DIY सौंदर्य

घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो (Homemade Face Serum)

Leenal Gawade  |  Mar 20, 2020
घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो (Homemade Face Serum)

त्वचा चांगली असण्यासोबतच त्वचेवर ग्लो असणे फारच आवश्यक असते. त्वचा चांगली दिसण्यासाठी आपण भरपूर पाणी पितो. चेहरा स्वच्छ ठेवतो, चेहऱ्याला आवश्यक असलेले फेशिअल करतो आणि बऱ्याच गोष्टी आपण करतो. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी फेस सीरम लावायचा कोणी सल्ला दिला असेल आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असेल तर तुम्ही मोठी चूक केली आहे. कारण फेस सीरम हे तुमच्या चेहऱ्याला ग्लो देण्याचे काम करतात. बाजारात चांगल्या दर्जाच्या सीरमची किंमत 1 हजारच्या वरच आहे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, हे सीरम तुम्ही घरीच बनवू शकता तर? हो आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी तयार करता येईल असे DIY फेस सीरम सांगणार आहोत. मग करुया सुरुवात

फेस सीरम म्हणजे काय? – What Is Face Serum

Shutterstock

जर तुम्ही अजूनही फेस सीरम वापरलं नसेल तर अर्थातच तुम्हाला फेस सीरम काय हे माहीत नसेल. तर फेस सीरम म्हणजे मॉश्चयरायझर. पण हलक्या स्वरुपातील मॉश्चरायझर म्हणून फेस सीरमचा वापर केला जातो. मॉश्चरायझर तुमच्या त्वचेच्या आत पर्यंत पोहोचत नाही. पण फेस सीरम तुमच्या त्वचेच्या आत जाऊन तुमच्या त्वेचच्या समस्या कमी करते. तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स कमी करते. तुम्हाला पिंपल्स असतील. तुमची त्वचा तेलकट किंवा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेला आवश्यक तजेला देण्याचे काम फेस सीरम करते. फेस सीरम तुमच्या त्वचेमध्ये अगदी छान मुरुन जाते. तुम्ही त्वचेला काय लावले हे देखील कळत नाही. त्यामुळेच तुमची त्वचा अधिक चमकते. 

भारंभार मेकअप कशाला ‘न्यूड’ मेकअपनेही दिसाल सुंदर (How To Do Nude Makeup)

घरच्या घरी बनवा तुमच्या त्वचेसाठी बेस्ट सीरम – Homemade Face Serum

आता सीरम म्हणजे काय? हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला सीरम वापरायची इच्छा नक्कीच झाली असेल. तुमच्यापैकी अनेकांनी सीरमच्या किंमतीही तपासून पाहिल्या असतील. आता या तुमच्या बजेटच्या बाहेरच्या असतील आणि म्हणून तुम्ही ते टाळत असाल तर आता घरच्या घरी तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी बेस्ट सीरम बनवता येईल. जाणून घेऊया असेच काही सोपे आणि त्वचेला फायदा मिळवून देणारे फेस सीरम

1. कोलॅजन बुस्टींग व्हिटॅमिन E सीरम (Collagen Boosting Vitamin E Serum)

Instagram

तुमच्या त्वचेसाठी कोलॅजनची वाढ जास्त गरजेची असते. तुमच्या त्वचेला आवश्यक कोलॅजन मिळाले तर तुमच्या त्वचेचा रंगही सुधारतो. पाहुयात हे सीरम कसे बनवायचे ते

साहित्य: शुद्ध नारळाचे तेल, व्हिटॅमिन E कॅप्सुल, गुलाबाचे तेल

कृती: एका भांड्यात एक मोठा चमचा नारळाचे तेल घ्या. ते चांगले फेटून घ्या. नारळाचे तेल फेटल्यानंतर ते थोडे पांढरे होते. त्यामुळे दोन चमचे गुलाबाचे तेल आणि अर्धा चमचा व्हिटॅमिन E तेल घाला. सगळे चांगले एकजीव करा. तयार सीरम एका भांड्यात भरुन  फ्रिजमध्ये ठेवा. नारळाचे तेल गोठल्यानंतर त्याचा सीरम म्हणून उपयोग करा. हातावर अगदी कमीत कमी सीरम घेऊन ते डोळ्यांच्या खाली आणि हळूहळू संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

फायदे: नारळाचे तेल तुमच्या त्वचेच्या आतील थरापर्यंत जाऊन तुमची त्वचा अधिक खुलवण्याचे काम करते. कोलॅजनला चालना देते.

