लाईफस्टाईल

फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असल्यास जाणून घ्या टीप्स (English Speaking Course In Marathi)

Dipali Naphade  |  Jan 25, 2019
फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असल्यास जाणून घ्या टीप्स (English Speaking Course In Marathi)

भारतामध्ये जास्तीत जास्त लोक आपल्या मातृभाषेत अथवा राष्ट्रभाषा हिंदी (Hindi) मध्ये बोलतात. पण असं असतानाही बरेच जण असे असतात जे इंग्रजी (English) भाषेला आपली मुख्य भाषा करण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच देशांमध्ये बोलीभाषा आणि कार्यालयीन कामाकाजासाठी (official work) आपल्या मातृभाषेचाच उपयोग करतात. पण परदेशात गेल्यानंतर तुम्हाला निदान एक भाषा माहीत असणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे अर्थातच इंग्रजी. जगभरात सर्वात जास्त बोलण्यात येणारी भाषा ही इंग्रजी आहे. त्यामुळे ही भाषा बोलण्यासाठी किंवा जाणून घेणे हा एकप्रकारे प्लस पॉईंट (plus point) ठरू शकतो. पण बऱ्याच जणांना इंग्रजी बोलण्यात प्रॉब्लेम येत असतो. असं असताना ज्यांना इंग्रजी बोलण्यात अडचण येत असते त्यांच्यासाठी काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उत्कृष्ट इंग्लिश स्पीकिंग कोर्स

या अॅप्सवरून लवकर शिका इंग्लिश

या वेबसाइट्स वरून शिकू शकतो इंग्रजी

लाइफस्टाइल बदलून शिका इंग्लिश

या टीप्सचा वापर करून इंग्रजी बोला

अशा टीप्स ज्याने तुमचं व्याकरण होईल पक्क

इंग्रजीमध्ये लिखाणं करणंही सोपं

इंग्रजी ज्ञानकोष वाढवा

उत्कृष्ट इंग्लिश स्पीकिंग कोर्स (Best English Speaking Course)

कोणतीही नवी गोष्ट शिकण्याआधी तज्ज्ञांचा (expert) सल्ला घेणं नेहमीच चांगलं असतं. इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला जर कोणत्याही इंग्रजी लर्निंग सेंटर (English Learning Centre) ते इंग्लिश स्पीकिंग कोर्स (English Speaking Course) जर तुम्ही करत असाल तर ते तुमच्यासाठी नक्की चांगलं असेल. वास्तविक, अशा लर्निंग सेंटरमध्ये तुम्ही शिक्षण घेणं जास्त चांगलं. वास्तविक अशा लर्निंग सेंटर्समध्ये अॅडमिशन (admission) घेतल्यामुळे तुमच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानात तर भर पडतेच पण तुम्ही लोकांमध्ये जाऊन अगदी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकता. अशा सेंटर्समधून तुम्ही इंग्रजी बोलणं, वाचणं आणि समजून घेणं जास्त चांगल्या प्रकारे करू शकता.

मुंबई (Mumbai)

1. द ब्रिटिश कौन्सिल मुंबई (The British Council Mumbai)

दिल्लीप्रमाणे द ब्रिटीश कौन्सिलची मुंबई (Mumbai) मध्ये शाखा आहे. या शाखेमध्ये वर्ल्ड क्लास टीचिंग पॅटर्न (world class teaching pattern) वर लक्ष केंद्रित करण्यात येतं. तुम्हाला जर वाचण्याचा छंद असेल तर, इतल्या लायब्ररी (library) मध्ये तुम्हाला उत्कृष्ट कलेक्शन मिळू शकतं. इथल्या कोर्सना आंतरराष्ट्रीय दर्जा स्वीकृती (International acceptance) मिळालेली आहे.

