केसांची हेअरस्टाईल की कोणत्याही अटायरचा लुक वाढवायचे काम करते. जर तुम्ही योग्य कपड्यांवर योग्य हेअरस्टाईल केली तर त्याचा लुक अधिक उठून येतो. साडी किंवा ट्रेडिशनलवेअर घातले की, आंबाडा किंवा अशा हेअरस्टाईल्स करता येतात. पण वेस्टर्नवेअरवर हेअरस्टाईल करताना फार विचार करावा लागतो. वेस्टर्नवेअरवर तुम्ही नेमकी कोणती हेअरस्टाईल करायला हवी हे तुम्हाला कळत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक हेअरस्टाईल शोधून काढल्या आहेत. या हेअरस्टाईल करायला फारशा कठीण नाहीत. जर तुम्ही ही हेअरस्टाईल थोडी मनापासून केली आणि थोडी मेहनत घेतली तर तुम्हाला अगदी घरच्या घरी या हेअरस्टाईल करता येईल. वेस्टर्न हेअरस्टाईल करताना तुम्हाला काहीही वेगळे सामान लागत नाही. कंगवा, हेअर पीन, हेअरस्टाईल इक्विपमेंट (हेअर कर्लर, हेअर स्ट्रेटनर) असे साहित्य लागेल. याशिवाय तुम्ही हेअर रबर आणि काही फॅन्सी पीन्स असे साहित्यही जवळ करुन ठेवा.चला आता जाणून घेऊया या युनिक हेअरस्टाईल.
Table of Contents
- लुझ कर्ल विथ बन (Loose Curl With Bun)
- हाय पोनी विथ पफ (High Pony With Puff)
- ट्विस्ट डाऊन बन (Twist Down Bun)
- विटेंज कर्ल (Vintage Curl)
- लो ब्रेड रॅप पोनीटेल (Low Braid Long Ponytail)
- हॉरीझोंटल ब्रेड हेअरस्टाईल (Horizontal Braid Hairstyle)
- वन साईड ब्रेड (One Side Braid)
- हेअर ट्विस्ट हेअरस्टाईल (Hair Twist Hairstyle)
- हाय बन स्ट्रेट हेअर (High Bun Straight Hair)
- जास्मिन हेअरस्टाईल (Jasmine Hairstyle)
लुझ कर्ल विथ बन (Loose Curl With Bun)
लुझ कर्ल ही हेअरस्टाईल अनेकांना आवडते. तुम्ही अगदी शॉर्ट ड्रेस घातला असेल किंवा गाऊन कोणत्याही वेअरवर तुम्हाला अशी हेअरस्टाईल करता येते. लुझ कर्ल ही हेअरस्टाईल करायलाही सोपी असते. या हेअरस्टाईलमध्ये फक्त एकच ट्विस्ट आहे तो म्हणजे यामध्ये तुमच्या क्राऊनच्या भागात तुम्हाला एक छानसा बन बांधायचा आहे.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांच्या क्राऊनकडील भागाचा एक तात्पुरता आंबाडा घालून घ्या.
- केसांचे लहान लहान सेक्शन करुन कर्लर मशीन गरम करुन घ्या.
- केसाच्या एक- एक बट घेऊन केस कर्ल करुन घ्या. पण हे कर्ल थोडे लुझ असू द्या.
- कर्ल केलेल्या केसांच्या बटा मोकळ्या करुन घ्या. म्हणजे कर्ल छान उठून दिसतील.
- उरलेल्या क्राऊनच्या केसांचा गोल बन करुन त्याला पीनअप करुन घ्या. तुमची फॅन्सी हेअरस्टाईल तयार
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
स्कर्ट ड्रेस, शॉर्ट ड्रेस किंवा एखादा छान वेस्टर्न गाऊन घातला असेल आणि तुम्हाला थोडी उंची दाखवून द्यायची असेल तर तुम्ही अशी हेअरस्टाईल करु शकता.