2. अॅलोवेरा समर फेस सीरम (Aloe Vera Face Serum For Summer)

Instagram

उन्हाळ्याच्या दिवसात तुमचा त्वचा तुम्हाला हायड्रेटिंग हवा असेल तर तुम्ही अॅलोवेरा समर सीरम वापरायला काहीच हरकत नाही. हे सीरम बनवायलाही फार सोपे आहे.असे बनवा फेस सीरम

साहित्य: बाजारात मिळणारी अॅलोवेरा जेल, गुलाबपाणी, व्हिटॅमिन E कॅप्सुल 

कृती:  एका भांड्यात एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल घ्या.त्यात गुलाबपाणी घालून जेल गुलाबण्यामध्ये मिक्स करुन घ्या. उन्हाळ्यात आपण चेहऱ्यावर तेलाचा प्रयोग टाळतो. पण अगदी नावाला यामध्ये व्हिटॅमिन E  कॅप्सुल घाला. (तुम्ही हे वगळलं तरी चालेल.) सगळे एकजीव करुन एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. तुमचे समर फेस सीरम तयार.

फायदे: उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा डल दिसू लागते. तुमच्या त्वचेवरील चमक निघून जाते. अॅलोवेरा तुमच्या चेहऱ्याला नॅचरल ग्लो देण्याचे काम करतो. एका स्प्रे बॉटलमध्ये सीरम घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा.

3. ग्लिसरीन हायड्रेटींग सीरम (Glycerine Hydrating Serum)

Instagram

तुमच्या त्वचेसाठी ग्लिसरीन एक वरदानच आहे. तुम्हाला याचा उपयोग करुनही एक छान हायड्रेटींग सीरम बनवता येईल. जाणून घेऊया ग्लिसरीन हायड्रेटींग सीरमची रेसिपी 

साहित्य: ग्लिसरीन, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी 

कृती:  एका भांड्यात तीन ते चार चमचे ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि दोन मोठे चमचे गुलाबपाणी घाला. सगळे एकत्र करुन एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार सीरम चेहऱ्याला लावून फक्त 20 मिनिटे ठेवा. नंतर चेहरा धुवून टाका. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक झालेला जाणवेल

फायदे: इतर सीरमसारखे हे सीरम लावून ठेवायचे नसले तरी याचा फायदा तुम्हाला त्वचेच्या रंगासंदर्भात होतो. यामुळे तुमच्या त्वचेचा रंग सुधारतो. तुमच्या त्वचेवरील टॅन कमी होते.

4. ऑल स्किनटाईप व्हिटॅमिन C सीरम (Vitamin C Face Serum For All Skin Type)

Instagram

आपल्या त्वचेसाठी व्हिटॅमि C किती महत्वाचे आहे हे आता अजिबात सांगायला नको. तुमच्या त्वचेला अधिक खुलवण्याचे कामच व्हिटॅमिन C  करते. तुमच्या आहारात आणि तुमच्या स्किनकेअरमध्ये ते असेल तर तुमची त्वचा अधिक चांगली राहते. जाणून घेऊयात सगळ्यांनाच चालेल असं ऑल स्किनटाईप सीरम 

साहित्य:  व्हिटॅमिन C पावडर, अॅलोवेरा जेल, व्हिटॅमिन E तेल 

कृती :  ऑनलाईन किंवा एखाद्या ब्युटी सेंटरमध्ये तुम्हाला अगदी सहज व्हिटॅमिन C पावडर मिळते. एका ग्लासभर पाण्यात तुम्हाला ही पावडर घेऊन ती छान विरघळू द्यायची आहे. पावडर संपूर्ण विरघळ्यानंतर त्यात एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल आणि व्हिटॅमि E तेल घालून ते एकजीव करायचे आहे. तयार सीरम एका बॉटलमध्ये भरुन तुम्हाला चेहऱ्यावर लावायचे आहे. 

