आरोग्य

दात दुखीवर घरगुती उपाय (Tooth Pain Home Remedy In Marathi)

Dipali Naphade  |  Apr 23, 2019
Tooth Pain Home Remedy In Marathi

दातांची समस्या खूपच सामाईक आहे. आपण नेहमीच दात पांढरे शुभ्र दिसण्यासाठी घरगुती उपाय करत असतो. तसंच प्रत्येकाला कधी ना कधीतरी दाताचं दुखणं झालेलं असणारच. पण हे दुखणं काय आहे हे दातदुखी झालेल्या माणसाला नक्कीच कळेल. वास्तविक दाताच्या आसपासच्या नसांमध्ये कोणत्याही प्रकारची कीड लागली किंवा त्रास होऊ लागला की, दातदुखीला सुरुवात होते. काही लोकांना दातदुखीचा त्रास इथपर्यंत होतो की, त्यांच्या कानात आणि डोक्याची नस दुखते. दातदुखी आणि दाढदुखी ही दोन्ही असह्य असते. कधीतरी हे दुःख इतकं वाढतं की, ते दुःख जबड्यापर्यंत पोहचतं. यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर सूज येते. अशा परस्थितीत खाणं – पिणं शक्यच नसतं. शिवाय दातदुखीचं दुःख सहन करणंही कठीण असतं. आपल्या आजूबाजूला अशावेळी जे लोक असतात ते विविध सल्ले देत असतात. दात दुखीवर घरगुती उपाय (dat dukhi var gharguti upay in marathi) करायला सांगत असतात तर दाढदुखीही तितकीच भयानक असते. दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय प्रत्येकाला हवाच असतो. तुम्हाला दातदुखीपासून सुटका मिळवायची असेल तर काय घरगुती उपाय (tooth pain home remedy in marathi) करायला हवेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. दातदुखी घरगुती उपाय (dad dukhi var upay) या लेखातून जाणून घ्या.

दात दुखने घरगुती उपाय (Dat Dukhi Var Gharguti Upay)

दात दुखने घरगुती उपाय अनेक आहेत. त्याचा कसा वापर करायचा आणि दात आणि दाढदुखी कशी थांबवायची (dadh dukhi var gharguti upay) ते आपण अधिक स्पष्टपणे जाणून घेऊया. 

लवंग तेल (Clove Oil)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

दात दुखीवर घरगुती उपाय म्हटले की, सर्वात आधी लवंग हा एकमेव घरगुती उपाय आपल्याला दिसतो. वास्तविक एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, लवंग अथवा लवंग तेलाचा एका आयुर्वेदिक औषधाप्रमाणे उपयोग होतो. लवंगाच्या तेलामध्ये मुख्य घटक युजेनॉल आणि अॅसिटिल युजेनॉल असल्यामुळे हे एक अँटिइन्फ्लेमटरी आणि एनाल्जेसिक औषध म्हणून काम करते. त्यामुळे दातदुखीवर रामबाण इलाज म्हणून याचा उपयोग होतो. अर्थात संपूर्णतः जरी दातदुखी बंद झाली नाही तरी डॉक्टरकडे जाऊन दाखवेपर्यंत तरी किमान लवंग तेलाचा उपयोग करून दुःख कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. पण याचा आवश्यकतेपेक्षा अधिक उपयोग होणार नाही याचीही काळजी घ्या. तुम्हाला शारीरिक कोणताही त्रास असेल तर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

आल्याची पावडर (Ginger Powder)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय (dad dukhi var upay) हवा असेल तर आल्याचा तुम्हाला फायदा करून घेता येतो. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, आल्याची पावडर तितकीच उपयोगी ठरते जितकी आयबूप्रोफेनिन (पेनकिलरचे नाव) तुम्हाला त्रासातून मुक्त करते. दाताला कोणतीही जखम झाली अथवा हिरड्या सुजल्यानंतरही तुम्ही आल्याचा उपयोग करून घेऊ शकता. दाताच्या हलक्याफुलक्या त्रासावर आल्याचा तुम्हाला घरगुती उपायांमध्ये उपयोग करून घेता येतो. केसांसाठी आणि आरोग्यासाठीही आल्याचे फायदे होतात. 