पत्ता – 901, 9 वा मजला, टॉवर 1, वन इंडियाबुल्स सेंटर 841, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी), मुंबई, महाराष्ट्र 400013 (901, 9th Floor, Tower 1, One Indiabulls Centre 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai, Maharashtra 400013)

Also Read About मुंबई रात्रीचे जीवन

2. स्पीकवेल स्किल्स अकॅडमी (Speakwell Skills Academy)

या अकॅडमीमध्ये फेस टू फेस टीचिंग पॅटर्न अवलंबण्यात येतो. इथे जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात येतं. इथला कर्मचारीवर्ग हा प्रशिक्षित असून विद्यार्थ्यांना शिकण्यात सहजता येते आणि शिवाय इथे इंग्रजी शिकण्यासाठी वेगवेगळे कोर्स तयार करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अकॅडमीची वेळी ही तुमच्या सोयीनुसार असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार इथे जाऊन शिकता येऊ शकतं.

पत्ता – ऑफिस नं. 10 & 11, पाचवा मजला, रतन सीएचएस लिमिटेड, पँटलून्सच्या समोर, एस. व्ही. रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र – 400092 (Office No. 10 & 11, 5th Floor, Ratan CHS Ltd., Opposite Pantaloons, S.V. Road, Borivali West, Mumbai, Maharashtra – 400092)

दिल्ली (Delhi)

1. द ब्रिटिश कौन्सिल इंडिया (The British Council India)

दिल्ली किंवा त्या आसपासच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांसाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. इथली फॅकल्टी (faculty) अनुभवी असून तुमचा इथला शिकण्याचा अनुभव (learning experience) अतिशय चांगला आणि सोपा आहे. तुम्हाला जर शिक्षक होण्यासाठी इंग्रजी शिकायचं असेल तर त्यासाठीदेखील इथे तुम्हाला एक विशिष्ट कोर्स  (special course) करण्याची संधी आहे.

पत्ता – 17, केजी मार्ग, अतुल ग्रोव रोड, जनपथ, बाराखंबा, नवी दिल्ली, दिल्ली 110001 (17 KG Marg, Atul Grove Road, Janpath, Barakhamba, New Delhi, Delhi 110001)

2. ब्रिटिश सेंट कोलंबिया अकॅडमी (British St. Columbia Academy)

इंग्रजी शिकण्यासाठी इथे IELTS/ P.T.E. ट्रेनिंग प्रोग्राम्स (training programs) चालवण्यात येतात. ही अकॅडमी  सुभाष नगर, मोती नगर आणि राजौरी गार्डनच्या सेंटरमध्ये प्रस्थापित आहे. या अकॅडमीमध्ये फाऊंडेशन कोर्स (foundation course), अॅडवान्स्ड फ्लुएन्सी कोर्स (advanced fluency course), अॅक्सेंट ट्रेनिंग (accent training), बिझनेस इंग्लिश (business English), पब्लिक स्पीच (public speech), इंटरव्यू ट्रेनिंग (interview training) अशा प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत.

पत्ता – डब्ल्यू झेड 42 ए, मीनाक्षी गार्डन, तिलक नगर, सुभाष नगर मेट्रो स्टेशनजवळ, नवी दिल्ली – 110018 (WZ 42A, Meenakshi Garden, Tilak Nagar, Near Subhash Nagar Metro Station, New Delhi – 110018)

जयपूर (Jaipur)

1. करियर कंपीटेंस (Career Competence)

2006 मध्ये डॉ. नलिनी जोसफ (Dr. Nalini Joseph) द्वारे सुरु करण्यात आलेली ही संस्था (Institute) जयपूरमधील उत्कृष्ट संस्थापैकी एक समजण्यात येते. इथल्या विद्यार्थ्यांना (students) IELTS आणि TOEFL सारख्या परीक्षांसाठी (exams) देखील तयार करण्यात येतं.  

