लाईफस्टाईल

120+ होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश 2022 | Holi Wishes, Quotes, Status, Poems In Marathi

Harshada Shirsekar  |  Mar 15, 2022
Holi-Wishes-In-Marathi

Holi Wishes, Quotes, Status In Marathi: प्रतीक्षा संपली. रंगांचा सण होळी जवळ येत आहे. 17 मार्चला होलिका दहन तर 18 मार्चला रंगांनी होळी साजरी केली जाते. होळी हा गोडपणा, आपुलकी, राग, आनंद आणि जीवनातील रंगांचा सण आहे. होळीमध्ये लोक आपल्या नातेवाईक, मित्र, शेजारी आणि जवळच्या व्यक्तींना भेट देतात. यावेळी दोघांनी एकमेकांना रंग लावून मिठी मारून आणि मिठाई खाऊन तोंड गोड केले जाते. असे म्हणतात की होळीच्या दिवशी ज्या लोकांशी तुमची तक्रार आहे त्यांना मिठी मारून अभिनंदन केल्याने जुनी भांडणे संपतात आणि नात्यात जवळीक वाढते. अशा परिस्थितीत, होळीच्या निमित्ताने प्रत्येक मित्र, नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला भेटणे शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा एसएमएसद्वारे सुंदर शुभेच्छा पाठवू शकता.
होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. या सणाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला आवर्जून होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes in Marathi) दिल्या जातात. होळीसाठी खास शुभेच्छा संदेश (holi messages in marathi), कोट्स (holi quotes in marathi), स्टेटस (holi marathi status) आणि कविताही (holi poem in marathi) एकमेंकाना पाठवल्या जातात.

होळी शुभेच्छा मराठी २०२२ | Happy Holi Wishes In Marathi 2022.

होळी सण नाती-परंपरा जपण्याचा, आनंदाचा, उल्हासाचा… या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणी, सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून  होळीच्या शुभेच्छा देणे बऱ्याचदा शक्य होत नाही. पण मेसेजच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes In Marathi) द्यायला विसरू नका. यानिमित्तानं आम्ही तुमच्यासाठी ‘होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश’ देणारे मेसेजचे भरपूर पर्याय आणले आहेत. 

होळीच्या शुभेच्छा – Holi Wishes In Marathi

POPxo Marathi‘ कडूनही तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा (Holichya Hardik Shubhechha)

होळीच्या शुभेच्छा – Holi Wishes In Marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा 
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,  
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी 
तुम्हाला व तुमच्या परिवाराला 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

पाणी जपुनिया, 
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास 
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक  शुभेच्छा 
– अमर ढेबरे 

वाचा : रंगपंचमी खेळताना रंग डोळ्यात आणि नाका-तोंडात गेल्यावर करा ‘हे’ उपाय

होळी स्टेटस मराठी – Holi status in marathi 2022.

थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध 
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण, 
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
हॅपी होली

सुखाच्या  रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, 
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या शुभेच्छा – Holi Wishes In Marathi

उत्सव रंगांचा 
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

मत्सर,  द्वेष, मतभेद विसरू 
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, 
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला 
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला 
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि 
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला 
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!

रंग साठले मनी अंतरी 
उधळू त्यांना नभी चला 
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा 

होळीच करायची तर
अहंकाराची,  असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची,  निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी 
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी साजरी करण्याची पद्धत, वेगवेगळ्या ठिकाणी होते अशी होळी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Holi Messages In Marathi

मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना भेटून होळीच्या शुभेच्छा देणं शक्य नसेल तर मेसेजद्वारे आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. 

होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Holi Messages In Marathi

प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगांमधल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
होळी/रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी मराठी कोट्स – Holi Quotes In Marathi

होळीच्या शुभेच्छा, एसएमएस आणि कवितांसोबतच आता होळीचे कोट्स आपण आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियाांना पाठवू शकतो. होळीसाठी कोट्स खालीलप्रमाणे नक्की शेअर करा.