हिंग (Hing)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

दात दुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामध्ये दातदुखी कमी करणारे गुण आढळतात. तसंच यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. बॅक्टेरियामुळे सडणाऱ्या दातांना वाचविण्यासाठी आणि दातदुखीपासून सुटका करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिंग दातावर औषधाप्रमाणे काम करते. 

कांदा (Onion)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

कांदा केवळ खाण्यामध्ये स्वादच आणत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी आणि दातासाठीही फायदेशीर ठरतो. दातदुखीवरील घरगुती उपायांमध्ये कांदा उपयुक्त ठरतो. यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण तोंडातील बॅक्टेरियावर परिणामकारक ठरतात. तसंच कांदा एक नैसर्गिक औषध असून याचा कोणताही तोटा दातदुखीवर होत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त वापरू शकता. तसंच कांदा पोटात गेला तरीही त्याने काही त्रास उद्भवत नाही. 

लसूण (Garlic)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

लसणाचे अनेक फायदे आहेत यामध्ये काहीच शंका नाही. त्यामध्येच दातदुखीवरील घरगुती उपचारातही लसूण उपयोगी ठरते. वास्तविक लसणामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण आढळतात जे दाताच्या प्लाकवर अधिक परिणामकारक ठरतात. अँटिबॅक्टेरियल गुणांमध्ये असलेले महत्वपूर्ण घटक अॅलिसिन असल्याचे समजण्यात येते. तसंच यामध्ये अँटिमायक्रोबियल गुण असून हिरड्यांवरील संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियांपासून वाचण्यास मदत मिळवून देते. अनेक टूथपेस्ट अथवा माऊथवॉशमध्येही लसणाचा उपयोग केला जातो. तुम्ही याचा पण वापर करून घेऊ शकता. 

मीठाचे पाणी (Salt Water)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर

दातदुखी सुरू झाल्यानंतर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा अत्यंत सोपा उपाय आहे. यामुळे दातदुखी पटकन थांबायला मदत मिळते. मीठाच्या पाण्यामुळे दातातील कीड मरायला मदत मिळते. हे दातदुखीवरील औषध नाही. कायमस्वरूपी औषध तुम्हाला डॉक्टरांकडूनच मिळते. पण तात्पुरती दातदुखी बंद करण्यासाठी याचा तुम्ही हमखास उपयोग करून घेऊ शकता. 

वाचा – मायग्रेन कशामुळे होतो (Reasons Of Migraine In Marathi)

पेरूची पाने (Guava Leaves)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

दातदुखीवरील घरगुती उपायांमध्ये (dat dukhi var gharguti upay in marathi) तुम्ही याचा समावेश करून घेऊ शकता. एका अभ्यासानुसार पेरूच्या पानांमध्ये गआजावेरीन नावाचे अँटप्लाक गुण आढळतात. जे तोंडाच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच पेरूच्या पानामध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेटरी, एनाल्जेसिक गुणदेखील आढळतात. जे दातदुखीपासून तुम्हाला दूर ठेवतात. तसंच यामुळे तोंडाचा अल्सर आणि दाताचे दुखणे दोन्ही कमी होते.

वाचा – Bad Breath ची लक्षणे कोणती 

नायजेला सीड्स (Nigella Seeds)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

नायजेला सीड्समध्ये थामोक्विनोन नावाचे एनाल्जेसिक गुण आढळतात. दातदुखीपासून सुटका मिळवून देण्यासाठी याचा चांगला वापर करून घेता येतो. याशिवाय हे तेल पेनकिलरप्रमाणे काम करते. त्यामुळे दातदुखीपासून पटकन सुटका मिळते. 