पत्ता – जी 1/ 549, मुस्कान रेसीडेन्सी चित्रकूट, सेक्टर 1, प्रताप स्टेडियमसमोर, वैशाली नगर, जयपूर, राजस्थान – 302021 (G 1/ 549, Muskan Residency Chitrakoot, Sector 1, Opposite Pratap Stadium, Vaishali Nagar, Jaipur, Rajasthan – 302021)

2. विंग्लिश2इंग्लिश (Vinglish2English)

या ठिकाणचा टिचिंग अप्रोच (teaching approach) अतिशय सोपा (liberal) आहे. या ठिकाणी तुम्हाला अतिशय मजामस्ती करत शिकवण्यावर भर देण्यात येतो. जेणेकरून तुम्हाला गोष्टी सहज लक्षात राहाव्यात. याचं ऑफिसदेखील (location) अशा ठिकाणी आहे की, शहरातील अगदी कोपऱ्यातील व्यक्तीदेखील या ठिकाणी लगेच पोहचू शकेल.

पत्ता – 401 ई & एफ, क्रिस्टल मॉल, सवाई जय सिंह हायवे बानी पार्क, जयपूर, राजस्थान – 302016 (401 E&F Crystal Mall, Sawai Jai Singh Highway, Bani Park, Jaipur, Rajasthan – 302016)

लखनऊ (Lucknow)

1. ऑक्सफोर्ड इंग्लिश स्पीकिंग कोर्स (Oxford English Speaking Course)

नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की, या ठिकाणी ब्रिटिश इंग्लिश (British English) शिकण्यावरच जास्त फोकस करण्यात येतो. तुम्ही परदेशात किंवा युरोपियन देशामध्ये (European country) फिरायला जाण्याचा वा शिकायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल, तर हा कोर्स (course) तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी आहे.

पत्ता – फैजाबाद रोड, भूतनाथ मार्केट, इंदिरा नगर, ब्लॉक डी, लखनऊ, उत्तर प्रदेश 226016 (Faizabad Rd, Bhootnath Market, Indira Nagar, Block D, Lucknow, Uttar Pradesh 226016)

2. ब्रिटिश स्कूल ऑफ लँग्वेज (British School of Language)

तुम्हाला तुमच्या इंग्रजीबरोबरच तुमचं व्यक्तिमत्त्व (personality) देखील तुम्हाला सुधारायचं असेल, तर हे सेंटर अगदी परफेक्ट (perfect) आहे. इथले शिक्षक व्याकरण (grammar) पासून ते मॅनर्सपर्यंत (manners) सर्व गोष्टींची चर्चा करतात आणि त्यामुळेच तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारण्यात मदत होते.

पत्ता – शादाब कॉलोनी, महानगर, लखनऊ, उत्तर प्रदेश 226006 ( Shadab Colony, Mahanagar, Lucknow, Uttar Pradesh 226006)

या अॅप्सवरून लवकर शिका इंग्लिश (Apps to Learn English)

कोणतीही भाषा शिकणं हे अर्थातच सोपं नाही. इंग्रजी शिकून घेणं ही बऱ्याचदा ट्रिकी (tricky) असू शकतं आणि तुमची मेहनत, इच्छा आणि वेळेवर तुम्ही किती वेळामध्ये इंग्रजी शिकू शकता हे अवलंबून आहे. जर तुम्ही क्लासरूम टिचिंगमध्ये (classroom teaching) दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे राहात असाल आणि या कारणामुळे जर तुम्ही क्लासमध्ये जात नसाल तर या डिजीटल युगामध्ये अॅप्सच्या मदतीने तुम्ही इंग्रजी शिकू शकता.