होळी कोट्स – Holi Quotes In Marathi

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

आली होळी, आली होळी,नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी, रंगी रंगू सर्वांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू.
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा : रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा

भेटीलागी आले।
रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे।
रंग तुझा।।
वदलो बा माझी ।
पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात।
मिसळतो।।
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
– गुरू ठाकूर

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या कविता – Holi Kavita Marathi

होळीच्या कविता – Holi Kavita Marathi

मेसेजऐवजी तुम्हाला शुभेच्छांसाठी अन्य पर्याय हवा असल्यास आपल्या नातेवाईकांना होळीच्या कविता पाठवा.

मिळू द्या उत्सहाची सात
होऊ द्या रंगांची बरसात
होळी आली नटून सवरून
करू तिचे स्वागत जोशात
भरू पिचाकरीत रंग
बेभान करेल ती भांग
जो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग
मिळू द्या उत्साहाची सात
घेऊ हातात आपण हात
अखंड बुडू या रंगात
बघा आली ती टोळी
घेऊन रंगांची ती पिचकारी
हसत खेळत अशीच साजरी करू
परंपरा आपली ही मराठमोळी
म्हणा एका जोशात एकदा
होळी रे होळी, आली स्पंदनची टोळी
तोंडात पुरणाची पोळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

फाल्गुन महिन्याची गोळी गुलाबी
आली आली पाहा थंडीत होळी
मनाशी मन मिळवण्यासाठी
मनातील द्वेष मिटवण्यासाठी
थोडी तिखट उसळ चण्याची
नंतर मिळते पाहा पोळी पुरणाची
दिवस दुसरा रंगत सणांची
सर्वत्र होते उधळण रंगांची
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

आम्रतरूवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगांची उधलण होई
होळी जीवन गाणे गाई
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
होळीच्या हरित शुभेच्छा

रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

बोंबा मारुनी केला शिमगा,
अरे, अमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
तमक्याच्या बैलाला, हो रू रू रू
अनेकांचा होळीनिमित्त,
तिर्थ प्राशनाचाही कार्यक्रम झाला.
कारण, दुस-या दिवशी होती सुट्टी,
साजरी झाली होळी
– अद्वैत यशवंत कानडे

8. शिशिरात येतो
हा सण गोजिरा
अन् आपसुक
खोलतो मनाचा पिंजरा
राग, लोभाची जळमटे
जाळावी होळीच्या आगीत
प्रेमाचा रंग मग
भरावा पिचकारीत
रंगबेरंगी रंगात
न्हाऊन जातील सारे
अन् वाहतील मग
मनी आपुलकीचे झरे…
पान गळती
होईल दुःखाची
अन् सुखाने आयुष्य
बहरतील सर्वांची…
हळूहळू ओसरतो
निसर्गातला गारवा
अन् मग कोकिळ
गाते राग मारवा…

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांग श्यामसुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी
– सुरेश भट

खेळ असा रंगला गं
खेळणारा दंगला
टिपरीवर टिपरी पडे
लपून छपून गिरिधारी
मारतो गं पिचकारी
रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा
धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारात न्हाला
आज आनंदी आनंद झाला
– जगदीश खेबुडकर

होळी मराठी स्टेटस – Holi Marathi Status For Whatsapp

Holi Marathi Status For Whatsapp

व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसद्वारे तुम्ही सर्वांना एकत्रित होळीच्या शुभेच्छा देऊ शकता. रंगपंचमीच्या दिवशीही तुम्हाला या लोकांना पाठवून शुभेच्छा देता येतील.

तुझ्यावर कुर्त्यावर लावू गुलाल
रंग सांग निळा की लाल ?
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

अगं नाच नाच राधे उडवू या रंग,
रंगामधी भिजलं तुझं गोरं गोरं अंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

करूया रंगांची उधळण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

आला होळीचा सण लई भारी
चल नाचूया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

लई लई लई भारी
मस्तीची पिचकारी
जोडीला गुल्लाल रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

‘नटून थटून पंचीम आली औंदाच्या ग साली’
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

‘सख्या चला बागामंदी रंग खेळू चला’
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

‘होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडीगोडी’
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा,
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा’
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

होलिकादहन शुभेच्छा – Holika Dahan Wishes In Marathi

Holika Dahan Wishes In Marathi

होळीच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही होळीच्या या खाली दिलेल्या शुभेच्छा पाठवू शकता.