बेकिंग सोडा (Baking Soda)

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर

बेकिंग सोडा एक सुरक्षित आणि परिणामकारक घरगुती उपाय आहे. यामध्ये जीवाणूनाशक गुण असून तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. वास्तविक दाताच्या दुखण्यापासून पटकन सुटका मिळवून देते. बॅक्टेरियापासून वाचविण्यासाठी याचा उपयोग होतो आणि याचा तुम्ही माऊथवॉश म्हणूनही वापर करू शकता. 

व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट (Vanilla Extract)

कसे वापरावे 

ज्या दातामध्ये दुखत आहे तिथे कापसाच्या मदतीने व्हॅनिल एक्स्ट्र्रॅक्ट लावावे 

कसे ठरते फायदेशीर 

दाताला आराम देण्यासाठी व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट सेल्फकेअर म्हणून उपयोगी ठरते. बरेच जण याचा घरगुती उपाय म्हणून उपयोग करतात. दातदुखीपासून पटकन सुटका व्हावी म्हणून तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

दालचिनी पावडर (Cinnamon Powder)

कसे वापरावे

कसे ठरते फायदेशीर 

दातासाठी अगदी पारंपरिक पुरातन काळापासून चालत आलेला हा घरगुती उपाय आहे. दालचिनीमध्ये आढळणारे अँटिइन्फ्लेमेटरी गुण दातदुखीपासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. यासह दालचिनी तेलही गुणकारी ठरते. मध आणि दालचिनी एकत्र पेस्ट दात दुखने घरगुती उपाय म्हणून चांगले फायदेशीर ठरते. मधामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असल्याने त्याचा चांगला उपयोग होतो. 

ओरेगॅनो ऑईल (Oregano Oil)

कसे वापरावे

कसे ठरते फायदेशीर 

दात दुखीवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही ओरेगॅनो ऑईलचा वापर करू शकता. यामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असल्याने दाताच्या दुखण्यापासून सुटका मिळवून देण्यास फायदेशीर ठरते. तसंच हे तेल अगदी कमी वापरूनही तुम्हाला योग्य परिणाम दिसून येतो. 

दातदुखीवरील उपचार (Treatment For Toothache)

दाताची अवस्था कशी आहे त्यानुसार दातदुखीवर उपचार केले जातात. नक्की काय उपचार करता येतात जाणून घ्या. 

अशी घ्यावी काळजी (Prevention Tips)

दातदुखीपासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्हाला आधीपासूनच काही काळजी घ्यायला हवी. ती नक्की कशी घ्यायची ते जाणून घ्या. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. दातदुखीची नक्की कारणे काय आहेत? 

दात दुखण्याची अनेक कारणे आहेत. दातामध्ये किड लागणे, दाताला एखादी जखम होणे, दात तुटणे, तोंडाचा अल्सर, हिरड्यांची पकड सैल होणे, हिरड्या सुजणे, दातांमध्ये सूज येणे, बॅक्टेरियामुळे दात खराब होणे, अक्कलदाढ येणे अशा विविध कारणांमुळे दातदुखी अथवा दाढदुखी सुरू होते. 

2. दातातून रक्त येत असेल तर काय करावे?

सहसा ही दाताची नाही तर हिरड्यांची समस्या असते. पण तुम्ही जोर देऊन ब्रश करत नाही ना याकडे लक्ष द्या. तसंच तुम्हाला यातून सुटका हवी असेल तर कपडा पाण्याने भिजवा आणि रक्त येत असणाऱ्या ठिकाणी लावा. काही वेळातच रक्त थांबेल. पण डॉक्टरांना नक्की दाखवा. 

3. दातदुखीमुळे कानही दुखू शकतो का?

हो दातदुखीमुळे कानात आणि अगदी डोक्यातही कळा येऊ शकतात. दाताच्या वरच्या भागामध्ये त्रास होत असेल तर दातापासूनची नस ही कानापर्यंत गेलेली अशते. त्यामुळे दाताबरोबरच कान आणि डोकं दोन्ही दुखू लागते. त्यामुळे याचे दुःख सहन करणे असह्य होते.

Read More From आरोग्य