हाय पोनी विथ पफ (High Pony With Puff)
हाय पोनी ही सगळ्यात सोपी अशी हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल तुम्हाला अगदी रोजही करता येऊ शकते. हाय पोनी विथ पफ ही हेअरस्टाईल करण्यासाठी फार सामान लागत नाही. कंगवा, रबर बँड आणि पीन्स हे इतकेच यासाठी पुरेसे आहेत. तुम्ही घाईत असलात तरी देखील तुम्हाला ही सोपी हेअरस्टाईल झटपट करता येणाऱ्यासारखी आहे.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांच्या पुढील भागाचा पफ काढून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला किती भागाचा पफ काढायचा तो भाग काढून घ्या.
- केसांचा पफ चांगला होण्यासाठी केसांचे बॅक कोबींग करुन घ्या. म्हणजे केसांचा पफ खूप छान येतो.
- आता सगळे केस एकत्र करुन तुम्हाला सगळ्या केसांचा हाय पोनी बांधायचा असेल.
- जर तुम्हाला पोनीटेलमधील केस अजून सुंदर दिसायला हवे असतील तर तुम्ही उरलेल्या केसांचे लुझ कर्ल करुन घ्या.
म्हणजे ते अधिक छान दिसतील.
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
जर तुम्ही स्किनी जीन्स, हाय हिल्स असे कॉम्बिनेशन घातले असेल तर तुम्हाला ही हेअरस्टाईल फॉर्मल लुक देतील. या शिवाय तुम्हाला जीन्स आणि ब्राईट टिशर्टवर ही हेअरस्टाईल फारच शोभून दिसेल.
ट्विस्ट डाऊन बन (Twist Down Bun)
ट्विस्ट डाऊन बन ही हेअरस्टाईल फारच रिच आणि एलिगंट दिसते. तुम्हाला जर सोडलेले केस आवडत नसेल तर हा बन लुक तुम्हाला चांगला दिसतो. ट्विस्ट डाऊन बन ही हेअरस्टाईल करायलाही सोपी आहे. तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार हवी तितकी व्हरायटी आणू शकता. ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला रबर बँड आणि एखादा फॅन्सी पीन मिळाला तरी चालेल.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांचा लो बन बांधायचा आहे. त्यामुळे केस अगदी नेक पर्यंत आणून केसांची बट गोलाकार करुन एक साधा हेअर बन बांधून घ्या. रबर लावून केस बांधून घ्या. केसांचा बन बांधला आहे. त्याच्या वर मधल्या बाजूचे केस बाजूला करुन केसांचा बन त्यामधून काढा.
- त्यामुळे केसांना एक वेगळे वळण येते. आता तुम्ही केसांच्या बनच्या वरच्या भागात तुम्हाला हवा तो फॅन्सी क्लिप लावून घ्या.
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
ही इंडो-वेस्टर्न अशी हेअरस्टाईल आहे.ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही इंडोवेस्टर्न वेअर, ऑफिसड्रेसेस किंवा एखाद्या वेस्टर्न फॉर्मल ड्रेसवरही घालू शकता.
विटेंज कर्ल (Vintage Curl)
विटेंड कर्ल ही हेअरस्टाईल ही देखील अशी हेअरस्टाईल आहे जी तुम्हाला रिच लुक देते. ही हेअरस्टाईल करण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण ही हेअरस्टाईल केल्यानंतर नक्कीच चांगली दिसते. विटेंड कर्ल ही नावाने जेवढी उत्साह देणारी हेअरस्टाईल आहे. तितकी ती केल्यावरही चांगली दिसते. त्यामुळे ही हेअरस्टाईल तुम्ही करायलाच हवी.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांना हिट प्रोटेक्शन स्प्रे लावून घ्या. त्यानंतर केसांच्या सेक्शन करुन घ्या.
- जाड रोलर असलेला हेअर कर्लर घेऊन एक एक सेक्शनचे केस कुरळे करुन घ्या. केस कुरळे घेतले तरी ते सोडू नका.
