Combination Skin

चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी उपाय (Pimple Che Dag Janyasathi Upay)

Leenal Gawade  |  Mar 30, 2019
Home Remedies For Acne Scars In Marathi

सुंदर, नितळ चेहरा कोणाला आवडत नाही म्हणा. पण चेहरा नेहमीच छान, टवटवीत असणाऱ्या व्यक्ती अगदी हातावर मोजण्याइतक्या असतील. मासिक पाळी, ऊन्हात सतत फिरणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. काहींना मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर काहींना तेलकट पदार्थ खाऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात.  एखादा जरी पिंपल चेहऱ्यावर आला तर आपण त्याला घालवण्यासाठी अनेक उपाय (pimples janyasathi upay marathi) करतो. पिंपल्स फोडू नये असे सांगितले जाते म्हणून आपण त्यांना हात पण लावत नाही. पण तरीही अनेकदा पिंपल्स गेले तरी त्याचे डाग राहतात त्यांनाच आपण मुरुमांच्या चट्टे असे म्हणतो. यामुळे तुमची त्वचा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक खराब वाटू लागते.

मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय 

मुरुमांच्या चट्टे वर इलाज करण्याची गरज काय

घरच्या घरी पिंपल्सचे डाग घालवतील असे १० फेसपॅक

त्वचेसाठी हे टाळा

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी टिप्स

मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय?(What Is Acne Scar In Marathi)

पिंपल्स बसल्यानंतर जे डाग तुमच्या चेहऱ्यावर राहतात त्याला मुरुमांच्या चट्टे असे म्हणतात. तुम्हालाही कधी काळी पिंपल्स असतील तर तुम्ही तुमचा चेहरा नीट निरखून पाहा जर तुम्ही न राहवून तुमचे पिंपल्स फोडले असतील तर त्याचे डाग तुमच्या चेहऱ्यावर राहतात. ते डाग कितीही केले तरी जाता जात नाही आणि तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आता मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय हे तुम्हाला कळले असेलच.

मुरुमांच्या चट्टे वर इलाज करण्याची गरज काय? (Impact Of Acne In Marathi)

आरोग्याशी निगडीत कोणतीही तक्रार असली की, आपण त्यावर योग्य इलाज करतो. त्वचेच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. तुमच्या चेहऱ्यावर काहीही झाले असेल तर त्यावर योग्यवेळी इलाज करणे गरजेचे असते. मुरुमांच्या चट्टे अथवा चेहऱ्यावरील खड्डे या बाबतीतही तसेच आहे. पिंपल्सचा योग्यवेळी इलाज (pimples janyasathi upay marathi) नाही केला तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. यासाठीच चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला माहीत असायलाच हवे.

1. चेहरा काळवंडणे (Discoloration)

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या चट्टे जास्त काळासाठी राहिले तर तुमचा चेहरा काळवंडतो. कारण पिंपल्स गेल्यानंतर काळे डाग जाण्यासाठीचे उपाय करणं अनेकजण सोडून देतात. त्यामुळे पिंपल्सचे चेहऱ्यावरील काळे डाग तिथेच राहतात.

उदा.काही जणांना कपाळावर पिंपल्स येतात. जर ते पिंपल्स तसेच राहिले तर त्यांचे फक्त कपाळ काळे राहिलेले दिसतात. तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेकांना पाहिले असेल ज्यांच्या चेहऱ्यावरील काही भाग हा त्यांच्या इतर भागांपेक्षा काळवंडलेला दिसतो. त्यामुळे त्यांचे पहिले इंप्रेशन अस्वच्छ असे होते.

 2. चेहऱ्यावर खड्डे पडणे (Bump On Skin)

काहींना चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील खड्ड्यांमध्ये पू देखील साचतो. अनेक जण ते हातानेच फोडतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसायची आशा धूसर होऊन जाते. एकदा तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडले की, मग तुमची त्वचा एकसारखी करण्यासाठी तुम्हाला अनेक इलाज करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.

उदा. काही जण पिंपल्स आले की, ते लवकर जाण्यासाठी हातानेच फोडतात किंवा पिनेने वापरतात. त्यांना तात्पुरते बरे वाटते पण नंतर जेव्हा त्याचे डाग आणि खड्डे दिसू लागतात तेव्हा काय करायचे असे होते.

