Diet

मधुमेह घरगुती उपाय करा | Diabetes Home Remedies In Marathi

Dipali Naphade  |  Jun 4, 2019
मधुमेह घरगुती उपाय - Diabetes Home Remedies In Marathi

मधुमेह हा एक असा आजार आहे जो रक्तातील साखरेचं अथवा ग्लुकोजचं प्रमाण वाढल्यामुळे होतो. इतकंत नाही तर तुम्ही खूपच ताणतणावाखाली असाल तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढूनदेखील मधुमेह होण्याची शक्यता असते. आजकाल मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मधुमेह हा असा आजार आहे, जो होणार असेल तर त्याची कोणत्याही प्रकारची लक्षणं पटकन लक्षात येत नाही.पण एकदा हा आजार झाला की, यातून बाहेर पडणं तसं कठीण आहे. असं म्हटलं जातं की, मधुमेह हा एक सायलेंट किलर विकारांपैकी एक आहे. मधुमेह जरी पूर्ण बरा करता येत नसला तरी मधुमेह नियंत्रणात ठेवणं नक्कीच शक्य आहे. यासाठी तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करणं फार गरजेचं आहे. कारण दैनंदिन जीवनात थोडेफार बदल करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता. पण बऱ्याचदा आपल्या खाण्याच्या सवयींमुळे हे होत नाही. कदाचित तुम्हाला असं वाटतं की, मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप उपचारांची गरज आहे. पण त्याची खरंच काही गरज नाही. जाणून घेऊया मधुमेह घरगुती उपाय (Home Remedies For Diabetes In Marathi). 

मधुमेह का होतो? (What Is Diabetes)

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधुमेह होण्याची कारणे हे जाणून घेणं आवश्यक आहे. मधुमेह (madhumeh in marathi) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये तुमच्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण ज्याला आपण ग्लुकोज असं म्हणतो ते अती प्रमाणात वाढते. वास्तविक ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जा मिळते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून ग्लुकोज तयार होत असतं. मधुमेहामुळे शरीराला स्वादुपिंडात इन्शुलिनचा पुरवठा कमी होतो. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रित होऊन वाढू लागतं. या आरोग्य स्थितीला मधुमेह अथवा डायबिटीस असं म्हणतात. इन्शुलिन हे एक हॉर्मोन असतं जे पचनग्रंथीतून स्त्रवतं. या हॉर्मोन्सचे काम खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जेची निर्मिती करणे हे असतं. मात्र मधुमेहामुळे इन्शुलिनच्या निर्मितीत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरातील ग्लूकोज प्रमाणापेक्षा अधिक वाढू लागते. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अचानक वाढू लागल्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय तुम्ही प्रत्येक गोष्टीचा ताण घेत असाल तर मधुमेह होण्यास ताणतणावही कारणीभूत आहे. 

वाचा – ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय

मधुमेहाचे प्रकार (Types Of Diabetes)

काही संशोधनानुसार महिलांपेक्षा पुरूषांमध्ये मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेहाचे मुख्य चार प्रकार आहेत.

टाईप 1 मधुमेह (Type 1 Diabetes)

या प्रकारच्या मधुमेहामध्ये इन्शुलिनची निर्मिती कमी होते अथवा पूर्णपणे बंद होते. हा मधुमेह होण्याचे कमी प्रमाण असले तरी काही केसेसमध्ये हा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साधारणपणे 12 ते 25 या वयातील मुलांना हा मधुमेह झाल्याचे आढळून येते. आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार भारतात 1 ते 2 टक्के टाईप 1 मधुमेहाचे रुग्ण आहेत.

टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes)

टाईप 2 मधुमेह झालेल्या लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण इतक्या प्रमाणावर वाढते की ते नियंत्रणात आणणे कठीण जाते. या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती करू शकत नाही. हा मधुमेह अशा लोकांना होण्याचा धोका अधिक असतो ज्यांचे बीएमआय 32 पेक्षा अधिक आहे. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि काही वेळा आई-वडीलांना मधुमेह असल्यास टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

जस्टेशनल मधुमेह (Gestational Diabetes)

गरोदरपणी होणाऱ्या मधुमेहाला जस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात. या मधुमेहाच्या प्रकारात गरोदर महिलांच्या शरीरातील रक्ताची पातळी अचानक वाढते. वास्तविक या महिलांना प्रेगन्सी आधी कोणत्याही प्रकारचा मधुमेह झालेला नसतो. तरीही त्यांना गरोदरपणी या मधुमेहाचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत इन्शुलिनच्या मदतीने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. बाळंतपणानंतर या महिलांचा मधुमेह पूर्ण बरादेखील होतो.

