Care

केस तुटण्याची कारणे आणि त्यावरील हमखास उपाय (Home Remedies For Hair Breakage In Marathi)

Dipali Naphade  |  Sep 3, 2020
Home Remedies For Hair Breakage In Marathi

 

केस तुटणे अथवा केस गळणे ही महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच सतावणारी समस्या आहे. याची अनेक कारणं असू शकतात. बऱ्याचदा आपण त्यासाठी वेगवेगळ्या उपचारांचा विचार करत असतो. पण केस नक्की का तुटतात आणि यावर काही ठोस उपाय आहेत का? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो तेव्हा त्याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. या समस्येवरील काही हमखास उपाय आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. या लेखामध्ये सांगितलेले उपाय तुम्ही करून पाहा आणि त्याचा योग्य परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या केस तुटण्याची समस्या खूपच गंभीर असेल तर तुम्ही वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेणं योग्य आहे. हे उपाय तुम्हाला नक्कीच परिणामकारक ठरतील. मात्र केस तुटण्याचं प्रमाण अधिक असल्यास, तुम्ही डॉक्टरांकडे जायलाच हवे. त्याआधी आपण नक्की कारणे काय आहेत ते जाणून घेऊ.

केस तुटण्याची कारणे (Causes Of Hair Breakage In Marathi)

Shutterstock

 

केस तुटण्याची अनेक कारणं आहेत त्यापैकी काही महत्त्वाची कारणं आम्ही इथे सांगत आहोत. 

अनुवंशिकता – केस तुटण्याचे मुख्य कारण आहे अनुवंशिकता. तुमच्या कुटुंबात कोणालाही ही समस्या असेल तर त्यामुळे तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. 

शारीरिक अथवा भावनात्मक तणाव – शारीरिक अथवा भावनात्मक तणावाचा परिणाम केस तुटण्यावर अधिक होत असतो. तुम्ही केस विंचरल्यावर अथवा केसांमधून आंघोळ केल्यानंतर जर भरभरून केस हातात येत असतील तर ही समस्या नक्कीच गंंभीर आहे आणि त्याचा वेळीच उपाय करायला हवा. 

शारीरिक अथवा भावनात्मक तणावामुळे केस तुटण्याचे  काही प्रकार आहेत – 

केस तुटण्याची अथवा गळण्याची काही अन्य कारणे 

वाचा – डोक्यात फोड येणे यावर उत्तम उपाय

केस तुटण्यावरील उपाय (Home Remedies For Hair Breakage In Marathi)

 

केस तुटण्यावर आपल्याला अनेक उपाय करून पाहता येतात आणि हे त्यावर परिणामकारकदेखील आहेत. लांब केसांसाठी या उपायांचा अवलंब करा इथे आम्ही तुम्हाला याचा कसा उपयोग करून घ्यायचा याचीही माहिती देत आहोत.

नारळाचे तेल (Coconut Oil)

Shutterstock

 

साहित्य 

आवश्यकतेनुसार नारळाचे तेल 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

नारळाच्या तेलाचा उपयोग बऱ्याच हेअर उत्पादनांमध्ये केला जातो. नारळाचे तेल केसांना तुटण्यापासून वाचवते. हे अतिशय हलके असते आणि केसांना अगदी आतपर्यंत जाऊन पोषण देते. केस धुण्यापूर्वी अथवा नंतर नारळाच्या तेलाचा उपयोग केसांमध्ये प्रोटीन राखण्यासाठी होतो. ज्यामुळे केसांची न तुटता वाढ होते. तसंच नाराळाच्या तेलाचा उपयोग केस तुटण्याची जोखीम कमी करण्यासाठी होतो. 

कांद्याचा रस (Onion Juice)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

एनसीबीआयच्या वेबसाईटवर असलेल्या एका शोधानुसार कांद्याचा रस हा केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसंच केस तुटण्याच्या समस्येवर याचा खूपच चांगला परिणाम होतो आणि अत्यंत प्रभावकारी आहे. त्यामुळे साधारण पंधरा दिवसांनी तुम्ही याचा वापर केसांवर करू शकता. तसंच तुमचे केस मऊ आमि मुलायम राखण्यास मदत करतात. 

