आरोग्य

खाल्ल्यानंतर फुगत असेल पोट तर करा हे घरगुती उपाय आणि मिळवा सुटका

Dipali Naphade  |  Nov 30, 2020
खाल्ल्यानंतर फुगत असेल पोट तर करा हे घरगुती उपाय आणि मिळवा सुटका

घरामध्ये असो बाहेर असो बऱ्याचदा जेवण इतकं स्वादिष्ट असतं की पोटाचा अंदाज न येता आपण अतोनात पोट भरेपर्यंत जेवत असतो. पण त्याचा परिणाम असा होतो की, पोट प्रचंड फुगतं अथवा त्याचा पोटाला त्रास होतो आणि पोट जड जड दिवसभर वाटत राहातं. जेवल्यानंतर अगदी एक दोन तासानेही ही समस्या तशीच राहिली तर तुम्हाला नक्कीच खाण्याचा त्रास झाला आहे हे समजा. त्यावर लवकरात लवकर तुम्ही उपाय करून पोट साफ होईल अथवा पोट हलके होईल याकडे वेळेवर लक्ष द्यायला हवे. खूप खाऊन पोट फुगले असेल तर काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला करता येतील. यामुळे तुमची ही समस्या पटकन सुटेल आणि तुम्हाला त्रासही होणार नाही. अगदी काही सोपे घरगुती उपाय  आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगत आहोत. तुम्ही पोट फुगल्याचे जाणवले अथवा आपण आज खूप खाल्ले आहे असे जाणवत असेल तर हे उपाय नक्की करा. 

मधाचा करून घ्या उपयोग

Shutterstock

मध हे बऱ्याच आजारांवरील रामबाण उपाय आहे. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हे अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करते. तुम्हाला खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही मधाचा उपयोग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कममी साधारणतः तीन ते चार वेळा एक एक चमचा मधाचे सेवन करा. यामुळे तुमचे पोट फुगले असेल तर कमी होऊन तुमचा त्रास कमी होतो. तसंच तुम्ही गरम पाण्यात मध घालून प्यायल्यास तुमची या समस्येतून लवकर सुटका होईल.  

बिनधास्त खा तळलेले पदार्थ, फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स

बडिशेप ठरते फायदेशीर

Shutterstock

आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर नेहमी जेवणानंतर बडिशेप खातो. पण ती का ठेवलेली असते त्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याचदा हॉटेल्समधल्या पदार्थांमध्ये सोडा घातलेला असल्याने जेवल्यानंतर पटकन पोट फुगतं. त्यावर बडिशेप हा उत्तम उपाय ठरतो. तुम्ही घरी जेवल्यानंतरही तुम्हाला जेवण जास्त झाले असेल अथवा पोट फुगले आहे असे वाटत असेल तर तुम्ही बडिशेपेचे सेवन करा. अथवा तुम्ही एक चमचा बडिशेप आणि एक चमचा खडीसाखर असे मिक्स करून खा. आठवडाभर तुम्ही असे सेवन केल्यास, पोट फुगण्याची तुमची समस्या दूर होते. तुम्ही सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा याचे सेवन केल्यास, उत्तम ठरते. 

घरबसल्या खूप खात असाल तर जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स

आळशीचे बी

Instagram

आळशीचे बी दिसायला अतिशय सामान्य दिसते पण याचा फायदा अप्रतिम आहे. आळशीचा नक्की उपयोग काय असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. पण जर तुम्हाला पोट फुगण्याचा त्रास असेल तर तुम्हाला आळशीचा अप्रतिम उपयोग करून घेता येतो. तुम्ही रात्री आळशी पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उठून हे पाणी प्या. यामुळे पोट फुगले असल्यास पटकन कमी होते. 

गॅसचा होतो त्रास मग करा हे घरगुती उपाय आणि मिळवा झटपट आराम

वेलची आहे उत्तम पर्याय

Instagram

वेलचीमध्ये असणारे घटक पोट साफ करण्यासाठी याचा उपयोग होतो. हलक्या गरम पाण्यात तुम्ही वेलची पावडर मिक्स करा आणि हे रोज सकाळी तुम्ही हे पाणी पिऊ शकता. जेवल्यानंतरदेखील तुम्ही वेलची पाणी पिऊ शकता. वेलचीमुळे पोटफुगी पटकन कमी होते. तुम्ही जेवल्यानंतर दातामध्ये वेलचीचे दाणे ठेऊनही चावू शकता. याचाही फायदा मिळतो.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य