फायदे:  तुमच्या त्वचेला तजेला देऊन त्याच्या समस्या दूर करण्याचे काम हे सीरम करते. हे सीरम लावल्यामुळे तुमची त्वचा अधिक छान चमकू लागते. जर तुम्हाला पिंपल्स किंवा रॅशेसचा त्रास असेल तर तो देखील हळूहळू कमी होतो. 

5. स्किन लाईटर क्युक्मबर सीरम (Skin Lightener Cucumber Serum)

Instagram

तुमच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये काकडीचा वापर हा आवर्जून केला जातो. काकडीचा रस तुमच्या त्वचेवर तजेला आणतो. जाणून घेऊया स्किन लाईटर क्युक्मबर सीरमची ही रेसिपी 

साहित्य: एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल, एका काकडीचा रस, जोजोबा ऑईल

कृती:  एका भांड्यात दोन मोठे चमचे अॅलोवेरा जेल घ्या.त्यामध्ये अर्धा चमचा जोजोबा ऑईल मिसळा. त्यात काकडीचा रस घालून सगळे एकजीव करा. एका भांड्यात सीरम घेऊन ते रोज सकाळी लावा.

फायदे: काकडी तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्यास मदत करते. तुमच्या त्वचेचा रंग उजळवून तुमच्या त्वचेचा दाह देखील कमी करते. 

तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचा या टीप्स

6. स्किन सुथिंग रोझ सीरम (Skin Soothing Rose Petal Serum)

Instagram

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर तुमच्या चेहऱ्यासाठी किती चांगला आहे हे सांगायलाच नको. अनेक रेसिपींमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो. याच पाकळ्याचे तुम्ही सीरमही बनवू शकता जाणून घेऊया स्किन सुथिंग रोझ सीरमची रेसिपी 

साहित्य: गुलाबाच्या पाकळ्या, अॅलोवेरा जेल, व्हिटॅमिन E कॅप्सुल,रोझ इसेन्शिअल ऑईल, एक पेला दूध

कृती: साधारण दोन ते तीन मूठ गुलाबाच्या पाकळ्या घ्या. त्यात एक मोठा पेला दूध घालून ते वाटून घ्या. तुम्हाला मिक्सरचा उपयोग करायचा नसेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या ठेचून घ्या.ते व्यवस्थित गाळून घ्या. (चोथा फेकू नका त्याचा वापर तुम्ही फेसपॅक म्हणून करु शकता) तयार मिश्रणात तुम्ही व्हिटॅमिन E कॅप्सुल, एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल घाला. सगळे नीट एकजीव करुन पुन्हा एकदा मिश्रण गाळून घ्या. तुमचे सीरम तयार 

फायदे:  गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या त्वचेला तजेला देण्याचे काम करतात. तुमच्या स्किनसेल्सना चालना देतात. तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करतात.