- तसाच रोल पीनने बांधून ठेवा. सगळ्या केसांचा कर्ल करुन झाल्यानंतर आता हळुहळू एक एक सोडायला सुरुवात करा.
- केसांमध्ये कर्ल हाताने मोकळे करताना त्याला चपटे करा. म्हणजे तुम्हाला असा लुक मिळेल.
- एक एक करत कर्ल उघडत जा आणि अशाप्रकारे तुम्ही कर्ल करत राहा.
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
विटेंज लुक देणारी ही हेअरस्टाईल तुम्हाला पार्टीवेअर ड्रेसवर खुलून दिसते. तुम्ही एखादा छान गाऊन घातला असेल तर तुम्हाला हा लुक अधिक चांगला दिसू शकतो.
लो ब्रेड रॅप पोनीटेल (Low Braid Long Ponytail)
वेस्टर्नवेअरवर करता येईल अशी ही सोपी आणि बेस्ट हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल करायलाही सोपी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कधीही ही हेअरस्टाईल करु शकता. यामध्ये फक्त तुम्हाला पीनांची गरज आहे. या व्यतिरिक्त तुमचे केस सुळसुळीत असतील तर तुम्ही रबरचा उपयोगही करु शकता.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केसांची एक बट घेऊन तुम्ही त्याची लांब वेणी घालून घ्या. ही बट बारीक असू द्या.
- दुसऱ्या बाजूच्या मानेजवळील केसांची एक बट घेऊन तुम्ही त्याची जाडसर वेणी घालून घालून घ्या. उरलेल्या केसांचा एक लो पोनीटेल बांधून घ्या.
- केसांची एक वेणी पोनीटेलमध्ये जाऊ द्या.तर दुसरी जाड वेणी केसांच्या पोनीटेलभोवती गुंडाळा. केसांना पीनअप करुन घ्या. तुमची हेअरस्टाईल तयार
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
तुम्हाला अगदी कोणत्याही कपड्यांवर ही हेअरस्टाईल करता येईल. या शिवाय तुम्हाला थोडा रायडर लुक हवा असेल तरीदेखील तुम्ही अशा कपड्यांवर अशी हेअरस्टाईल करु शकता.
हॉरीझोंटल ब्रेड हेअरस्टाईल (Horizontal Braid Hairstyle)
केसांची वेणी घालून ही हेअरस्टाईल करायची आहे. केसांची सैल वेणी घालून ही हेअरस्टाईल करावी लागते. ही हेअरस्टाईल दिसायला फार सोपी असली तरी देखील ती तितकी सोपी नाही. पण तुमच्या कोणत्याही वेस्टर्न वेअरवर ही हेअरस्टाईल करता येईल.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केसांच्या क्राऊन भागाकडील एक बट घेऊन त्याची वेणी बांधायला घ्या. ही वेणी थोडी जाड बट घेऊन घाला.
- वेणी बांधताना गोलाकार एक-एक केसाची बट घेऊन केसाची वेणी बांधत दुसऱ्या भागापर्यंत या.
- शेवटच्या टोकाला पीनने सिक्युअर करा.
- जर तुम्हाला असे करणे जमत नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूने केसांच्या जाड बटा घेऊन त्याची वेणी घाला आणि मागच्या बाजूला आणत पीनने सिक्युअर करा.
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
गाऊन, स्कर्ट किंवा अशा कोणत्याही पार्टीवेअरवर ही हेअरस्टाईल अगदी सहज करता येईल अशी आहे. तुम्हाला थोडं अधिक डेकोरेटिव्ह करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये फॅन्सी पीन्स लावू शकता ज्यामुळे ते अधिक चांगले दिसेल
वन साईड ब्रेड (One Side Braid)
जर तुमचे केस लहान असतील तर तुमच्यासाठी ही एक बेस्ट हेअरस्टाईल आहे. कारण लहान केसांची नेमकी कोणती हेअरस्टाईल करावी हे कळत नाही.अशावेळी ही सोपी हेअरस्टाईल तुम्हाला करता येईल. यासाठी तुम्हाला स्किलफुल हात आणि काही पीनांची गरज आहे. जर तुमच्याकडे हेअर स्प्रे असेल तर फारच उत्तम
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांचा जसा पार्टीशन हवा तसा करुन घ्या. हे केस एका बाजूला केल्यास अधिक चांगले दिसतात.