1. Duolingo

2. FluentU

3. Babbel

4. Memrise

5. HelloEnglish

6. Rosetta Stone

7. Knudge.me

या वेबसाइट्स वरून शिकू शकतो इंग्रजी (Best Websites to Learn English)

इंग्रजी शिकण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला जर कोणताही पर्याय सोडायचा नसेल तर आपल्याला जे झेपेल आणि जो पर्याय आवडेल त्यातून प्रयत्न करायला हवा. इंग्रजी शिकण्यासाठी काही खास वेबसाइट्स (websites) देखील तुम्ही शोधू (explore) शकता. तुम्हाला जर क्लासमध्ये जाऊन शिकण्याइतका वेळ नसेल किंवा अॅप्सवरूनही तुम्हाला नीट कळेत नसेल वा मदत होत नसेल, तर आम्ही इथे खाली देत असणाऱ्या वेबसाईट्सवरून तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकते. घरी बसल्याबसल्या सुद्धा तुम्हाला इंग्रजी शिकता येऊ शकते. या वेबसाईट्सवरील कंटेन्ट आणि टिचिंग पॅटर्न अतिशय मजेशीर आणि फ्रेंडली आहे.

1. बीबीसी लर्निंग इंग्लिश BBC Learning English

2. ब्रिटिश काउंसिल British Council

3. लाइवमोचा Livemocha

लाइफस्टाइल बदलून शिका इंग्लिश (Lifestyle Changes to Learn English)

कोणतीही नवी गोष्ट वा भाषा शिकणं हे कधीही सोपं नसतं याची सर्वांनाच योग्य कल्पना असते. पण एखादी गोष्ट शिकण्याची जिद्द महत्त्वाची असते. एकदा पाऊल उचलल्यानंतर पुन्हा मागे फिरणं योग्य नाही. तुम्हाला माहीत आहे का? आपली लाईफस्टाईल (lifestyle)  आणि सवयींमध्ये (habits) थोडा बदल केल्यास, कोणतीही भाषा शिकण्याची प्रक्रिया ही एकदम सोपी होऊन जाते. आम्ही तुम्हाला असंच काही सोप्या आणि मजेशीर सवयींबद्दल सांगणार आहोत, या सवयी तुम्ही लावल्यास, अगदी मजेत इंग्रजी भाषा शिकू शकता.

1. पॉडकास्ट डाउनलोड करा (Download podcasts)

इंग्रजी शिकण्याच्या बाबतीत पॉडकास्ट (podcast) ची देखील तुम्हाला मदत होऊ शकते. पॉडकास्ट (Podcast)  डाऊनलोड (download) करून तुम्ही पुन्हा – पुन्हा ऐकून कोणतीही भाषा पटकन शिकू शकता. शिवाय पॉडकास्ट तुम्ही कधीही ऐकू शकता.  ड्राईव्ह (drive) करताना, कुकिंग (cooking) च्या वेळी अथवा मॉर्निंग/ ईवनिंग वॉक (morning/ evening walk) करताना कोणत्याही वेळी तुम्हाला हे ऐकता येतं. तुम्ही जितकं तल्लीन होऊन ऐकाल आणि लक्ष द्याल, तितकं तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल.

2. इंग्रजीची सवय लावून घ्या (Bring English in your habits)

आपण रोज आपलं काम अर्थात बोलणं हे मातृभाषा अथवा हिंदीमध्ये करतो. हे बोलताना हळूहळू इंग्रजी बोलण्याची सवय सुरु करा. जर तुम्ही तुमचं वृत्तपत्र मातृभाषेत वाचत असाल, तर इंग्रजी वृत्तपत्र वाचायला लागा. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर इंग्रजी पेज अथवा अकाऊंट्स फॉलो करण्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त इंग्रजी चित्रपट आणि टीव्ही शो बघितल्यामुळे तुमचं इंग्रजी सुधारू शकतं.

3. अॅप्सवरून सुधारा इंग्रजी (Download apps to improve English)

कँडी क्रश (Candy Crush) आणि पबजी (PubG) सारखे गेम्ल (games) खेळायला मजा येते पण आयुष्यात याचा काही उपयोग होत नसतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून तुम्ही इंग्रजी लर्निंग अॅप्स (English Learning Apps) डाऊनलोड करण्यावर भर द्या. मोबाईलवर खेळणं तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही पझल अथवा क्विझसारखे गेम्स डाऊनलोड करून घ्या आणि ते खेळा त्यामुळे तुमचं इंग्रजीचं ज्ञान वाढण्यास मदत होते.