7. स्पॉटलेस कुमकुमआदी फेस सीरम (Kumkumadi Serum For Spotless Skin)

Instagram

आर्युवेदात कुमकुमआदी तेलाचे फारच महत्व आहे. तुमच्या चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी हे अगदी परफेक्ट सीरम आहे. जाणून घेऊया स्पॉटलेस कुमकुमआदी फेस सीरमची रेसिपी 

साहित्य: नारळाचे तेल, बदामाचे तेल, 5 वेलचीची पूड,1 चमचा मुलेठी पावडर, गुलाबाचे पावडर, संत्र्यांच्या सालीची पावडर, केशर, जोजोबा ऑईल

कृती:  एका भांड्यात चार चमचे नारळाचे तेल, दोन चमचे बदामाचे तेल, वेलचीची पूड, मुलेठी पावडर, दोन चमचे गुलाबाची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करुन मिश्रण करुन एकजीव करा. एका भांड्यात हे तेल रात्रभर राहू द्या. साधारण 8 तासांमध्ये या तेलात सगळा अर्क उतरतो. सकाळी हे तेल एका कपड्याच्या माध्यमातून गाळून घ्या. तयार सीरममध्ये जोजोबा ऑईल आणि केशर घाला. सीरम तयार

फायदे: कुमकुमआदी तेलाचे भरपूर फायदे आहेत. तुमची त्वचा सैल पडली असेल किंवा तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर तुम्हाला या तेलाचा अधिक फायदा होईल.

8. व्हाईटनिंग राईसवॉटर सीरम (Rice Water Serum)

Instagram

जपान किंवा कोरिअन मुलींची त्वचा ही एकदम काचेसारखी नितळ असते. त्यांची त्वचा पाहिल्यानंतर कायमच आपल्यालाही तशी त्वचा हवी असे वाटणे साहजिक आहे. त्यांच्या स्किनकेअरमध्ये ते तांदूळाच्या पाण्याचा उपयोग करतात. म्हणूनच आज आपण तांदूळापासून व्हाईटनिंग राईस वॉटर सीरम बनवणार आहोत.

साहित्य: अर्धी वाटी तांदूळ, आवश्यकतेनुसार पाणी, अॅलोवेरा जेल, जोजोबा ऑईल

कृती:  सगळ्यात आधी तुम्हाला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुतलेले पाणी तुम्ही फेकू नका. कारण त्याचा उपयोग तुम्हाला इतरवेळीही करता येईल. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साधारण 1 तास तांदूळ भिजत ठेवा. साधारण तासाभरानंतर तुम्ही तांदूळ शिजवायला घ्या. खूप पाणी घेऊ नका. कारण तुम्हाला तांदूळ छान शिजायला हवा आहे. तांदूळ शिजला त्याचा भात झाला की, तो छान वाटून घ्यायचा आहे. आता तुमच्या भाताची कन्सिस्टन्सी घट्ट असेल तर त्यात थोडं नावाला पाणी घाला. त्यात थोड अॅलोवेरा जेल, जोजोबा ऑईल घालून एकजीव करा. आता इतर सीरमप्रमाणे हे पाण्यासारखं नसलं तरी देखील तुम्हाला ते एका कंटेनरमध्ये ठेवून आरामात लावता येईल.  

फायदे: तांदूळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, मिनरल्स तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी वाढवते. तुमच्या त्वचेचा पोत सुधारते तुमची त्वचा अधिक चांगली करते. 

9. स्किन नरिशिंग ऑल्मंड अॅण्ड रोझ सीरम (Skin Nourishing Almond and Rose Serum)

Instagram

बदाम आणि गुलाबाचे तुमच्या चेहऱ्यावर अनेक फायदे आहेत. तुमची त्वचा उजळवण्याचे काम बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या करते. त्यामुळे त्यांच्यापासूनही आपल्याला एक बेस्ट सीरम तयार करता येईल. पाहुयात स्किन नरिशिंग ऑल्मंड आणि रोझ सीरमची रेसिपी 

साहित्य: गुलाबाच्या पाकळ्या, अख्खे बदाम, अॅलोवेरा जेल, दूध

कृती:  गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध एकत्र करुन ते वाटून घ्या. तुमच्याकडे गुलाबपावडर असेल तरीही चालेल. बदाम उगाळून त्यामध्ये घाला. एका चाळणीतून हे मिश्रण गाळून घ्या. तयार मिश्रणात अॅलोवेरा जेल घाला. तयार तुमचे स्किन नरिशिंग सीरम 

फायदे:  तुमच्या चेहऱ्याला आवश्यक असलेले तेल तुम्हाला बदामातून मिळू शकते. बदामामध्ये व्हिटॅमिन E असते.तर गुलाबाच्या पाकळ्यांमध्येही अनेक मिनरल्स असतात जे तुमच्या त्वचेला तजेला देण्याचे काम करतात.