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून जाऊ दे दु:खाचे सावट..
आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण,
होळीच्या शुभेच्छा!

मिळूनी सारे करु या दहशतवादाची होळी,
मगच साजरी करुया यंदाची होळी

वाईटाचा होवो नाश…
आयुष्यात येवो सुखाची लाट…
होळीच्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

होळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा..
होळीच्या शुभेच्छा!

होळीच्या आगीत भस्म होऊ देत वाईट विचार…
सगळ्यांच्या आनंदात लागावेत चार चाँद

होळीच्या या शुभमुहुर्तावर येऊ दे तुमच्या आयुष्यात आनंद,
होऊ दे स्वप्नपूर्ती..
मिळू दे आनंदी आनंद 

होळीच्या दिवशी करुन होलिका दहन करुया वाईट प्रवृत्ती आणि आणूया आनंद,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्नीत राख होऊ देत सगळी दु:ख,
होळीच्या शुभेच्छा!

होळीचा आनंद,
रंगाची उधळण..
सजरा करुया यंदाचा सण

होळीची पूजा करुन मागूया आशीर्वाद,
सदैव राहू दे आनंद सगळ्यात

Rangpanchami Images Marathi

एकत्र येऊन साजरी करु होळी,
दु:खाला जाळू 

दु:खाची चादर हटवण्यासाठी आली होळी..
चला साजरी करु यंदाची होळी

प्रेमात होऊ दे वाढ..
होळीच्या या शुभदिवशी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा 

होळीचा आनंद मोठा आनंदाला नाही तोटा..
करा होळी सण साजरा 

होळी म्हणजे दु:खाचे दहन, होळी म्हणजे आनंद…
तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा!

आनंद घेऊन आला होळीचा सण..
दहन करुन टाकून सारे दु:ख आणि वाईट क्षण

वाईटाची राख करुन नव्या आयुष्याची सुरुवात म्हणजे होळी

होळीत झोकून द्या दु:खाला आणि जीवनात आणा फक्त आनंद

आनंदी आनंद आला…
आला रे आला होळीचा क्षण आला.

होळीच्या या शुभ दिनी येवो तुमच्या आयुष्यात आनंद.
होळीच्या शुभेच्छा

होलिका दहन मराठी मेसेज – Holika Dahan Marathi SMS

Holi Wishes In Marathi

यंदाच्या होळीत तुमची सगळी दु:ख झोकून द्या आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत यासाठी तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा हे मराठी मेसेज

होलिका दहनाच्या चारोळ्या – Holika Dahan Charolya

Holi Messages In Marathi

होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही चारोळ्या पाठवण्याचा विचार करत असाल तर काही चारोळ्याही आम्ही शोधून काढल्या आहेत.

यंदाची होळी साजरी करा या सुंदर होळी शुभेच्छा पाठवून. त्यानंतर येणारी रंगपंचमीही मोठ्या उत्साहात साजरी करा. ही होळी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो ही अपेक्षा!

होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यास धुलिवंदन किंवा धुळवड असंही म्हणतात. तुम्ही शुभेच्छा देण्याआधी रंगपंचमीची माहिती ही जाणून घ्या आणि सणाचा हा जल्लोष नक्की साजरा करा. या दिवशी एकमेकांना रंग लावून विविध रंगांची उधळण करा आणि या सणाद्वारे बंधुभाव, एकोपा जपा. मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मेसेज.

You Might Like This:

होली की हार्दिक शुभकामनाएं और संदेश

लय भारी…होळीची मराठी गाणी – Marathi Holi Songs List

सोनियाचा दिनू…अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश

Happy Holi Quotes & Wishes in English

Read More From लाईफस्टाईल