4. इंग्रजी ऐकण्याची सवय लावा (Listen To English)

कोणतीही गोष्ट वाचताना ती ऐकण्याचीदेखील आपली तयारी हवी त्यामुळे तुमची स्मरणशक्ती (memory power) मजबूत होते. तुमचं काम जर डेस्कवर असेल अथवा घरापासून ऑफिस जर बऱ्यापैकी अंतरावर असेल तर तुम्ही इअरफोन लावून इंग्रजी गाणं ऐकण्याची सवय लावून घ्या. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही इंग्रजी नॉव्हेलदेखील डाऊनलोड करू शकता.

5. इंग्रजी बोला (Speak in English)

कोणतीही भाषा शिकण्यासाठी ती वाचणं, ऐकणं आणि बघणं यासह बोलणंदेखील आवश्यक आहे. तुम्हाला जर इंग्रजी भाषा चांगली अवगत व्हायला हवी असेल तर, ती भाषा बोलायला लागा. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा इंग्रजीमध्ये बोलणारे लोक नसतात. अशावेळी तुम्ही आरशासमोर उभं राहून इंग्रजी बोलण्याचा सराव करा. विविध वेबसाईट्स (websites) वर इतर लोकांशी इंटरॅक्टदेखील करून तुम्ही इंग्रजीचा सराव करू शकता.

6. शब्दकोष वाढवा  (Improve vocabulary)

तुम्हाला जेव्हा इंग्रजी वाचता, बोलता आणि समजायला लागेल तेव्हा आपल्या शब्दकोषामध्ये जास्तीत जास्त शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचा शब्दकोष वाढवायला लागा. रोजच्या आयुष्यात तुम्हाला लागणाऱ्या भाज्या, फळं आणि मसाल्यांची नावं इंग्रजीमध्ये शिकून घ्या. शॉपिंग (Shopping) केल्यानंतर तुम्ही तुमच्या मसाल्यांच्या डब्यानंतर इंंग्रजी नावाची लेबल्स (label) लावून द्या.

या टीप्सचा वापर करून इंग्रजी बोला (Tips to Speak Fluent English)

तुम्ही बेसिक इंग्रजी शिकण्याचा पहिला टप्पा पार केला असेल तर इंग्रजी बोलण्यात लाज बाळगू नका. आम्ही दिलेल्या या टीप्समुळे तुम्हाला इंग्रजी बोलणं अतिशय सोपं जाईल.

1. इंग्रजीमधील असे शब्द शिका, जे तुम्हाला रोजच्या आयुष्यात बोलावे लागतात आणि जे अतिशय प्रचलित असतात.

2. इंग्रजीमधून विचार करणं सुरु करा, तेव्हाच तुम्ही बोलू आणि लिहू शकाल.

3. स्वतःहून इंग्रजीमध्ये बोला

4. आरशात बघून बोलण्याचा सराव करा

5. टंग ट्विस्टर्स (tongue twisters) ट्राय करा

6. ऐकून पुन्हा बोलण्याचा सराव करा

7. इंग्लिश रेडिओ चॅनल्स (radio channels) वर गाणी ऐका

8. इंग्लिश व्हिडिओ (video) अथवा चित्रपट (films) बघण्याची सवय करा

9. इंग्लिश पुस्तक वाचून त्याचा रिव्ह्यू (review) इंग्रजीत लिहा

10. लोकांबरोबर इंग्रजी बोलण्याची सवय लावून घ्या

अशा टीप्स ज्याने तुमचं व्याकरण होईल पक्क (Tips To Improve English Grammar)

कोणतीही भाषा शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट अर्थात सोपा मार्ग नाही. इंग्रजी शिकण्यासाठी आणि बोलण्यासाठी योग्य व्याकरण (grammar) माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. या टीप्समुळे तुम्ही तुमच्या इंग्रजीचं व्याकरण सुधारू शकता.