वाचा – जाणून घ्या रक्ताचा कर्करोग, लक्षणे

प्री-डायबिटीस (Pre Diabetes)

या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील रक्ताची पातळी थोड्या प्रमाणात वाढते मात्र तिचं प्रमाण अधिक नसते. त्यामुळे याचा अर्थ तुम्ही मधुमेही आहात असा मुळीच होत नाही. मात्र याला मधुमेह होण्याचे पूर्वलक्षण असं नक्कीच म्हणता येईल. जीवनशैलीत चांगले बदल आणि संतुलित आहार घेऊन तुम्ही या मधुमेहापासून सुटका करून घेऊ शकता.

POPxo Recommandation Blood Gloucos Meter, Rs. 1245

मधुमेहाची लक्षणं (Symptoms Of Diabetes)

साधारणतः टाईप 1आणि टाईप 2 मधुमेहाची लक्षणंही सारखीच असतात. जाणून घेऊया नक्की काय लक्षणं आहेत मधुमेहाची –  

मधुमेहापासून वाचण्यासाठी घ्यायची काळजी (Prevention Of Diabetes)

मधुमेहापासून वाचण्यासाठी तुम्ही आधीपासूनच काळजी घ्यायला हवी. तुमच्या धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला काही वेळ स्वतःसाठी काढणं अत्यंत गरजेचं आहे. नक्की काय काळजी घ्यायला हवी ते पाहुया –

व्यायाम (Do Exercise)

मधुमेह (madhumeh in marathi) रोखण्यासाठी व्यायाम हा त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. आठवड्यातून तुम्ही कमीत कमी 150 मिनिट्स तरी व्यायाम करायला हवा. अॅरोबिक्स, जिम्नॅस्टिक्स आणि जलद चालणं हे व्यायाम मधुमेही व्यक्तींसाठी अतिशय उत्तम आहेत. तुम्ही हलके व्यायाम करून आधी सुरु करू शकता आणि नंतर याची तीव्रता वाढवा. मधुमेही व्यक्तींनी दर दीड तासानंतर आपल्या जागेवरून उठून चालायला हवं. तसंच इन्शुलिन घेणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही व्यायामापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

उत्तम आहार घ्या (Perfect Diet)

ब्रेड, पास्ता, तांदूळ असे अती स्टार्च असलेले अथवा अती कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा. तेल अथवा तूपापासून तयार केलेले पदार्थ कमी खा. त्याऐवजी उकडलेले आणि रोस्ट केलेले पदार्थ आहारात वाढवा. बाहेरचे विकत पदार्थ खाणे टाळा. प्रोसेस्ड फूड अथवा हवाबंद पदार्थ आहारातून पूर्ण वर्ज्य करा. आहारात ताक, मोड आलेली कडधान्य, फळे अथवा उकडलेलं अंड अशा गोष्टीचा समावेश करा. ज्यामुळे शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते जे ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते.

पुरेशी झोप घ्या (Enough Sleep)

तुम्हाला मधुमेहापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही पुरेशी झोप नक्की घ्या. तुमच्या शरीराला दिवसभरातून किमान 8 तास झोपेची आवश्यकता असते. त्यामुळे ती मिळणं अत्यंत आवश्यक असतं. तसंच विनाकारण रात्री उशीरापर्यंत जागत राहू नका.

वाचा – आराम मिळण्यासाठी करा मायग्रेन घरगुती उपाय

धुम्रपान टाळा (Don’t Smoke)

धुम्रपान करणं हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? याचा परिणाम तुम्हाला मधुमेह होण्यामध्येही होऊ शकतो. धुम्रपान केल्यामुळे तुमच्या शरीरातील कफदोष वाढून तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

वजन कमी करा (Maintain Ideal Body Weight)

तुमचं वजन जितकं जास्त असेल तितका तुमच्या शरीरामध्ये मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे तुमचं  वजन वाढलं आहे हे जाणवल्यावर लवकरात लवकर तुमचं वजन कमी करण्यावर लक्ष द्या. तसंच जास्त ताणतणावानेही वजन वाढतं. त्यामुळे ताणतणावापासून जास्तीत जास्त दूर राहायचा प्रयत्न करा.

