Fitness

Hookworm ची लक्षणं आणि त्यावरील उपाय (Symptoms And Remedies Of Hookworm In Marathi)

Aaditi Datar  |  Sep 24, 2019
Hookworm Infection In Marathi

हुकवर्म हा एक गोलकृमींचा प्रकार आहे. हे इन्फेक्शन अशा लोकांना होण्याची शक्यता जास्त असते, ज्यांचा मातीशी जास्त संबंध येतो किंवा ज्यांच्या घरी कुत्रे किंवा मांजरी यासारखे पाळीव प्राणी असतात. हे इन्फेक्शन त्वचेच्या माध्यमातून पोटापर्यंत पोचू शकतं. जर हे इन्फेक्शन गर्भवती महिलेला झालं तर याचा धोका गर्भातील शिशूलाही असतो. जगभरातील 10 टक्के लोकसंख्या हुकवर्मने प्रभावित आहे.

हुकवर्म म्हणजे काय ? (What is Hookworm In Marathi)

हुकवर्म हा मनुष्य आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये राहणारा एक परजीवी आहे. ज्याच्यामुळे जुलाब होणं आणि पोटात कळा येणं यासारख्या समस्या उद्भवतात. हुकवर्मने होणाऱ्या गंभीर इन्फेक्शनमुळे नवजात शिशू, छोटी मुलं, कुपोषित आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी ही खूपच घातक स्थिती बनू शकते. दूषित मातीशी जिथे थेट संपर्क होऊन इन्फेक्शन होऊ शकते. जसं अनवाणी चालणे किंवा माती तोंडात जाणे. यासोबतच जाणून घ्या पोटातील जंतावर उपाय कसे करावे.

हुकवर्म इंफेक्शन

Instagram

वैज्ञानिक भाषेत सांगायचं झाल्यास हुकवर्म हा एक प्रकारचा परजीवी आहे. जो दुसऱ्या जीवित प्राण्यांच्या शरीरावर जीवित राहतो. यांनाच परजीवी म्हणजे पॅरासाईट असं म्हणतात. हे कोणत्याही होस्ट (एखाद्या जीविताच्या शरीरात प्रवेश करून) ना जगू शकतात ना वाढू शकतात. हे आपल्या छोट्या आतड्याच्या आत प्रवेश करून रोगीचं रक्त शोषतात. त्यामुळे काही वेळा या संक्रमणांमुळे होस्ट मरतो. तर काही वेळा हे पॅरासाईट रोग पसरवतात आणि घातकही ठरतात. हुकवर्म हे मुख्यपणे फुफ्फुसं, छोटं आतडं आणि त्वचेला प्रभावित करतात. अनेकदा मनुष्य लार्वाच्या माध्यमातून याच्या संपर्कात येतात. लार्वा ही प्रत्येक जंतूची अगदी सुरूवातीची स्थिती असते. असा लार्वा घाणीमुळे दूषित झालेल्या मातीत आढळतो. हुकवर्म हे जास्तकरून ओली माती आणि उन्हाळ्याच्या दिवसात होतात. जी लोकं या दूषित मातीत अनवाणी किंवा साध्या चप्पल घालून चालतात. त्यांना हे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. तसंच ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत. त्यांनाही हे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

हुकवर्मची लक्षणं (Signs Of Hookworm Infection In Marathi)

जर तुम्ही शारीरिकरित्या निरोगी असाल. भरपूर आर्यनयुक्त पदार्थ खात असाल आणि पॅरासाईट कमी असतील तर तुम्हाला या इन्फेक्शनची लक्षण जाणवणार नाहीत. जर तुम्हाला या इन्फेक्शनची लक्षणं असतील तर साधारणतः खाज येणं आणि छोट्या चक्रासारखा आकार दिसू लागतो. लार्वा जिथे त्वचेला छेद करून आत जातो तिथे एलर्जिक रिएक्शनच्या रूपात खाज आणि चक्र बनतं. त्यानंतर लार्वा आतड्यांमध्ये जाऊन मोठे होऊ लागतात. ज्यामुळे जुलाब सुरू होतात.

वाचा – Home Remedies For Kidney Stone In Marathi

Instagram

हुकवर्मची अन्य लक्षणं

पोटाला त्रास होणे, आतड्यांना पीळ बसणे, खोकला, जुलाब, थकवा, ताप, अत्यंत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, आर्यनची कमतरता झाल्याने एनीमिया होणे, कुपोषण, गॅस, खाज येणे, हार्ट फेल, भूक न लागणे, मळमळणे आणि उलटी होणे, त्वचा पिवळी पडणे. 

वाचा – हर्नियाचे प्रकार (Types Of Hernia In Marathi)

डॉक्टरांना कधी दाखवावं ?

जर तुम्हाला हुकवर्मची गंभीर लक्षण जाणवत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घ्यावी. तातडीने योग्य उपचार घ्यावेत.

हुकवर्म कशाने होतं (Causes of Hookworm Infection In Marathi)

Causes of Hookworm Infection In Marathi

हे पॅरासाईट्स मनुष्याच्या आतड्यांमध्ये प्रवेश करू शकतात. हुकवर्मचा संसर्ग हा मुख्यतः दुषित मलाच्या माध्यमातून होतो. 

हुकवर्मचं इन्फेक्शन तीन परिस्थितींमध्ये लगेच पसरतं. 

– संक्रमित मनुष्याचा मलाने दूषित झालेल्या मातीतून 
– लार्वा जीवंत राहण्यासाठी मातीची अनुकूल परिस्थिती राहिल्यास जसं ओली माती, उष्ण हवामान आणि सावली.  
– दूषित मातीतून मनुष्याचा त्वचेला इन्फेक्शन होणे.

तसंच घरातील पाळीव प्राण्यांना याचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्यामुळेही घरातील व्यक्तींना हुकवर्मचा संसर्ग होऊ शकतो. 

हुकवर्म होण्याची शक्यता केव्हा वाढते

Risk Of Hookworm Infection In Marathi

– जेव्हा लोकं गरम, उष्णकटिबंध किंवा उपोष्णकटिबंध भागात राहतात. 
– हुकवर्म इन्फेक्शन पाळीव जनावरांनाही होतं, विशेषतः कुत्रे आणि मांजरींच्या पिल्लांना. जर पाळीव प्राण्यांना झालं तर त्यांच्या संपर्कातील मनुष्यांनाही होऊ शकतं.  
– छोटी मुलं जी दूषित मातीच्या संपर्कात येतात.  
– जी लोकं नेहमी मातीच्या संपर्कात असतात, जसं शेतकरी, प्लंबर, इलेक्ट्रीशियन आणि वेठबिगारी करणारे मजूर.  
– ज्या ठिकाणी स्वच्छता आणि सफाई कमी असते. अशा ठिकाणच्या लोकांना या इन्फेक्शनची भीती असते. खासकरून अनवाणी पायाने चालणाऱ्या आणि खराब मातीशी संपर्क असणाऱ्या लोकांना हुकवर्म होण्याची भीती असते.  
– गर्भवती महिला वयोगट 20 ते 35 किंवा इतर महिला. 
– जिथे लोकं मानवी मलाचा वापर खत म्हणून करतात. तिथे हुकवर्मचा धोका जास्त असतो.

हुकवर्मपासून बचाव (How To Prevent Hookworm Infection In Marathi)

Instagram

हुकवर्म हे गंभीर इन्फेक्शन टाळण्यासाठी पुढील खबरदारी नक्की घ्या. ज्यामुळे कोणतीही व्यक्ती हुकवर्मच्या संपर्कात येण्यापासून बचाव करू शकेल. 

How To Prevent Hookworm Infection In Marathi

हुकवर्मसाठी काही सोपे घरगुती उपाय (Home Remedies For Hookworm In Marathi)

जसं तुम्ही वरील सांगितलेली काळजी घेऊन हुकवर्म टाळू शकता. तसंच खालील काही घरगुती उपाय तुम्ही हुकवर्मसाठी करू शकता.

लसूण

लसूणामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे हुकवर्म किंवा यासारख्याच पोटाच्या जंतावर लसूण गुणाकारी ठरतो. मग तुमच्या रोजच्या जेवणात आवर्जून लसूण वापरा.

लवंग

लवंग चावून खाल्ल्यानेही तुम्हाला हुकवर्मची समस्या टाळता येईल. कारण लवंगांमध्येही अँटीव्हायरल आणि अँटी-पॅरासिटीक गुण असतात.

पपई

पपईतील पॅपिन या घटकाने आपल्या पोटातील जंतूंचा नाश होण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हा अशा जंतांचा त्रास होईल तेव्हा तुम्ही पपईचं सेवन आवर्जून करा.

ओवा

ओव्यामध्ये थाममॉल नावाचा घटक असतो ज्याने तुमची पाचनशक्ती वाढते आणि आतड्यांची क्षमता चांगली राहते.

हळद

हळद ही जशी कोणत्याही जखमेवर गुणकारी आहे तशीच अँटीपॅरासिटीक आणि पोटासाठीही चांगली आहे. हळदीमुळे पाचनाची समस्या दूर होऊन पोटातील जंतांचा नाश होतो.

भोपळाच्या बिया

भोपाळ्याच्या बियांमधील कुकुरबिटॅसीन हा घटक हुकवर्मच्या इन्फेक्शनवर गुणकारी आहे. या घटकामुळे कृमी आतड्याला चिकटत नाहीत.

गाजर

गाजरामध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅरटीन हा घटक असतो. हा एक पावरफुल अँटीऑक्सीडंट घटक असून तो पॅरासाईटच्या अंड्याचा विनाश करतो. वेगाने पसरणाऱ्या इन्फेक्शनला कमी करण्यात मदत करतो. यासोबतच जंतावर घरगुती उपाय कसे करावे हेही जाणून घ्या

नारळ

नारळ आणि नारळाच्या तेलाचा वापर हा अनेक आजारांवर गुणकारी आहे. यातील नैसर्गिक अँटीपॅरासाईट वैशिष्ट्यांमुळे नारळाचा वापर हा हुकवर्मच्या इन्फेक्शनसाठी केला जातो. हुकवर्मसाठी हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे.

हुकवर्मबाबत विचारले जाणारे (FAQ’s)

हुकवर्मबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न. तुम्हालाही आहेत का हुकवर्मबाबत काही शंका.  

1- हुकवर्म इंफेक्शन संसर्गजन्य आहे का?

हुकवर्म इंफेक्शन

हुकवर्मचा लार्वा अशा रूपात मोठा होतो की, जो मनुष्याच्या त्वचेत प्रवेश करू शकतो. हुकवर्म मुख्य रूपाने प्रदूषित मातीत अनवाणी पायाने होतो. लार्वाच्या इन्फेक्शनने एक प्रकारे हुकवर्मचा प्रसार होतो. हुकवर्ममधून संक्रमित अधिकांश लोकांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत.

2- हुकवर्मचा आकार साधारण केवढा असतो?

हुकवर्मचा आकार हा साधारणतः पुरूषांमध्ये 5 ते 9 मिमी लांब तर महिलांमध्ये 1 सेमी लांब आढळू शकतो. 

3- हुकवर्मचं आयुष्य किती असतं?

हुकवर्मचं जीवनचक्र पुढीलप्रमाणे – हुकवर्मची अंडीही घाणीत असतात आणि अनुकूल परिस्थिती (गरमी, आर्द्रता, सावली) मध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये लार्वाची वाढ होते. लार्वा हा मुख्यता घाण मातीत वाढतो. त्यानंतर 5 ते 10 दिवसांमध्ये साधारणतः त्यांची पूर्ण वाढ होते.

4- हुकवर्म प्रेग्नंसीमध्ये धोकादायक आहे का?

हुकवर्मचा संसर्ग प्रेग्नंसीमध्ये झाल्यास नक्कीच धोकादायक आहे. कारण गर्भवती मातेसोबतच याचा प्रादुर्भाव होणाऱ्या नवजात बाळालाही होऊ शकतो.

हेही वाचा – 

ताण-तणावामुळे तरूण महिलांमध्ये वाढतोय सध्या ‘अल्झायमर’चा धोका

तुम्हाला HIV अथवा एड्स तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी माहीत हवीत लक्षणं

वाचा, डेंग्यू संदर्भातील अशी माहिती जी सगळ्यांना माहीत हवी

जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

White Discharge in Hindi

Read More From Fitness