1. इंग्रजी पुस्तक, न्यूजपेपर्स आणि मॅगझीन्स (magazines) वाचा

2. व्याकरणाचे नियम (grammar rules) लक्षात ठेवा

3. ऑनलाईन ग्रामर टेस्ट (Online Grammar Test) मध्ये सहभागी व्हा

4. इंग्रजीमध्ये लिखाण चालू करा

5.  लोकांशी इंग्रजीमध्येच बोला

6. इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या लोकांचं इंग्रजी ऐका

7. शाळा आणि महाविद्यालयाच्या पातळीची इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं खरेदी करा आणि त्याचा सराव घरी करा

इंग्रजीमध्ये लिखाणं करणंही सोपं (Tips to Write in English)

काही लोकांसाठी इंग्रजी वाचणं, बोलणं आणि समजून घेणं हे अतिशय सोपं असतं पण त्यांना इंग्रजी लिहिणं तितकं जमत नाही. त्यांना इंग्रजी लिहिताना अडचण येते. व्याकरणांच्या चुकांमुळे नीट वाक्यरचना बऱ्याच जणांना करता येत नाही. तुम्हाला इंग्रजी लिहिण्याचा जर आत्मविश्वास नसेल तर, आम्ही दिलेल्या टीप्समुळे तुम्हाला तुमचं इंग्रजी रायटिंग स्किल (English writing skills) अर्थात कौशल्य सुधारता येऊ शकतं.

1. ज्ञान कोष (Vocabulary) वाढवण्यावर जास्त भर द्या

2. स्पेलिंगमधील चुका (Spelling mistakes) सुधारा

3. व्याकरण कौशल्य (Grammar skills) सुधारा

4. लिखाण कौशल्यासह (Writing skills) विविध प्रयोग (experiment) करा

इंग्रजी ज्ञानकोष वाढवा (Ways to Improve English Vocabulary)

सर्वांंच्या म्हणण्यानुसार, कोणतीही भाषा डोक्यातून अगदी मनामध्ये उतरण्यासाठी त्याचा ज्ञान कोष (vocabulary) वाढवण्याची आवश्यकता असते. आता प्रश्न असा असतो की, आपला ज्ञानकोष नक्की कसा वाढवायचा? तुम्हालासुद्धा हा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी आमच्याकडे काही सोप्या टीप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा ज्ञानकोष वाढवू शकता.

1.  रोज नवे शब्द पाठ करून ते लिहा

2. डिक्शनरी (Dictionary) च्या मदतीने तुम्हाला नवे शब्द (words), त्याचे अर्थ (meaning) आणि त्याचं वाक्य (sentence) बनवायला शिका

3. बोलताना आणि लिहिताना नव्या शब्दांचा प्रयोग करा

4. वर्ड पझल्स (word puzzles) सोडवण्याची सवय लावून घ्या

5. रिकाम्या वेळी स्क्रॅबल (Scrabble) सारके वर्ड गेम्स (word games) खेळा

6. समानार्थी (synonym) आणि विरुद्धार्थी (antonym) शब्दांची यादी बनवा

कोणतीही नवी भाषा शिकताना भीती आणि संकोच या दोन्ही भावना मनातून काढून टाका. आपण चुकीचं बोलत असू तर समोरचा माणूस काय विचार करेल याचा तुम्ही विचार करू नका. सुरुवातीला सगळ्यांच्या चुका होतात फक्त त्या चुका आपल्याबरोबर सुधारत जा आणि आत्मविश्वासाने पुन्हा एकदा दुसऱ्यसमोर मांडणं सुरु करा.

हेदेखील वाचा –

How to Improve English in Hindi

सिद्धार्थ – मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा

मराठमोळ्या आकाश कुंभारचा आगळावेगळा वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स

Read More From लाईफस्टाईल