व्यवस्थित पाणी प्या (Drink Enough Water)

पाणी तुमच्या शरीराचं हायड्रेशन नीट ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक असतं. तसंच तुम्हाला मधुमेह (madhumeh in marathi) होत असेल तर सतत तुम्हाला सतत तहान लागते. त्यामुळे असं होऊ द्यायचं नसेल तर तुमच्या शरीराला आवश्यक असल्याप्रमाणे दिवसभरात तितकं पाणी प्या.

ताणतणाव कमी करा (Avoid Stress)

चिंता आणि काळजी हे तुमच्या शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे महत्वाच्या गोष्टी आहेत. यासाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ताणाचे प्रमाण वाढल्यास तुमच्या शरीरातील कार्टिसोल या हॉर्मोन्सची निर्मितीदेखील वाढते. हे हॉर्मोन तुमच्या शरीरातील इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आणते. ज्यामुळे तुमची रक्तातील साखर अचानक वाढते. यासाठी नियमित योगासने, नृत्य अशा शारीरिक अॅक्टिव्हिटीज करा ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन निरोगी राहील. मधुमेह टाळण्यासाठी सतत आनंदी राहा.

फायबर डाएट (High Fiber Diet)

मधुमेहापासून दूर राहायचं असेल तर तुम्ही नेहमी हाय फायबर डाएट ठेवायला हवं. त्यामुळे तुम्ही मधुमेहापासून दूर राहू शकता.

विटामिन डी ची पातळी वाढवा (Optimize Vitamin-D Levels)

तुमच्या जीवनसत्व डी अर्थात विटामिन डी ची पातळी वाढवा. जेणेकरून तुम्हाला मधुमेहाशी व्यवस्थित झुंज देता येईल.  

प्रोसेस्ड फूड खाणं कमी करा (Avoid Processed Foods)

प्रोसेस्ड फूडमध्ये चरबीयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे तुम्ही असे पदार्थ खाणं टाळा. चरबी वाढून तुमची जाडी वाढते आणि त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.

मधुमेह घरगुती उपाय (Home Remedies For Diabetes In Marathi)

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपचार:

आवळा ज्युस (Amla Juice)

आवळा मधुमेहासाठी चांगली औषधी आहे. मधुमेह कमी करण्यासाठी तुम्हाला 10 ग्रॅम आवळ्याच्या रसामध्ये 2 ग्रॅम हळद पावडर मिक्स करा. हे मिक्स करून दिवसातून दोन वेळा हे मिश्रण प्या. यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहाते.

POPxo Recommandation – Patanjali Amla Juice, Rs. 110

मेथी दाणे (Fenugreek Seeds)

मेथी दाणे हे मधुमेहासाठी उत्कृष्ट औषध म्हणून ओळखले जातात. रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे पाणी प्या. यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. मेथी दाणे खाण्याचे फायदे होतात.

दालचिनी (Cinnemon)

महिनाभर रोज तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किमान एक ग्रॅम दालचिनीचा वापर करा. रोज जेवणात दालचिनी खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होईल. शिवाय तुमचं वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

तुळस (Bassil)

तुळशीच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट गुण आढळतात. त्यामुळे इन्सुलिनसाठी ही तुळशीची पानं सहायक ठरतात. रिकाम्या पोटी तुम्ही रोज तुळशीची दोन ते तीन पानं खाल्ल्यास अथवा एक चमचा रोज तुळशीचा रस प्यायल्यास, तुमचा मधुमेह कमी होण्यास मदत होते.

गुळवेल (Gulvel)

गुळवेल हा मधुमेहावरील चांगला आणि उत्कृष्ट उपाय आहे. गुळवेलामध्ये तुमचा मधुमेह कमी करण्याची क्षमता जास्त असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा गुळवेलाची पावडर तुम्ही एक ग्लास पाण्यात घालून प्यायल्यास, याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येईल.

