Acne

केळ्याने वाढतं तुमच्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य

Dipali Naphade  |  Jun 5, 2019
केळ्याने वाढतं तुमच्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य

वर्षभर तुम्हाला बाजारामध्ये आरामात मिळणारं फळ म्हणजे केळं. केळं हे केवळ तुमच्या शरीराला निरोगी ठेवत नाही तर तुमचे केस, त्वचा आणि दात या सगळ्यावरही रामबाण इलाज आहे. हो, हे खरं आहे. इन्स्टंट एनर्जीबरोबरच तुमच्या सौंदर्यासाठी सर्वात चांगला उपाय जर कोणता असेल तर तो म्हणजे केळं. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळ्यामध्ये फायबर, विटामिन A, B (B6, B12), C, E आणि आयर्न, पोटॅशियम, मँगनीज, झिंक असे सर्व मिनरल्स असतात. या सगळ्या गोष्टी एकाच फळामध्ये तुम्हाला मिळतात. केळंच नाही तर केळ्याचं सालही तुमच्या त्वचेसाठी चांगलं असतं. तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर सौंदर्यासाठी केळं फायदेशीर कसं हे जाणून घ्या.

कोरड्या, damaged आणि frizzy केसांसाठी हेअर मास्क

केळ्याचं मास्क कोरड्या, सुक्या, unruly frizzy, damaged केसांना सुंदर आणि निरोगी बनवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 केळी व्यवस्थित मॅश करून घ्यावी लागतील. त्यानंतर त्यामध्ये  2 चमचे दही, ऑलिव्ह ऑइल आणि मध घालून मिक्स करा. हा मास्क तुम्ही तुमच्या स्काल्पवर आणि केसांवर व्यवस्थित लावा. साधारण एक तासासाठी तुम्ही तुमचं डोकं शॉवर कॅपने झाकून ठेवा. नंतर शँपू लाऊन केस धुवा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही केवळ केळं आणि मधाचाही मास्क बनवून त्याचा वापर करू शकता. हे वापरल्यानंतर तुम्हाला स्वतःला आपल्या केसांमधील फरक जाणवेल. तुमच्या केसांना व्यवस्थित पोषण मिळतं आणि केस कोरडे राहात नाहीत.

लांब, चमकदार आणि निरोगी केसांसाठी मास्क

लांब आणि चमकदार केसांसाठी तुम्ही असा प्रयोग करू शकता. 2 केळ्यांबरोबर 2 चमचे मेयोनीज नीट ब्लेंड करून घ्या. तुमचा मास्क तयार. हा एकदम सोपा प्रयोग आहे. हे मास्क तुम्ही स्काल्प आणि केसांना लावा. त्यानंतर साधारण 30 मिनिट्सने शँपू करून केस धुवा. तुमचे केस अतिशय मुलायम आणि चमकदार तुम्हाला बघायला मिळतील. या मास्कमुळे केसांबद्दल अतिशय फरक पडतो. त्याशिवाय तुमचे केस निरोगीदेखील राहतात.

हेअर कंडिशनर

तुमचे केस कोरडे आणि फ्रिजी झाले असतील तर त्यांना पोषण देण्यासह कंडिशन करण्यासाठीदेखील केळ्याचा उपयोग होतो. हे कंडिशनर बनवण्यासाठी 1 मॅश्ड केळं घ्या त्यामध्ये 1 चमचा बदामाचं तेल आणि 2 चमचे दूध घालून मिक्स करा. हे तुम्ही तुमच्या केसांवर लाऊन साधारणतः 20-30 मिनिटांनंतर शँपू करा. कधीतरी शँपू केल्यानंतर लहान लहान कण केसांमध्ये राहतात. पण त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. तुमचे केस सुकल्यानंतर जेव्हा तुम्ही विंचराल तेव्हा ते केळ्याचे कण निघून जातील.

उजळपणा येण्यासाठी फेस मास्क

चेहरा उजळण्यासाठी नेहमी केळ्याचा उपयोग खूपच चांगला होतो. 1 मॅश्ड केलेलं केळं घ्या आणि त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्या. तयार मास्क चेहऱ्याला आणि मानेला लावा आणि मग 15-25 मिनिट्सनंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या.

Glowing complexion साठी स्क्रब म्हणून वापर

हा स्क्रब केवळ तुमच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स आणि घाण साफ करत नाही तर, चेहऱ्यावर उजळपणादेखील आणतो. तसा तर हा स्क्रब सगळ्याच पद्धतीच्या त्वचेवर चांगला आहे. पण कॉम्बिनेशन स्किनसाठी तर उत्कृ्ष्ट पर्याय आहे. हा तयार करण्यासाठी अर्ध केळं मॅश्ड करून घ्या. त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग हा तयार झालेला स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर वापरा. या स्क्रब काढून टाकल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर उजळपणा दिसून येईल.

शरीरासाठी Anti-Tan मास्क

शरीरावर कितीही वाईट टॅन असेल तर या मास्कचा वापर केल्यास, टॅन निघून जातो. फक्त इतकंच लक्षात ठेवायला हवं की, बनवलेला हा मास्क शरीरावर लावण्यापूर्वी चांगल्या तऱ्हेने स्क्रब करून घ्या. तुम्हाला हवं तर लिंबाचा रस आणि साखर मिक्स करूनही हा स्क्रब तयार करता येईल. स्क्रब केल्यानंतर तुम्ही एक मॅश्ड केलेलं केळं, मध, लिंबाचा रस, संत्र्याचा रस मिक्स करून घ्या. टॅन असणाऱ्या भागावर साधारण हे मिक्स्चर 5-10 मिनिट्स लाऊन मसाज करा आणि 15-20 मिनिट्नंतर पाण्याने धुवा. रोज हे लावल्यामुळे 21 दिवसात तुमच्या अंगावर असलेलं टॅन पूर्णतः निघून जाण्यास मदत होईल.

मॉईस्चराईजर

केळ्याचा तयार केलेला हा मास्क त्वचेला पोषण देण्यासह त्वचा मॉईस्चराईज करण्याचं कामही करतो. त्यामुळे त्वचा अधिक मुलायम आणि निरोगी होते. केळ्याला एकदम मॅश्ड करा आणि त्यामध्ये मध आणि ग्लिसरीन घालून मिक्स करा. यामध्ये मधाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. तयार मास्क तुम्ही तुमच्या शरीरावर लावा आणि 40-45 मिनिटांनंतर हातांनी रगडून हा मास्क काढा आणि नंतर पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्हाला हा बदल स्वतःला कळेल.

पायांच्या भेगांसाठी मास्क

केळं हे पायांच्या भेगांसाठीही तितकंच फायदेशीर आहे. सर्वात पहिले तुमचे पाय साफ करून घ्या. मॅश्ड केलेलं केळं दोन्ही पायांच्या भेगांवर व्यवस्थित लावा आणि मग 15-20 मिनिट्स आरामात बसा. थोडी पेस्ट वाचली असेल तर चेहऱ्यालाही लावा. काही वेळ गेल्यानंतर पाण्याने पाय धुऊन टाका आणि नंतर त्यावर क्रिम लावा.  

कोरड्या आणि acne prone त्वचेसाठी

कोरड्या आणि पिंपल्स असणाऱ्या अशा विचित्र कॉम्बिनेशन त्वचेसाठी हा उपाय चांगला आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण पिकलेल्या केळ्याच्या सालाचा वापर करावा लागेल. केळ्याच्या सालाच्या आतील बाजू ही तुम्हाला आलेल्या पिंपल्सवर अतिशय हलक्या हाताने रब करा. तो रंग ब्राऊन होईपर्यंत तुम्ही रब करा आणि मग पाण्याने चेहरा धुवा. असं दिवसातून तुम्ही 2-3 वेळा करा आणि तुम्ही काही दिवसात फरक बघू शकाल. केळ्याच्या सालामध्ये बरेच अँटिऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे त्वचेवर अलर्जी आल्यास अथवा कोणत्याही किड्याने चावल्यास, याचा उपयोग करण्यात येतो.

पिवळ्या दातांना करा Bye!

सुंदर पांढरे स्वच्छ दात हवे असतील त्यावर पिकलेल्या केळाचं साल हा अप्रतिम उपाय आहे. सालाचा पांढरा भाग तुम्ही दातावर रगडा. जोपर्यंत साल पांढऱ्याचं ब्राऊन होत नाही तोपर्यंत हे दातावर घासत राहा. काही दिवसातच तुमचे दात तुम्हाला स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसतील.

केळ्याचा अनेक तऱ्हेने वापर करता येऊ शकतो हे तुम्हाला आता कळलं ना? त्यामुळे केवळ फळ म्हणून याचा वापर न करता तुमच्या सौंदर्यासाठीही याचा वापर तुम्ही नियमित करा आणि आपल्या केसांना आणि त्वचेला कोरडं होण्यापासून दूर ठेवा.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा – 

कोरड्या आणि शुष्क त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ होममेड मॉश्चराईझर

पिरेड्समध्ये तुम्ही तर करत नाही या 5 चुका

Adult Acne बद्दल तुम्हाला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 6 Facts!

 

 

Read More From Acne