संपूर्ण देशात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन (Teacher’s Day) साजरा केला जातो. या दिवशी गुरूपौर्णिमेप्रमाणेच आपल्या शिक्षकांना विद्यार्थी शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. आपापल्या परीने शिक्षकांप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आदर विद्यार्थी व्यक्त करतात. एवढंच नाहीतर जगभरातही शिक्षक दिवस म्हणजेच Happy Teachers Day मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिक्षकदिनानिमित्त प्रेरणादायी कोट्स (Teacher’s Day Quotes In Marathi),शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Teacher’s Day Wishes In Marathi), शिक्षक दिन मराठी संदेश (Teacher’s Day Messages In Marathi),शिक्षकदिनासाठी खास व्हॉट्सअप स्टेटस (Happy Teacher’s Day Status In Marathi), शिक्षकदिनासाठी कविता (Teachers Day Poem In Marathi), Teachers Day Shayari In Marathi, शिक्षक सुविचार मराठी, शिक्षकदिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार नक्की शेअर करा.
Table of Contents
- शिक्षकदिनानिमित्त प्रेरणादायी कोट्स (Teacher’s Day Quotes In Marathi)
- शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Teacher’s Day Wishes In Marathi)
- शिक्षक दिन मराठी संदेश (Teacher’s Day Messages In Marathi)
- शिक्षकदिनासाठी खास व्हॉट्सअप स्टेटस (Happy Teacher’s Day Status In Marathi)
- शिक्षकदिनासाठी कविता (Teachers Day Poem In Marathi)
- सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षक सुविचार मराठी (Quotes By Sarvepalli Radhakrishnan In Marathi)
शिक्षकदिनानिमित्त प्रेरणादायी कोट्स (Teacher’s Day Quotes In Marathi)
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha) आपल्या शिक्षकांना देण्यासाठी खालील शिक्षक दिन सुविचार किंवा टीचर्स डे कोट्स मराठी नक्की शेअर करा.
- लक्ष्य प्राप्त करण्यात आनंद नाही. आनंद तर लक्ष्य प्राप्त करण्यातील प्रयत्नात आहे.
- तुमच्या समस्यांवरील उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त तो प्रश्न योग्य प्रकारे विचारण्याची गरज आहे.
- आत्मविश्वास आपल्याकडे असतोच फक्त तो जाणवण्यासाठी आपल्याला वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करायला हवा.
- जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन.
- जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागता तेव्हा आयुष्यात चमत्कार होऊ लागतात.
- काही फरक पडत नाही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. फरक याने पडतो की, तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता.
- आपल्या आयुष्यात चमत्कार घडण्याची वाट पाहू नका. प्रयत्न करा आणि स्वतःच चमत्कार घडवा.
- आपलं ध्येय विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस म्हणून घडवणं आहे. यशस्वी ते स्वतःच होतील. यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स अशावेळी नक्की आपल्याला उपयोगी ठरतात.
- यश आणि अपयश हे फक्त शब्द आहेत खरी मजा काम करण्यात आहे.
- गुरू फक्त तो नाही जो वर्गात शिकवतो. तर प्रत्येक ती व्यक्ती आहे जी आपल्याला काही ना काही शिकवते.
- शिक्षण एक तपस्या आहे जी आपल्याला व्यक्ती म्हणून घडवते.
- कोणत्याही शिक्षणाशिवाय प्रत्येक मानव पशुसमान आहे.
- मुलांच्या भविष्याच्या निर्मितीची जबाबदारी असणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांचे शिक्षक होय.
- स्वतः भगवान राम आणि श्रीकृष्ण यांनाही गुरूंची गरज लागली होती, कारण गुरूंशिवाय शिक्षण शक्यच नाही.
- तुमचे संस्कार सांगतात की, तुमच्या गुरूने तुम्हाला काय शिकवलं आहे.
- शिक्षक तीच व्यक्ती आहे जी, आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेते.
- संत कबीरदास सांगतात की, गुरूचा महिमा शब्दात वर्णन करणं शक्य नाही.
- शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणे हा नाही, तर पाल्याचा सर्वांगीण विकास होणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
- जो व्यक्ती शिकणं थांबवतो त्याच आयुष्य तिथंच संपतं.
वाचा – गौतम बुद्धांचे मराठी विचार, शिकवण आचरणात आणली तर आयुष्य सुखकर
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Teacher’s Day Wishes In Marathi)
- जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
- जे आपल्याला शिकवतात, आपल्याला समजवतात. आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद.
- तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे.
- माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
- आईबाबांच्या रूपात गुरू आहे. या कलियुगात देवाच्या रूपात गुरू आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha).
- तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच शिकवलं लिहायला, गणितही शिकलो तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा.
- जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
- माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. हॅपी टीचर्स डे.
- मी भाग्यशाली आहे की, तुमच्यासारखा गुरू मिळाला. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करण्यात आलं आहे आणि हे पुरस्कार जातो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
- जर गोष्ट शिकवण्याची असेल तर तुमच्यापेक्षा चांगलं कोणी असूच शकत नाही. हॅपी टीचर्स डे.
- आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद.
- प्रिय टीचर आज मी जे काही आहे ते घडवण्यासाठी आभार. हॅपी टीचर्स डे.
- तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या एक खरी प्रेरणा आहात. तुम्ही मला फक्त आपलंस केलं नाहीतर आम्हाला घडवलं आहे.
- आई देते आयुष्य वडील देतात सुरक्षा
पण शिक्षक शिकवतात आपल्याला जगणं
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - रेषा काढता येत नव्हत्या तेव्हा
मला हातात पेन्सिल घेऊन शिकवलंत
माझ्या सर्व टीचर्सना हॅपी टीचर्स डे - मनात माझ्या ज्ञानाचा लावलात दीपक
अशा माझ्या गुरूवर्य शिक्षकांना प्रणाम
शिक्षक दिन शुभेच्छा - मला लिहायला-वाचायला शिकवल्याबद्दल धन्यवाद
मला योग्य-चूक काय ते ओळखणं शिकवलंत
माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद - मोठ्या स्वप्नांचा विचार देण्यासाठी
आकाशाला गवसणी घालण्याची शिकवण देण्यासाठी
मला साहसी बनवण्यासााठी
तुमचे खूप खूप आभार
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वाचा – Retirement Wishes In Marathi
शिक्षक दिन मराठी संदेश (Teacher’s Day Messages In Marathi)
- प्रिय टीचर, मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद. जर तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यासोबत असेल तर माझं यशही असंच कायम राहील. हॅपी टीचर्स डे.
- माझ्या आयुष्यातील प्रेरणा तुम्ही आहात. तुम्हीच मला सदैव सत्य आणि शिस्तीचा धडा दिला आहे. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (shikshak dinachya shubhechha).
- जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
- योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे.
- गुरूची उर्जा सूर्यासारखी, विस्तार आकाशासारखा…गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट…तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
- गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण.
- शांततेचा धडा दिला, अज्ञानाचा अंधकार केला दूर…गुरूने शिकवलं आम्हाला व्देषावरील विजय आहे प्रेम.
- गुरूवर्य तुम्हाला नमन करतो आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha) देतो.
- तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे आम्ही घडलो. आम्हाला तुमचा विद्यार्थी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
- पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान… आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे
- कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे. तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात. देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार.
- माझ्या मुलाचे पालक आणि चांगले मार्गदर्शक बनण्यासाठी खूप आभार. टीचर्स डेच्या शुभेच्छा
- एका मोठ्या हास्यासोबत मी आज माझ्या आवडत्या शिक्षकांना Happy Teachers Day.. Wish करते थँक्यू मला मेटोंर केल्याबद्दल.
- तुमच्याकडून शिकणं, तुम्हाला ऐकवणं, तुम्हाला विचारणं, तुमच्यासोबत हसणं, तुम्हाला जगातील चांगलं शिक्षक बनवतात.
- दिल ज्ञानाचं आम्हाला भंडार
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार
आहोत आभारी त्या गुरूंचे
ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार
शिक्षक दिन शुभेच्छा - तुम्ही आहात आमच्या जीवनाची प्रेरणा
दिलीत आमच्या करिअरला नवी दिशा
अशा आमच्या सर्व टीचर्सना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - असं घडवलंत तुम्ही की,
आज प्राप्त करू शकतो लक्ष्य
दिलात आम्हाला आधार तुम्ही
जेव्हा वाटलं होतं काहीच नाही शक्य
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा - बाई तुम्ही आजही आठवता आम्हाला
एकीकडे छडी मारलीत तरी
दुसरीकडे डोळ्यात तुमच्या असायची काळजी
अशा आमच्या बाई होत्या ज्यांनी आम्हाला घडवलं
बाई तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा - सर वर्गात येताच वाटायचा आदर
आजही ते दिसताच त्यांची भेट घेतोच
असे आमचे आवडते शाळेतले ……. सर
सर तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Best Wishes For Exam In Marathi
शिक्षकदिनासाठी खास व्हॉट्सअप स्टेटस (Happy Teacher’s Day Status In Marathi)
- बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी
- योग्य काय अयोग्य काय हे शिकवता तुम्ही…खरं काय खोटं काय हे समजवता तुम्ही…जेव्हा काही कळत नाही तेव्हा योग्य मार्ग दाखवता तुम्ही
- गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती…तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. Happy Teachers Day.
- आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…आम्हाला प्रेरित करण्यासाठी…आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…तुमचे खूप खूप धन्यवाद…हॅपी टीचर्स डे
- गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं…मला तेव्हा आधार दिला जेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत. मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण मनापासून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
- शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा (shikshak dinachya shubhechha).
- गुरूचा महिमा ना कधी होणार कमी, तुम्ही कितीही जरी केलीत प्रगती, गुरूचं देतो चांगल्या-वाईटाचं ज्ञान, तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टींची जाण.
- सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर नाही देत तो तुमच्यामध्ये तर तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी प्रेरित करतो. हॅपी टीचर्स डे.
- अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं फक्त एकचं गाणं गुरू तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं…. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (shikshak dinachya shubhechha).
- आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत. शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्ही शिकलो. आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत.
- आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, आमची काळजी घेणं, आम्हाला प्रेम देणं या गोष्टी तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवतात. हॅपी टीचर्स डे
- गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा… शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha).
- दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार…केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे…ज्यांनी आम्हाला घडवलं आज.माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन. हॅपी टीचर्स डे
- गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
- जगण्याची कला शिकवतात शिक्षक…ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक…फक्त पुस्तक असून नाही काही फायदा…जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.
- माझ्या रिटायर्ड शिक्षकांसाठी तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं करियर बनवलं आहे आणि त्यांचं आयुष्य घडवलंय. तुमचे खूपखूप आभार आणि तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. माझ्या आवडत्या शिक्षकांबाबत विचारल्यावर आजही मी तुमचंच नाव घेतो. हॅपी टीचर्स डे
- तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात तुम्हीच माझे गाईड आहात. माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात. मनापासून तुम्हाला धन्यवाद.
- शिक्षण संपते पण शाळा सुटत नाही
वर्गात नसलो तरी मनातली आठवण जात नाही
माझी प्रिय शाळा आणि सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा - अ, आ, ई चा प्रवास घडवते आई
प्रमेय, प्रयोग आणि इतर विषयांचा
प्रवास घडवतात ते शिक्षक