- आता ज्या बाजूला ही हेअरस्टाईल करायची आहे. तेथील एक एक बट घेऊन त्याचा पिळ घालून मागे सिक्युअर करुन घ्या.
- असे एक एक पीळ घालून केस मागे सिक्युअर करुन घ्या. अशा एक एक बट घेऊन सिक्युअर करुन घ्या
हेअरस्टाईल तयार!
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
ही हेअरस्टाईल कोणत्याही वेअरवर करता येईल अशी आहे. अगदी तुम्ही ट्रेडिशनलवेअरवरही ही हेअरस्टाईल करु शकता ही हेअरस्टाईल अधिक उठून दिसते
हेअर ट्विस्ट हेअरस्टाईल (Hair Twist Hairstyle)
सगळ्यात सोपी अशी ही हेअरस्टाईल असून यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार नाही. केसांची ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला फार काही साहित्य लागत नाही. हेअर पीन पुरेशा असतात .
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांचा भांग पाडून दोन्ही बाजूने केसांच्या एक एक बट काढा.
- केसांचा एक एक बट ट्विस्ट करुन केस व्यवस्थित मागे टक करुन घ्या.
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
ही हेअरस्टाईल सोपी असली तरी देखील ती कोणत्याही वेस्टर्न आऊटफिटवर खूप छान उठून दिसते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही ड्रेसवर ती करता येईल.
हाय बन स्ट्रेट हेअर (High Bun Straight Hair)
प्रत्येक दिवशी करता येईल अशी ही सोपी हेअरस्टाईल असून ती करण्यास फार त्रासही नाही. तुम्ही अगदी सहज आणि कोणत्याही साहित्याशिवाय ही हेअरस्टाईल करु शकता. फक्त ही हेअरस्टाईल करताना तुमच्या केसांचा आबांडा येणे गरजेचे आहे. जो सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला पीन्स किंवा रबर लागेल
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस व्यवस्थित विंचरुन घ्या.
- केसांच्या क्राऊन भागातील केस घेऊन त्याचा एक वरच आंबाडा घालून घ्या. हा आंबाडा तुम्हाला क्राऊन भागावरच बांधायचा आहे. तरच तो उठून दिसेल. आणि त्यामुळे तुमची उंचीही चांगली खुलून येईल
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
ही थोडी स्पोर्टी अशी हेअरस्टाईल असल्यामुळे ही हेअरस्टाईल कशावरही चांगली दिसते. अगदी स्कर्टपासून ते जीन्स किंवा कोणत्याही पँटवर किंवा वेस्टर्न आऊटफिटवर ती उठून दिसते.
जास्मिन हेअरस्टाईल (Jasmine Hairstyle)
जास्मिन नावाचे कार्टुन तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला ही हेअरस्टाईल नक्की आवडेल अशी आहे. ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला हेअर रबर लागतील. हे हेअर रबरही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार निवडता येतील. ही हेअरस्टाईल लांब केसांसाठी आहे.
अशी करा हेअरस्टाईल (How to do it):
- केस विंचरुन घ्या. केसांना थोड्या थोड्या अंतरावर रबर लावून घेऊया. असे करतान केसांचा मध्ये पफ तयार होईल पण ही हेअरस्टाईल नक्कीच उठून दिसेल.
स्टायलिंग टिप्स (Styling Tips):
कोणत्याही वेस्टर्नवेअर करता येईल अशी ही हेअरस्टाईल आहे. तुम्ही जीन्स, स्कर्ट यापैकी काहीही घातलं असेल तरी ही हेअरस्टाईल तुम्हाला करता येईल.