कडिपत्ता (Curry Leaves)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

अनादी काळापासून केसांसाठी कडिपत्त्याचा उपयोग केला जातो. हे केसांसाठी एक टॉनिकप्रमाणे काम करते आणि केसांचा नैसर्गिक रंग राखून ठेवण्यासह केस तुटण्यापासूनही वाचवते. इतकंच नाही तर केस पांढरे होण्याची जोखीमही यामुळे कमी होते. कढीपत्ता पाने केसांचे मुखवटे केस खराब होण्याचे प्रमाण कमी करते म्हणून केस अधिक निरोगी ठेवण्यास मदत करतात.

अंडे (Egg)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर

अंडे हे केसांना निरोगी ठेवण्यासाठी अतिशय प्रभावकारी माध्यम आहे. हे केवळ केसांना निरोगी ठेवत नाही तर केसांना तुटण्यापासूनही वाचवते. केसांसाठी अंड्यातून तुम्ही ऑलिव्ह ऑईल, मध आणि दह्याचाही उपयोग करून घेऊ शकता. केस तुटण्यापासून वाचविण्यासाठी हा उत्तम उपाय समजण्यात येतो. 

वाचा – केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय

आवळा (Amla)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

आवळ्याचा उपयोग हेअर टॉनिक प्रमाणे करण्यात येतो. आवळ्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण थांबून केस मजबूत होतात. नारळ तेलासह याचा उपयोग केल्याने केस तुटण्याच्या प्रमाणाला आळा बसतो. त्याशिवाय आवळा केसांना पोषण देतो आणि केस अधिक निरोगी होतात. केवळ केसांना लावल्यानेच नाही तर आवळ्याचे सेवन केल्यानेही केसांना फायदा मिळतो. आवळ्यामध्ये विटामिन सी असते जे केसांना तुटण्यापासून वाचवते. 

यष्टीमधु (Mulethi)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

यष्टीमधुचा उपयोग केसांसाठी टॉनिक म्हणून केला जातो. केस तुटण्याची समस्या अधिक प्रमाणात असेल तर याचा उपयोग होतो. याचा शँपू तयार करून केसांना निरोगी राखता येते. ही एक वनस्पती असून केसांवर याचा बऱ्याच कालावधीपासून उपयोग करण्यात येत आहे. केसगळती आणि केस तुटण्यावर याचा अधिक चांगला परिणाम होते असे दिसून आले आहे. 

ग्रीन टी (Green Tea)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

केसांसाठी ग्रीन टी चा फायदा होतो. ग्रीन टी मध्ये एपिगॅलोकॅटेचिन 3 गॅलेट नावाचे पॉलीफेनोल असते. जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. तसंच एलोपेसियासाठीही याचा फायदा होतो. त्यामुळे केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी होते. तुम्ही याचा उपयोग आठवड्यातून एक दिवस करून घेऊ शकता. 

दही (Curd)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

दही प्रोबायोटिक्सचे एक स्रोत आहे. एनबीआयईच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या एका शोधानुसार प्रोबायोटिक्चा उपयोग केसांचा विकास आणि त्यांना घनदाट बनविण्यासाठी होत असतो. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊन केस अधिक घनदाट होतात. 

जास्वंद (Hibiscus)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे

याशिवाय  जास्वंदीच्या पानांचाही उपयोग करून घेता येतो 

साहित्य

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

जास्वंदीचे फुल आणि पाने हे केसांसाठी अत्यंत लाभदायक असते. जास्वंदीच्या फुलाची माहिती जाणून घेताना केस वाढण्यासाठी याची मदत होते. फुलांपेक्षाही याची पाने अधिक गुणकारी आहेत. केसांचे तुटणे आणि केसगळती थांबविण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. 

रोझमेरी तेल (Rosemary Oil)

Shutterstock

 

साहित्य 

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

रोझमेरी तेलाचा उपयोग केसांसाठी फायदेशीर ठरतो. रोझमेरी तेल अथवा त्यांच्या पानांचा उपयोग हा केसांच्या वाढीसाठी आणि केसांचे तुटणे थांबविण्यासाठी करण्यात येतो. 

