बिर्याणी घरी बनवावी आणि मनसोक्त खावी असे अनेकांना वाटते. पण खूप वेळा रेडिमेड परफेक्ट बिर्याणी सारखी चव घरच्या बनवलेल्या बिर्याणीला येत नाही. आपण काय चुकतो हे आपण शोधतो. वेगवेगळे मसाले आणि वेगवेगळ्या ट्रिक्सही ट्राय केल्या जातात. पण तुम्ही कधी घरी बिर्याणीसाठी लागणारा मसाला बनवला आहे का? जर फ्रेश मसाला तुम्ही कधीही बनवला नसेल आणि नेहमी पाकिटातील बिर्याणी मसाला वापरत असाल तर तुम्हाला घरीच मस्त बिर्याणी मसाला बनवता येऊ शकतो. हा असा बिर्याणी मसाला आहे जो परफेक्ट बनतो आणि त्याची चवही एकदम मस्त लागते.
असा बनवा बिर्याणी मसाला
बिर्याणी मसाला बनवण्यासाठी तुम्हाला काही खास खडे मसाले लागतात. ते मसाला वापरुन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवता येऊ शकतो.
साहित्य: 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या, 3 ते 4 तमालपत्र, 2 मोठे चमचे धणे, 2 मोठे चमचे शहाजिरे, 3 जावेत्री, 2 इंच दालचिनी, 1 जायफळ, 1 चमचा लवंग, 2 मोठी वेलची, 3 स्टारफुल, 4 छोटी वेलची, 1 चमचा काळीमिरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा हळद
कृती:
- एक पॅन घेऊन त्यामध्ये सगळ्यात आधी सुक्या मिरच्या, तमालपत्र भाजून घ्या.
- त्यानंतर धणे, शहाजिरे, आणि जिरे भाजून घ्या. त्यानंतर जावेत्री, दालचिनी, जायफळ, लवंग, मोठी वेलची, स्टारफुल आणि छोटी वेलची, काळीमिरी, बडीशेप चांगले भाजून सगळे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करा.
- बारीक मसाला भाजून घ्या. त्यामध्ये सगळ्यात शेवटी हळद घालून मिश्रण एकजीव करा. या बिर्याणी मसाल्याचा सुगंद इतका मस्त येतो की तुम्हाला बिर्याणी करताना हा अगदी चमचाभऱ घातला तरी देखील या बिर्याणीचा स्वाद चांगला वाढतो.
- बिर्याणीला फोडणी देताना किंवा तुम्ही भाज्या किंवा चिकन मॅरिनेट करताना तुम्ही त्यामध्ये थोडासा मसाला घाला. त्यामुळे तुमच्या बिर्याणीला अधिक चांगला स्वाद मिळण्यास मदत मिळते.
अशी करा बिर्याणी
बिर्याणी चांगली आणि परफेक्ट व्हायची असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करायला हव्यात. त्या पुढील प्रमाणे
- बिर्याणीसाठी तांदूळ शिजवताना तो चांगला फडफडीत आणि चांगला शिजलेला हवा असेल तर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून तो निथळत ठेवा. अर्धातासानंतर एका टोपात पाणी घेऊन त्यामध्ये खडे मसाले घालून पाणी घाला. पाणी उकळले की, त्यामध्ये तांदूळ घाला आणि थोडेसे तेल घालून भात ¾ शिजू द्या. भात फडफडीत होईल.
- बिर्याणीच मसाला बनवताना कोणत्याही मॅरिनेशनमध्ये तो मसाला घाला. त्यामुळे तो मसाला अधिक चांगली चव देतो.
आता असा बिर्याणी मसाला बनवा आणि नक्की घरी करा या मसाल्यापासून बिर्याणी
अधिक वाचा
चिकनच्या मस्त रेसिपीज मराठीत (Chicken Recipes In Marathi)
झक्कास कोळंबी रेसिपी (Kolambi Recipes In Marathi)
मुंबईत सध्या चर्चा आहे ती पारकर बिर्याणीची. काय आहे या मागची कहाणी