गरम पाणी (Hot Water)

हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकेल. पण गरम पाणी हादेखील एक चांगला उपचार आहे. सकाळी उठल्यानंतर साधारण दोन ग्लास गरम पाणी  रिकाम्या पोटी प्या अथवा दर एक ते दोन तासाने तुम्ही गरम पाणी पित राहिलात तरीही तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी व्हायला मदत होते.

कारलं (Bitter Gourd)

कारल्याचा रस हा मधुमेहावरील सर्वात चांगला उपचार मानला जातो. हा रस अतिशय कडवट असला तरीही मधुमेही लोकांसाठी याची खूपच मदत होते. रोज सकाळी कडू कारल्याचा हा रस एक ग्लास रस प्यायल्यास तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात राहाते.

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुण असतात. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास आणि त्याची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे रोज दिवसातून किमान एकदा तरी ग्रीन टी प्यावा. यामुळे वजन कमी होण्यासदेखील मदत होते.

POPxo Recommandation – Lipton Green Tea, Rs. 60

केळ्याची पानं (Banana Leaf)

मधुमेह (madhumeh in marathi) असणाऱ्या रूग्णांना नियमित स्वरूपात दोन चमचे कडूलिंबाचा रस आणि त्यामध्ये चार चमचे केळ्याच्या पत्त्यांच्या रस मिसळून प्यायला द्यावा.

दातून (Datun)

सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता कडूलिंबाच्या दातूनने तुम्ही दात साफ करा आणि तो आलेला रस थुकून न देता तसाच गिळून टाका. या प्रक्रियेमुळे तुमचा मधुमेह कमी होण्यास मदत होते. या दातूनचा आलेला रस तुमच्या मधुमेहावर अतिशय चांगलं काम करतो आणि तुमचा मधुमेह कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

लवंग (Cloves)

लवंग हा मसाल्याचा प्रकार असला तरीही मधुमेहासाठी उपयुक्त आहे. तुम्ही रोज लवंगेची एक कळी खाल्ली तर त्याचा तुम्हाला मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो.

कडूलिंब (Neem)

कडूलिंबामध्ये मधुमेहावर मात करण्यारे अँटिऑक्सिडंट गुण आढळतात. त्यामुळे मधुमेहींसाठी कडूलिंब हा एक चांगला उपचार आहे.  तुम्ही रोज कडूलिंबाची पानं चघळलीत तरीही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

आळशी (Flax Seeds)

आळशी ही खरं तर बऱ्याच आजारांवर औषधी आहे. आळशी तुम्ही रोज चावून खा. त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.

कोरफड (Aloe Vera)

कोरफड हीदेखील अशी वनस्पती आहे जी अनेक आजारांवरील एकच औषध आहे. कोरफडची जेल ही मधुमेहासाठी लाभदायक असते.

कडिपत्ता (Curry Leaves)

कडिपत्त्यामध्ये कडवटपणा असतो जो मधुमेहासाठी मारक ठरतो. त्यामुळे तुम्ही रोज कडिपत्त्याची पानं चावून खाल्लीत तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. 

मधुमेहासंबंधित प्रश्न – उत्तर / FAQs

1. अती प्रमाणात मीठ खाण्याने मधुमेह होतो का ?

मिठाचा अती वापर शरीरासाठी नक्कीच योग्य नाही. मात्र मीठ खाण्याने मधुमेह होत नाही. मधुमेहींना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेह हा एक मेटाबॉलिक आजार आहे. मधुमेह नसेल तर तुम्ही योग्य प्रमाणात मीठ जरूर खाऊ शकता.

2. मधुमेंहींनी साखर मुळीच खाऊ नये का ?

मधुमेहींच्या रक्तातील साखर नियंत्रित असेल तर फार कमी प्रमाणात साखरेचे पदार्थ खाण्यास हरकत नाही. मात्र अती प्रमाणात गोड पदार्थ खाणे टाळावे.

3. मधुमेहींनी फळे खावीत का ?

निसर्गाने प्रत्येक फळामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात दिलेली आहेत. त्यामुळे निरोगी जीवनासाठी फळांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. मात्र मधुमेंहींनी अती गोड फळे कमी प्रमाणात खावीत. मधुमेही व्यक्तींंनी सफरचंद, पेरू, संत्रे अशी फळं अवश्य खावी.

फोटो सौजन्य – Shutterstock

Read More From Diet