कोरफड (Aleo Vera)

Shutterstock

 

साहित्य 

कोरफडे ताजे पान

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

त्वचेप्रमाणेच केसांसाठी कोरफड अत्यंत उपयुक्त ठरते. केसांची तुटण्याची समस्या अथवा केसगळतीची समस्या असेल तर त्यासाठी कोरफड उत्तम पर्याय आहे. केस निरोगी राखण्यसाठी याची मदत होते. बदाम अथवा एरंडाच्या तेलासहदेखील तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. 

शिकाकाई (Shikakai)

Shutterstock

 

साहित्य 

तुम्हाला हवं तर तुम्ही आवळा, रीठा, शिकाकाई आणि हिना याचं मिश्रण असणारी पावडरही वापरू शकता.

कसे वापरावे 

कसे आहे फायदेशीर 

शिकाकाई एक हर्बल वनस्पती आहे. याचा उपयोग केस वाढण्यासाठी अनादी काळापासून करण्यात येत आहे. शिवाय याचे शँपू बनविण्यात येतात. केसांमध्ये कोंडा होऊ नये आणि केस तुटू नयेत यासाठी शिकाकाईचा उपयोग करण्यात येतो. 

केस तुटणे कमी होण्यासाठी योग्य डाएट (Diet To Avoid Hair Breakage In Marathi)

Shutterstock

केस तुटणे थांबवायचे असेल तर या उपायांसह तुम्ही योग्य डाएटही फॉलो करणं आवश्यक आहे. तुम्ही जर योग्य आहार घेतला तर तुमचे केस अधिक चांगले राहतील. केसांना आवश्यक असणारी पोषक तत्व ही आहारातूनही मिळत असतात. सुंदर केस मिळविण्यासाठी घरगुती उपचार जाणून घ्या त्यामुळे योग्य डाएटमध्ये कशाचा समावेश असायला हवा जाणून घेऊया.

अंडे – केसांच्या वाढीसाठी आणि केस तुटू न देण्यासाठी अंडे आवश्यक आहे. अंड्यामध्ये प्रोटीन असते जे केसांसाठी आवश्यक असते. तसंच ज्या व्यक्ती अंडे खात नाहीत त्यांना प्रोटीन मिळण्यासाठी बदाम आणि मटार हे उपयुक्त आहार आहे. अंड्यात केवळ प्रोटीन नाही तर बायोटीनदेखील आहे, जे केसांसाठी लाभदायक आहे. 

ओमेगा 3 आणि 6 – ओमेगा 3 आणि 6 चे सेवन के केसांची गळती आणि तुटणे रोखण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. ओमेगा 3 साठी तुम्ही मासे, अक्रोड आणि ओमेगा 6 साठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता. 

आयरन – आयरन अर्थात लोह केसांना निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे आहारात पालक, मटार अथवा काळे चणे यांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. 

जिंक – पोषक तत्व म्हटलं की जिंक येतंच. यामुळे केसांचे तुटणे थांबते. आहारात चिकन, बदाम, ओटमील अशा खाद्यपदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. 

केस तुटणे वाचविण्यासाठी काही टिप्स (Tips To Stop Hair Breakage In Marathi)

केस तुटण्याचे आपण काही उपाय पाहिले पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात. केसांची काळजी घेण्यासाठी काही लहानसहान टिप्स आहेत ज्यामुळे तुमचे केस तुटणे वाचू शकते. तुम्ही या गोष्टी सहज लक्षात ठेऊन करू शकता. 

प्रश्नोत्तरे (FAQs)

1. केस नियमित कापत राहिल्यास, केसांचे तुटणे थांबते का?

नाही, असं काहीही नाही. केस कापत राहिल्यास ते तुटायचे थांबतात असं नाही. वास्तविक याचा प्रत्येक व्यक्तीनुसार फरक पडतो. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घ्यावी.

2. लहान केसांपेक्षा मोठे केस अधिक तुटतात का?

मोठे केस आहेत म्हणजे ते तुटणारच असं काहीही नाही. तुम्ही जर सतत केस घट्ट बांधले अथवा खेचत राहिलात तर केस तुटण्याची समस्या वाढते.

3. केस तुटू नयेत यासाठी काय खाऊ नये?

साखरयुक्त पदार्थ, जंक फूड, दारू, अधिक चहा आणि कॉफी याचे सेवन करणे केस तुटण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्हाला केसांना जपण्यसाठी याचे अधिक सेवन न करणे योग्य आहे. घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

Read More From Care