्ली आपण आपल्या विचारांनुसार स्टेटस ठेवत असतो. असेच काही प्रेरणात्मक स्टेटस तुम्ही व्हॉट्सअपला ठेऊ शकता. 

  1. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते 

  2. नेहमी  तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही

  3. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते 

  4. संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच....

  5. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका 

  6. पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल

  7. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या  शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे

  8. स्वतःचा विकास करा.  लक्षात ठेवा की, गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे 

  9. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं 

  10. कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते  

  यशासाठी प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये (Success Motivational Quotes In Marathi)

  Success Motivational Quotes In Marathi

  प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते असं नाही. पण अपयशाचने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यश मिळविण्याच्या मार्गात काही प्रेरणात्मक कोट्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. 

  1. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते 

  2. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी 

  3. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या 

  4. संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे - एपीजे अब्दुल कलाम 

  5. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा  हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील

  6. सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते 

  7. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा 

  8. न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं 

  9. भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी 

  10. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत. यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत

  आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स (Life Motivational Quotes In Marathi)

  Life Motivational Quotes In Marathi

  आयुष्यात जेव्हा कधी नैराश्य येते तेव्हा तेव्हा आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळावी असंही वाटतं. त्यासाठी आयुष्याला प्रेरणा देणारे काही कोट्स 

  1. माणसाच्या आयुष्यातील संकटं ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे

  2. ध्येय साध्य करणे  कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही 

  3. नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते 

  4. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असं म्हणतात 

  5. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात 

  6. मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत 

  7. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात

  8. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे  होय

  9. आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही...म्हणून प्रयत्न करत राहा

  10. प्रयत्न सोडू नका, सुरूवात नेहमी कठीणच असते 

  विद्यार्थ्यांकरिता प्रेरणात्मक कोट्स (Motivational Quotes In Marathi For Students)

  Motivational Quotes In Marathi For Students

  सध्या अभ्यासाचा इतका ताण विद्यार्थ्यांवर असतो की त्यांना सतत तू चांगलं करत आहेस अशी प्रेरणा द्यावी लागते. असेच काही प्रेरणात्मक कोट्स खास विद्यार्थ्यांसाठी 

  1. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. जन्मभर माणूस हा विद्यार्थीच असतो 

  2. जे लोक तुमची परीक्षा घेऊ पाहतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा 

  3. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी करणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच निर्माण होतील मालक नाहीत

  4. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका 

  5. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. जे प्रयत्न  करत राहतात त्यांनाच यश मिळतं 

  6. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो बुद्धिवान आणि जो मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो विजेता 

  7. विद्यार्थ्याला सुट्टी ही कधीच नसते तर मिळालेली सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवं शिकण्याची संधी असते  

  8. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा 

  9. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही

  10. कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरूड फारच कमी असतात. गरूडासारखी उंच भरारी घ्या

  गुड मॉर्निंग अर्थात सकाळी पाठवायचे प्रेरणात्मक संदेश (Motivational Good Morning Messages In Marathi)

  Motivational Good Morning Messages In Marathi

  कधी कधी सकाळीच आलेले प्रेरणात्मक संदेश आपला दिवस अधिक उत्साही करतात. अशा संदेशांमुळे दिवसही चांगला जातो आणि मनात नकारात्मक विचार येत नाहीत.  

  1. जिथे प्रयत्नांची उंची  मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा...शुभ सकाळ 

  2. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत 

  3. हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,  नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही - शुभ सकाळ

  4. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो 

  5. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो 

  6. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा 

  7. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही, आपला  दिवस आनंदात जावो - शुभ सकाळ

  8. लोकं नावं ठेवतच राहणार , पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे 

  9. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात

  10. सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही

  रात्री झोपताना वाचायचे प्रेरणात्मक संदेश (Good Night Motivational SMS In marathi)

  Good Night Motivational SMS In marathi

  कधी कधी रात्री झोपताना दिवसभर घडलेल्या गोष्टींचा  त्रास होत असतो.  अशावेळी अनेकदा नकारात्मक विचार मनात येतात. पण त्यावर मात करायची असेल तर सकारात्मक आणि प्रेरणात्मक असे काही संदेश तुम्ही रात्र वाचू शकता. 

  1. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे.  महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास, कोण आपल्यासोबत आहे - शुभ रात्री 

  2. आठवण त्यानाच येते जे तुम्हाला आपले समजतात - शुभ रात्री 

  3. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा.  मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील

  4. दुःखाच्या  रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात - शुभ रात्री 

  5. सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं - शुभ रात्री 

  6. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे - शुभ रात्री 

  7. आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या 

  8. नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात

  9. हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत 

  10. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात - शुभ रात्री

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक