DIY फॅशन

लग्नासाठी साधी साडी निवडली तर हेवी करा ब्लाऊज

Leenal Gawade  |  Dec 3, 2021
हेवी ब्लाऊज

 लग्न म्हटले की, लग्नात नेमके काय नेसावे कधीच कळत नाही.त्यात या कोव्हिड काळाने सगळ्यांना कमी बजेटमध्ये खरेदी कशी करायची हे चांगलेच शिकवले आहे. लग्नसराईसाठी साड्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. पण तुम्हाला लग्नासाठी खूप पैसा खर्च करायची इच्छा नसेल पण लग्नात तरीही उठून दिसायचं असेल तर काही हॅक्स तुम्हाला नक्कीच कामी येतील. काही जणांना खूप हेवी साड्या घेणे आर्थिक दृष्टया परवडणारे नसते तर काही जणांना हेवी साड्या घ्यायला देखील आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही हेवी ब्लाऊजची स्टाईल कॅरी केली तर ती अधिक चांगली दिसते. ब्लाऊजमध्येही तुम्हाला हल्ली असे काही प्रकार मिळतात जे तुम्हाला नक्की ट्राय करायला हवेत असे आहेत. 

हेवी स्लिव्हज

साडी म्हटली की, तिचा सगळा शो पदर आणि ब्लाऊजवर अवलंबून असतो. लग्नात स्लिव्हलेस ब्लाऊज घालणारे फारच विरळा असतील. शक्यतो सगळेच फुल स्लिव्हज किंवा थोडे लाँग स्लिव्हज घालणेच पसंत करतात. तुम्हीही अशाच प्रकारे ब्लाऊज शिवणार असाल तर त्यावर सुंदर वर्क करुन घ्या. बारीक काम करुन केलेले हे ब्लाऊज दिसायला खूपच सुंदर आणि हेवी दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज भरुन घेतला की, तुम्हाला साडीकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही. तुम्ही अगदी तुम्हाला हवी तशी साडी ड्रेप केली की, आपोआपच सगळ्यांचे लक्ष तुमच्या साडीपेक्षा ब्लाऊजकडे जाते.  या शिवाय हँडलुम ब्लाऊज हवे असतील तर त्याच्याही वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत.

वाचा- कलमकारी आणि इकत ब्लाऊजचा वापर करुन दिसा ट्रेंडी

कटवर्क ब्लाऊज

कटवर्क साडी हा सध्या सगळ्यांच्याच आवडीचा असा प्रकार आहे. हल्ली कटवर्कमध्ये इतके प्रकार पाहायला मिळतात की, तुम्हाला पाहिल्यानंतरच हा ब्लाऊज जास्त आकर्षक दिसतो. तुमच्या साडीवर आलेल्या ब्लाऊज पीसचा उपयोग करुन तुम्हाला कटवर्क करता येऊ शकते. फुलांच्या, पक्ष्यांच्या अशा वेगवेगळ्या आकारात तुम्हाला कटवर्क करता येतात. कटवर्कमध्ये फुलांच्या कडा तुम्हाला अगदी स्पष्ट दिसतात. त्यामुळे हे ब्लाऊज दिसायला खूपच सुंदर आणि उठावदार दिसतात. ब्लाऊज शिवण्याआधी काही गोष्टी नक्की माहीत करुन घ्या. मग ते शिवायला टाका

वेलवेट ब्लाऊज

हल्ली ब्लाऊजमध्ये आणखी एक ट्रेंड चांगलाच पाहायला मिळत आहे तो म्हणजे वेलवेट ब्लाऊज. दिसायला एकदम रिच आणि कोणत्याही साडीचा लुक दुपटीने अधिक चांगला करणारा हा प्रकार तुमची साडी अगदीच साधी असेल तर वापरायला काहीच हरकत नाही असा आहे. तुमच्याकडे एकतरी ब्लाऊज हा वेलवेटचा असायलाच हवा. तरच तो जास्त चांगला उठून दिसतो. त्यामुळे तुम्ही लग्नात एकतरी असा वेलवेट ब्लाऊज घ्या. त्यावर जर तुम्हाला शक्य असेल तर थोडे वर्क करुन घ्या. थ्रेड वर्क केलेले ब्लाऊज सुद्धा यावर खूप चांगले उठून दिसतात. त्यामुळे तुम्हाला तसे काही ट्राय करायलाही काहीच हरकत नाही. 

हे तीन प्रकार तरी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नवरी असल्याचा फिल आल्यावाचून राहणार नाही. 

अधिक वाचा

खणाच्या या ब्लाऊजचा ट्रेंड जो या फेस्टिव्ह सीझनसाठी आहे परफेक्ट

जाणून घ्या प्री प्लेटिंग साड्यांचा ट्रेंड, चापून चोपून बसतात या साड्या

सणासुदीला एथनिक लुक करत असाल तर या चुका मुळीच करू नका

Read More From DIY फॅशन