वाचा – फेशियलचे प्रकार (Types of Facial In Marathi)

3. चेहऱ्यावरील तेज निघून जाणे (Dull Skin)

आता तुमच्या त्वचावर काळे डाग आणि खड्डे असतील तर तुमचा चेहरा कसा काय चांगला दिसू शकेल. तुमच्या त्वेचतील तेज निघून जाते. तुम्ही मेकअपने डाग लपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमचा त्वचा तात्पुरती चांगली दिसू शकेल. पण मेकअप काढल्यानंतर तुमचा चेहरा पुन्हा तुमचा चेहरा डल दिसू लागते.

आता तुमच्या चेहऱ्यावरही मुरुमांच्या चट्टे असतील आणि तुम्हाला सध्या खूप पैसे घालवण्याची इच्छा नसेल तर तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय करु शकता. आम्ही तुमच्यासाठी १० फेसपॅक  काढले आहेत. जे तुमच्या डागांवर काम करु शकतील. मग आता हे फेसपॅक कोणते ते पाहूया.

घरच्या घरी पिंपल्सचे डाग घालवतील असे १० फेसपॅक (Homemade Facepacks For Acne Scars In Marathi)

पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग घालवणे हे फार महत्वाचे असते. तुम्ही जर घरच्या घरी हे डाग घालवण्याचा विचार करत असाल तर घरच्या घरी हे 10 फेसपॅक वापरु शकता. यासाठीच जाणून घ्या हे पिंपल्स चे डाग घालवण्यासाठी उपाय

1. केळ्याचा सालीचे मास्क (Banana Mask)

2. अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

3. ओट्स आणि मध फेसपॅक (Oats And Honey Facepack)

4. अंड्याचा मास्क (Egg Mask)

5. कडुनिंब फेसपॅक (Neem Face Pack)

6. नारळाचे पाणी (Coconut Water)

7. बेकिंग सोडा मास्क (Baking Soda Mask)

8. व्हिटॅमिन E तेल (Vitamin E Capsule)

9. ग्रीन टी (Green Tea)

10. बटाटा मास्क (Potato Mask)

*वरील दिलेले सगळे फेसपॅक एकाचवेळी लावून पाहू नका. तुम्हाला एखादा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर काम करत आहे असे वाटत असेल तर तोच वापरा. आठवड्यातून २ वेळा हे फेसपॅक लावा.

हे आहेत चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

त्वचेसाठी हे टाळा (Things You Should Never Do To Your Skin In Marathi)

1. गरम पाण्याने आंधोळ केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर कोणतेही क्रिम लावू नका. त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. कारण गरम पाण्यामुळे तुमचे पोअर्स ओपन होतात. त्यात जर क्रिम गेली तर ऊन लागून त्याचे आणखी भयंकर परिणाम होऊ शकतात.

2. काही तेलकट पदार्थ खात असाल तर हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला हात लावू नका. कारण त्यामुळेही तुमच्या त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.

3. पिंपल्स आल्यानंतर घरच्या घरी प्रयोग करत असताना पिंपल्स फोडू नका. विशेषत: सेफ्टी पिन्स, टाचणी याने फोडण्याचा प्रयत्न तर अजिबात करु नका.  

4. पिंपल्स फोडल्यानंतर त्यावर काहीही लावू नका.कारण तुम्ही तुमच्या नाजूक भागाला दुखापत केलेली असते. तुम्ही त्यावर तातडीने काही लावले तर तुमची त्वचा अधिक जळजळू शकते.

5. त्वचेचा प्रकार ओळखल्याशिवाय तुम्ही चेहऱ्यावर कोणतेही प्रयोग करु नका.

त्वचेसाठी हे करा (Skin Care Tips In Marathi)

1. बाहेरुन घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप काढून मगच चेहरा फेसवॉशने धुवा. मेकअप काढताना डोळ्यांचा मेकअप अतिशय काळजीपूर्वक काढा.

2. चेहरा चांगला टवटवीत दिसावा म्हणून चांगल्या गोष्टींचे सेवन करा. उदा. फळ, भाज्या, मांस, मटण आहारात असू द्या. तेलकट, चमचमीत पदार्थ आहारातून कमी करा. 

3. पाणी पिण्याची सवय ही सगळ्याच दृष्टिकोनातून चांगली. त्यामुळे दिवसातून किमान ५ ते ६ लीटर पाण्याचे सेवन करा. 

4. मासिळ पाळी, टेन्शन्स अशा काळात पिंपल्स येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अगदीच पॅनिक होण्याची काहीच गरज नाही.

5. जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स हे जातच नसतील तर मात्र योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेच फायद्याचे असते.

फोटो सौजन्य- Shutterstock, Instagram

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:

How To Get Rid Of Pimples In Marathi

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

Read More From Combination Skin