10. स्किन लाईटनिंग मसूर डाळ सीरम (Masoor Dal Serum For Skin Lightening)

Shutterstock

किचनमधील मसूर डाळ खाण्याव्यतिरिक्त तुमच्या त्वचेसाठी वापरली जाते हे तुम्हाला माहीत असेलच.

साहित्य: चार ते पाच चमचे मसूर डाळ, गुलाबपाणी, व्हिटॅमि E तेल, अॅलोवेरा जेल

कृती:  मसूर डाळ धुवून तुम्हाला गुलाबपाण्यात किंवा साध्या पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ही डाळ पाण्यासकट बारीक वाटून घ्यायची आहे. मसूर डाळीचे हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. एका वाटीत अॅलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन E तेल घेऊन तुम्हाला त्यात मिसळायचे आहे. सगळे एकजीव होईपर्यंत छान ढवळायचे आहे. एका कंटेनरमध्ये हे सीरम भरुन ठेवायचे आहे आणि दररोज दोनदा तरी लावायचे आहे. 

फायदे: मसूर डाळ तुमचा चेहरा उजळवण्याचे काम करते.चेहऱ्यावरील डाग घालवते. तुमची त्वचा मऊ मुलायम करते.

 

 

तुम्हाला पडलेत का प्रश्न – FAQ

1. फेस सीरम लावण्याची योग्य वेळ कोणती?
सीरम लावण्याची योग्य वेळ ही सकाळची आहे. आंघोळीनंतर जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला काही लावायचे असेल तर तुम्ही थेट फेस सीरम लावू शकता. तुम्ही सकाळीच सीरम लावले तर तुमचा चेहरा दिवसभर चांगला राहतो. फेस सीरम लावल्यानंतर तुम्ही त्यावर अगदी सहजपणे मेकअपदेखील करु शकता. त्यामुळे फेस सीरम लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर काहीही लावता येईल.

2. घरी तयार केलेले फेस सीरम जास्त वेळ कसे टिकवता येतील ?
घरी तयार केलेले फेस सीरम हे टिकवणे फारच गरजेचे असते. कारण यामध्ये प्रिझरवेटिव्ह नसल्यामुळे ते टिकवणे थोडे कठीण असते. त्यामुळे तुम्ही अगदी आठवडाभर पुरेस इतकेच सीरम बनवा.त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे घरी बनवलेले सीरम फ्रिजमध्ये ठेवायचे आहे. शिवाय एअर टाईड कंटेनरमध्ये हे सीरम ठेवले तर त्यात बाहेरील धूळ माती जाऊ शकत नाही. 

3. नॅचरल ऑईल यांचा उपयोग सीरम म्हणून करता येऊ शकतो का?
हो, काही तेलांचा उपयोग त्वचेसाठी अगदी हमखास केला जातो. बदामाचे तेल, नारळाचे तेल किंवा सँडलवुड ऑईल यांचा उपयोग त्वचेसाठी केला जातो. पण अगदी कमी प्रमाणात तुम्हाला याचा उपयोग करावा लागतो. कारण दिवसभर तुम्हाला हे सीरम लावायचे असेल तर तुमचा चेहरा तेलकट होऊन चालणार नाही. असे सीरम तुम्ही रात्री झोपताना लावू शकता. पण नॅचरल ऑईल किंवा इसेन्शिअल ऑईलचा उपयोग सीरम म्हणून केला जातो. 

आता त्वचेला ग्लो आणणारे सीरम घरीच बनवा आणि तुमच्या त्वचेला द्या नैसर्गिक ग्लो.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY सौंदर्य