Care

घरच्या घरी बनवा हेअर जेल,जाणून घ्या कसं

Trupti Paradkar  |  Sep 17, 2020
घरच्या घरी बनवा हेअर जेल,जाणून घ्या कसं

कोरोनामुळे निर्माण झालेल्या जागतिक मंदीमुळे प्रत्येकालाच काही दिवस काटकसरीने वागावं लागणार आहे. पैसे वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनावश्यक खर्च टाळणं. वेळ आणि पैशांचे योग्य नियोजन करून तुम्ही तुमच्या मासिक खर्चावर नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर सौंदर्यावर होणारा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही काही स्किन केअर प्रॉडक्ट घरीदेखील तयार करू शकता. असं केल्यामुळे तुमची बचत तर होईलच शिवाय तुम्हाला अप्रतिम ब्युटी प्रॉडक्ट घरीच मिळू शकतील.कारण त्वचेची काळजी घेण्यासाठी डेली स्किन केअर रूटीनमध्ये तुम्हाला अनेक प्रॉडक्टची गरज लागत असते. केसांची निगा राखण्यासाठी हेअर शॅम्पू, हेअर कंडिशनर, हेअर सीरम आणि हेअर जेल ही महत्वाची स्किन केअर प्रॉडक्ट आहेत. आज आम्ही तुमच्यासोबत घरच्या घरी हेअर जेल कसं करायचं याच्या सोप्या टिप्स शेअर करत आहोत. त्यामुळे या स्टेप बाय स्टेप्स फॉलो करा आणि तुमचं हेअर जेल तुम्हीच बनवा. 

Shutterstock

होममेड हेअर जेल तयार करण्याची पद्धत –

होममेड हेअर जेल तयार करण्यासाठी तुम्हाला अगदी काही मिनिटे लागतील. शिवाय त्यासाठी लागणारं साहित्यही तुम्हाला कोणत्याही मेडिकल अथवा ब्युटी सेंटरमध्ये सहज मिळू शकेल. सध्या ऑनलाईन डिलिव्हरी सुरू झाल्यामुळे या वस्तू तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमचा वेळ, पैसा तर वाचेलच शिवाय तुम्हाला घराबाहेरील असुरक्षित वातावरणात जाण्याची आवशक्ता  लागणार नाही. 

हेअर जेल साठी लागणारे साहित्य –

हेअर जेल घरीच कसं तयार कराल –

स्टेप 1 – एका रिकाम्या आणि स्वच्छ काचेच्या डही अथवा मोठं तोंड असलेल्या बाटलीमध्ये एक कप कोमट पाणी घ्या.

स्टेप 2 – कोमट पाण्यात एक चमचा कोणताही फ्लेवर नसलेले जेलेटिन मिसळा

स्टेप 3 – या मिश्रणात दोन ते तीन थेंब रोझमेरी इसेंशिअल ऑईल मिसळा

स्टेप 4 – टूथपिकच्या मदतीने हे मिश्रण ढवळून एकजीव करा 

स्टेप 5 – डबी अथवा बाटलीचे झाकण घट्ट बंद करून ती चार ते पाच तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा

स्टेप 6 – जेल चांगल्यापद्धतीने सेट झालं की वापरासाठी तयार आहे

तयार झालेल्या जेलचं टेक्चर तुम्हाला हवं  तसं नसेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी एक चमचा जेलेटिन मिसळू शकता. ज्यामुळे ते अधिक घट्ट होईल. तुम्ही हे हेअर जेल तुमच्या निस्तेज केसांना चमकदार करण्यासाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या केसांमधील कर्ल्स व्यवस्थित दिसावेत यासाठी हे हेअर जेल खूपच फायदेशीर आहे. यासाठी तुमच्या केसांच्या टोकांना हे जेल लावून थोडं स्क्रंच करा. जर तुम्हााला यात आणखी नाविण्य आणायचं असेल तर रोझमेरी ऑईलप्रमाणेच इतर कोणत्याही तुमच्या आवडीच्या इसेंशिअल ऑईलचा तुम्ही वापर करू शकता. लव्हेंडर, लेमनग्रास, पेपरमिंट ऑईल यासाठी बेस्ट ठरेल. आता तुम्ही घरच्या घरी हेअर जेल बनवण्याची युक्ती शिकलेला आहात. त्यामुळे विचार करा तुमचे किती पैसे तुम्ही यातून वाचवू शकता. तेव्हा बचत करा  आणि स्वतःच असे तुमचे नवनवीन ब्युटी प्रॉडक्ट तयार करा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

लिंबाच्या साली फेकू नका तर असा करा उपयोग

त्वचेसाठी उपयुक्त आहे भेंडी,असा तयार करा होममेड फेसपॅक

हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस

Read More From Care