DIY सौंदर्य

घरच्या घरी बदामापासून बनवा वॉटरप्रुफ आयलायनर

Leenal Gawade  |  Jan 12, 2020
घरच्या घरी बदामापासून बनवा वॉटरप्रुफ आयलायनर

तुम्हाला घरच्या घरी काही गोष्टी करुन पाहायला आवडत असतील तर तुमच्यासाठी आम्ही आज खास एक DIY रेसिपी आणली आहे. तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवणाऱ्या आयलायनरचा वापर करायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी आयलायनर बनवू शकता तेही वॉटरप्रुफ… हे वॉटरप्रुफ्र आयलायनर बनवण्यासाठी आपण करणार आहोत बदामाचा वापर…मग आता हे आयलायनर कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा उपयोग आणि खुलवा सौंदर्य

घरच्या घरी बदामाचे आयलायनर बनवण्यासाठीची कृती

Instagram

  1.  तुमच्या घरी असलेले कोणतेही बदाम तुम्हाला चालू शकतील. 
  2. साधारण एक वाटीभर बदाम तुम्ही घेतले तर तुम्हाला यापासून भरपूर आयलायनर बनवता येईल. 
  3. यासाठी तुम्हाला एखादे असे भांडे लागेल जे काळं झालं तरी तुम्हाला फरक पडणार नाही. 
  4. बदाम छान कुटून घ्या. एका भांड्यात बदाम घेऊन त्यामध्ये जाळ पेटवा.( तुम्ही एक एक बदामही जाळून घेऊ शकता. पण त्यामध्ये वेळ लागतो.) 
  5. बदामातून छान धूर येऊ लागल्यानंतर आणि ते काळे होईपर्यंत तुम्हाला ते काळे होऊ द्यायचे आहेत. 
  6. बदाम छान खरपूस जळाल्यानंतर तुम्हाला ते बारीक वाटून घ्यायचे आहेत. असे करताना तुमच्या बदामाचे तेल वर येईल. त्यामुळे त्यामध्ये थोडा ओलसरपणा नक्कीच येईल. 
  7. पण याला अधिक स्मुथ आणि छान करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये अगदी थोडसं अॅलोवेरा जेल घाला. असे करताना तुम्ही ते फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या 
  8. तयार आयलायनर तुम्हाला ब्रशच्या मदतीने लावता येईल. 
  9. हे आयलायनर जर तुम्ही नीट वापरले तर ते चांगले टिकू शकते. 
  10. आयलायनरमध्ये बदामाचे तेल असल्यामुळे ते आयलायनर निघत नाही. ते छान टिकून राहते आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
  11. तयार आयलायनर एका एअरटाईड कंटेनरमध्ये भरुन ठेवा. तुम्ही हे आयलायनर फ्रिजमध्ये ठेवले तरी तुम्हाला चालू शकेल. 
  12. आयलायनर जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही वापरत असलेला ब्रश कायम स्वच्छ वापरा.

DIY Body Mask: त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा घरगुती बॉडी मास्क

असे लावता येईल तुम्हाला हे आयलायनर

Instagram

आता तुम्ही आयलायनर वापरताना किंवा करताना एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी ते म्हणजे आयलायनर चांगलं बारीक वाटलं गेलं पाहिजे. कारण आयलायनर स्मुथ आणि चांगलं लागलं गेलं नाही तर ते अजिबात चांगल दिसत नाही. तुम्ही याचा वापर काजळ म्हणून ही करु शकता. हे काजळ ऑरगॅनिक असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. तुम्ही तेलाचा उपयोग करुन हे काजळ अगदी आरामात काढू शकता. तुम्हाला याचा कोणताही त्रास होणार नाही.

आता घरच्या घरी तुमच्यासाठी अस वॉटरप्रुफ आयलायनर बनवा आणि त्याचा वापर करा. बनवल्यानंतर आम्हालाही नक्की कळवा ते कसं झालं आहे ते

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From DIY सौंदर्य