DIY सौंदर्य

त्वरीत हवी असेल नितळ त्वचा, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dipali Naphade  |  Feb 12, 2020
त्वरीत हवी असेल नितळ त्वचा, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या त्वचेची आणि केसांची. बऱ्याचदा आपली त्वचा नितळ हवी असेल तर नक्की घरगुती उपाय काय करायचे असा प्रश्न पडतो. प्रत्येकाला काही ना काही घरगुती उपाय माहीत असतातच. पण त्वचा त्वरीत नितळ हवी असेल तर काही घरगुती उपाय आहेत का? असाही प्रश्न विचारला जातो. तर अर्थातच याचं उत्तर हो असं आहे. तुम्हाला त्वरीत नितळ त्वचा हवी असेल तर घरगुती उपाय करता येतात. आता हे नक्की काय आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्वचा चांगली राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. फक्त हे उपाय नियमित करणं आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात या साध्या सोप्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हालाही नितळ त्वचा मिळू शकते. त्यातही तुम्हाला सतत पार्लरच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तुम्हाला या घरगुती उपायांनी नक्कीच नितळ आणि स्वच्छ त्वचा मिळू शकते. पाहूया काय आहेत घरगुती उपाय. 

1. दिवसभर भरपूर पाणी पिणे

Shutterstock

हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. बऱ्याच जणांचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं. पण असं करू नका. शरीरातील टॉक्झिक द्रव्य बाहेर पडायला हवी असतील तर रोज भरपूर अर्थात किमान 8 ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता आहे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून नव्या पेशींची निर्मिती होते आणि त्वचा त्वरीत नितळ होण्यासाठी मदत होते. तुम्ही नियमित हा उपाय केलात तर तुम्हाला इतर कोणत्याही उपायाची जास्त गरज भासणार नाही. 

2. पुरेशी झोप

Shutterstock

कोणत्याही व्यक्तीच्या शरीराला दिवसभरात किमान 8 तासांची झोप आवश्यक असते.  मोबाईल, टीव्ही यासारख्या गोष्टी पाहणं टाळून रात्री व्यवस्थित लवकर झोपा आणि शरीराला आणि मनालाही आराम द्या. दिवसभर काम आणि इतर गोष्टींचाही ताण मनावर आणि शरीरावर असतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते. अशावेळी झोपच तुम्हाला आराम मिळवून देते. झोप पूर्ण झाली तर त्याचा तुमच्या त्वचेवर अधिक चांगला परिणाम होतो आणि तुमची त्वचा नितळ दिसते. 

3. नेहमी ताजे रस अर्थात ज्युस प्या

Shutterstock

बाहेरून फळांचे रस मागवून पिण्यापेक्षा बाजारातील ताजी फळं आणा आणि साखर न घालता त्याचा ताजा रस तुम्ही काढून प्या. यातून तुमच्या त्वचेला आणि शरीराला आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात. रोज किमान एक ग्लास रस तरी तुम्ही प्यायला हवा. तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल तर हा उत्तम घरगुती उपाय आहे. नैसर्गिक फळांच्या रसामुळे त्वचा अधिक चकमदार आणि नितळ दिसते. 

4. लिंबाचा करा वापर

Shutterstock

जेवणामध्ये लिंबाचा वापर करा. लिंबामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारे विटामिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जेवणामध्ये लिंबाचा वापर करण्यात आल्यास,  तुमची त्वचा अधिक चांगली आणि नितळ होण्यास मदत मिळते. विटामिन सी हे शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्यात मदत करतं. हवं तर रोज लिंबाचा रस गरम पाण्यात घालूनही तुम्ही पिऊ शकता. 

5. संत्र्याचाही करा उपयोग

Shutterstock

संत्री आपल्या त्वचेसाठी  चांगली असतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण बऱ्याचदा संत्री खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देण्यात येते. पण तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल तर तुम्ही संत्र्याचं साल त्वचेवर लावा अथवा त्याची पेस्ट बनवूनही तुम्ही संत्र्याच्या सालीचा उपयोग करून घेऊ शकता. 

वापर करा घरगुती नैसर्गिक क्लिंन्झरचा आणि मिळवा चमकदार त्वचा

6. घरातील डाळींची घ्या मदत

Shutterstock

डाळींमध्ये वेगवेगळी प्रथिने असतात, जी त्वचेला अधिक चमकदार बनवण्यासाठी मदत करतात. रोज डाळीचे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये नव्या पेशी निर्माण होण्यासाठी मदत मिळते आणि त्यामुळेच त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार होते.

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार
 

7. टॉमेटो

Shutterstock

टॉमटोचा जेवणामध्ये नियमित उपयोग करा. त्वचेतील फ्री रॅडिकल्सपासून टॉमेटो संरक्षण मिळवून देतो. त्वचेला यामुळे अधिक चांगला नितळपणा मिळतो. त्वचा अधिक उजळण्यास मदत करते. 

8. केळ्याचा मास्क

Shutterstock

केळी हा चेहरा नितळ ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. तुम्ही घरगुती उपाय करत असाल तर केळी मॅश करून त्यात मध आणि लिंबू रस मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिट्स चेहऱ्यावर तसंच ठेवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक वेळ केला तर नक्कीच तुमची त्वचा त्वरीत नितळ होण्यास मदत होईल. 

चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर

9. ग्रीन टी

Shutterstock

त्वरीत नितळ त्वचा मिळविण्यासाठी ग्रीन टी देखील उत्तम उपाय आहे. हा हर्बल चहा असल्याने सूर्यापासून जर तुमची त्वचा बर्न होत असेल तर त्यासाठी हा अत्यंत उपायकारक आहे. नियमित ग्रीन टी प्यायल्याने तुमच्या त्वचेवर असलेले काळे डाग, व्रण दूर होतात आणि त्वचा अधिक नितळ होते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY सौंदर्य