अशा माझ्या सर्व गुरूवर्यांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा - अभ्यासाठी गोडी लावली
आयुष्यात मोठी उडी घेण्यासाठी
आम्हाला सदैव प्रेरणा दिली तुम्ही
अशा आमच्या सर्व टीचर्सना
खूप खूप आदरयुक्त शिक्षक दिन शुभेच्छा - हिरे घडवतात ते हिऱ्याचे जाणकार
साध्या कापडातून पोषाख बनवतात ते विणकर
आणि साध्या मुलाचा विद्यार्थी घडवतात ते शिक्षक
सर्व मान्यवर गुरूंना आणि गुरूवर्य व्यक्तींना
माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - ना कळला असता पायथागोरस
ना कळली असती रसायनांची नावं
ना कळली असती ग्रहांची माहिती
ना कळला असता छत्रपतींचा पराक्रम
आम्हाला सर्वज्ञात करणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिक्षकदिनासाठी कविता (Teachers Day Poem In Marathi)
- आदर्शांचा पाया बनून
पाल्याचं जीवन साकारतात ते शिक्षक
गुलाबाप्रमाणे बहरून
सुंगध देतात आणि सुगंधित करतात ते शिक्षक
नित्य नवे प्रेरक कार्य घेऊन
प्रत्येक क्षणाला भव्य बनवतात ते शिक्षक
प्रेम सरितेची बनून धारा
आपली नाव पार लावतात ते शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- ज्ञानाचा दिपक ते लावतात
माता-पित्यानंतर तेच पूजनीय असतात
आई देते आपल्याला जीवन
वडील देतात सुरक्षा
पण आपल्या जीवनाला घडवतात
शिल्पकार म्हणून जाणले जातात ते शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha)
- शिक्षकांशिवाय ज्ञान नाही
शिक्षकांशिवाय मान नाही
आपलं जीवन यशस्वी बनवणाऱ्या
ज्ञानाचा दिपक तेवत ठेवणाऱ्या
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
- जेव्हा आपण पडतो तेव्हा तेच हात देतात
आयुष्याच्या नव्या वाटा दाखवतात
अंधःकारात दीप बनून
आपलं आयुष्य प्रकाशमय करतात ते शिक्षक
डोळ्यात अश्रू येताच आपला मित्र बनतात ते शिक्षक
अशा सर्व माननीय शिक्षकवर्गाला
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- अक्षर न अक्षर आपल्याला शिकवतात
जीवनाचा अर्थ आपल्याला समजवतात
तेच आपले खरे गुरू म्हणून ओळखले जातात
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा निमित्ताने
सर्व गुरूवर्यांना कोटी कोटी प्रणाम
- रोज सकाळी आपण भेटतो त्यांना
काय करायचे आहे आपल्याला सांगतात ते
अनेक दिग्गजांचे फोटो घेऊन
योग्य-अयोग्यचा भेद आपल्याला शिकवतात ते
कधी ओरडून तर कधी प्रेमाने
आपल्याला किती समजवतात ते
जे आहेत देशाचे भविष्य
त्यांचं भविष्य घडवणारे आहेत हे
देतात आपल्याला जीवनाचं ज्ञान
फक्त हेच आहे त्यांचं काम
तेच म्हणवतात शिक्षक तेच म्हणवतात शिक्षक
- गुरूंची अमृत वाणी
सदैव आपल्या राहील लक्षात
जे चांगल वाईट आहे
त्याची करू आपण परख
जो मार्ग मिळेल त्याचा
करू आपण सन्मान
चांगल्या आणि वाईटाची
आपण जेव्हा करू निवड
तेव्हा गुरूंची अमृतवाणी
नेहमी राहील लक्षात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षक सुविचार मराठी (Quotes By Sarvepalli Radhakrishnan In Marathi)
या शिक्षक दिन शुभेच्छा निमित्ताने आपल्या जीवनाला प्रेरणा देणारे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडलेले काही शिक्षक सुविचार मराठी नक्कीच शेअर करू शकता.
- शिक्षक ते नाहीत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात तथ्य जबरदस्ती थोपतात, शिक्षक तर ते असतात जे विद्यार्थ्यांना येत्या काळातील आव्हानासाठी तयार करतात.
- पुस्तकं वाचल्याने आपल्याला एकांतात विचार करण्याची सवय आणि खरा आनंद मिळतो.
- कोणतंही स्वातंत्र्य तोपर्यंत खरं नाही जोपर्यंत ते मिळवलेल्या लोकांना विचारांमार्फत ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही.
- पुस्तक असं एक माध्यम आहेत ज्यांच्यामार्फत विभिन्न संस्कृतींमध्ये पूल निर्माण करण्याचं काम केलं जातं.
- शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थितींमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये लढा देऊ शकेल.
- ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला शक्ती मिळते. प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला परिपूर्णता मिळते.
- तांत्रिक ज्ञानासोबतच आपल्याला आत्माची महानता प्राप्त करणंही आवश्यक आहे.
- शांतता ही राजकीय किंवा आर्थिक बदलाने नाहीतर मानवी स्वभावातील बदलाने प्राप्त होते.
- देवाची पूजा होत नाही तर पूजा त्या लोकांची होते जे देवाच्या नावावर बोलतात.
मग या आपल्या गुरूवर्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या आणि त्यांचे आभार माना.
हेही वाचा –
यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स
प्रेम..प्रेमाची गंमत…प्रेमाची व्याख्या सांगणारे Love Quotes
कधी कधी रडवणारे कोट्सही देतात आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा
Teachers day wishes in english
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade