DIY सौंदर्य

थकलेला चेहरा बनवा 5 मिनिट्समध्ये तजेलदार, वापरा या टिप्स

Dipali Naphade  |  Oct 28, 2020
थकलेला चेहरा बनवा 5 मिनिट्समध्ये तजेलदार, वापरा या टिप्स

 

तुमच्याबरोबरही असं बरेचदा घडतं का की, तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्यासाठी तयार झालात आणि आरशात बघितल्यावर जाणवतं की, चेहरा खूपच थकलेला दिसत आहे. अशा वेळी मूडदेखील ऑफ होतो. झोप पूर्ण न झाल्याने अथवा सतत कसल्यातरी विचारात हरवल्याने अशी वेळ येणं साहजिकच आहे. चेहरा थकलेला आणि त्वचा निस्तेज दिसते. पूर्ण झोप तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते आणि काळे डाग, सुरकुत्या कमी आणण्याासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आपली त्वचा रिलॅक्स राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाकडे मेकअप कौशल्य असतंच असंही नाही की, पटकन मेकअप करून निस्तेज चेहरा तजेलदार दाखवला. पण खरं तर तुम्हाला त्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी पटकन 5 मिनिट्समध्ये तुमचा चेहरा अधिक तजेलदार करू शकता, तेदेखील आम्ही दिलेल्या या खास टिप्स वापरून. DIY टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या टिप्स अत्यंत उपयोगी असून तुमचा चेहरा अगदी पटकन तजेलदार होण्यासाठी याचा उपयोग होतो. 

गुलाबपाणी शिंपडा

Shutterstock

गुलाबपाणी हे हायड्रेटिंग आणि चेहरा उजळविण्यासाठी योग्य घटक आहे. एक कापसाचा बोळा घ्या आणि गुलाबपाण्यात भिजवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा अथवा स्प्रेमध्ये गुलाबपाणी घेऊन चेहऱ्यावर शिंपडा. तुमचा चेहरा त्वरीत ताजातवाना दिसू लागेल. गुलाबपाण्याचा सुगंंध तुमचा मूड अप्रतिम बनवेल आणि थकवाही निघून जाईल.

मध आणि थंड पाणी

Shutterstock

मधामध्ये विटामिन बी आणि सी असते जे त्वचेला पोषण देते.  मधाचे काही थेंब चेहऱ्याला लावा आणि एक मिनिट मसाज करून थंड पाण्याने (बर्फाचं पाणी असेल तर उत्तम) चेहरा धुवा. पटकन थकवा निघून जातो आणि चेहरा तजेलदार दिसतो. याशिवाय तुम्ही मध आणि दह्याची इन्स्टंट पेस्ट बनवून फेसपॅक लाऊनही चेहऱ्यावरील थकवा घालवून चमक आणू शकता.  हे केवळ 5 मिनिट्स चेहऱ्याला लावा आणि चेहरा धुवा. तुम्हाला इन्स्टंट चमक मिळेल. 

करा लेमन फेसवॉशचा वापर

Shutterstock

अधिकांश लेमन फेसवॉशमध्ये सूदिंग आणि चेहऱ्यावर चमक आणण्याचे गुण  आढळतात. तसंच याचा सुगंध तुम्हाला ताजेपणा मिळवून देतो.  त्वचा अधिक क्लिन्झिंग करण्यासाठी याती विटामिन सी चेहऱ्याला फ्रेशनेस देतो. त्वरीत थकवा निघून जातो.

ऑलिव्ह ऑईलने करा मसाज

Shutterstock

मालिश केल्याने त्वचेला फायदा मिळतो. ऑलिव्ह  ऑईल हे त्वचेसाठी सर्वात चांगले मॉईस्चराईजर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने चेहरा अधिक उजळतो. ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब हातावर घ्या आणि मग चेहऱ्याला लाऊन हलक्या हाताने मालिश करा. रक्तप्रवाह वाढल्याने चेहरा अधिक ताजातवाना दिसायला मदत  मिळते. 

हायड्रेटिंग मास्क लावा

हायड्रेटिंग स्किन मास्क तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी आणि उजळविण्यासाठी उपयोगी ठरते.  हे त्वचेला जास्त काळापर्यंत हायड्रेशन देते ज्यामुळे चेहऱ्यावरील निस्तेजता कमी होऊन चेहऱ्यावरील थकवाही कमी होतो. एका बाऊलमध्ये दही अथवा मलई घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस, जायफळ पावडर अथवा चिमूटभर हळद पावडर मिक्स करा. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्याला लावा आणि 5 मिनिट्सनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि कमाल बघा.  तुम्ही आमचे MyGlamm चे फेसमास्कही वापरू शकता. 

खूप पाणी प्या

Shutterstock

पाणी शरीराला अधिक निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी चांगला उपाय आहे. तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकी तुमची त्वचा अधिक सुंदर आणि ताजी दिसेल. यासाठी तुम्ही अगदी नारळ पाण्याचाही उपयोग करून घेऊ शकता. तुमची त्वचा ताजी राखण्यासह उजळपणाही आणते. 

नाईट क्रिमचा करा वापर

 

रेजुवेनेटिंग मॉईस्चराईजर हे तुमच्या स्किनसाठी रूटिन केअर किटमध्ये असायला हवं. रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रिम लावणंआवश्यक आहे. तुम्हाला चेहरा थकलेला दिसायला नको असेल तर हे नक्की करा. रात्री त्वचा मॉईस्चराईज केल्यामुळे त्वचेतील नसा निरोगी राहतात आणि नैसर्गिकरित्या त्वचा चांगली राहाते.  नियमितपणे मॉईस्चराईज केल्याने सुरकुत्याही येत नाहीत आणि थकवा दिसत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From DIY सौंदर्य