DIY सौंदर्य

चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी उपाय (How To Reduce Redness On Face In Marathi)

Dipali Naphade  |  Sep 11, 2020
How To Reduce Redness On Face In Marathi

कधी कधी त्वचेवर लाल डाग अर्थात लालिमा (रेडनेस) (redness on face) येतात. सूर्याच्या किरणांमुळे अथवा कोणत्या तरी अलर्जीमुळे हे डाग येत असतात. पण तुम्हाला हा त्रास सतत होत आहे का? असं असेल तर चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यसाठी आपण घरगुती आणि सोपे उपाय या लेखातून जाणून घेऊया. नक्की चेहऱ्यावर हा लालपणा का येतो आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण हे हटवू शकतो की नाही याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. मुळात त्वचेवर लालपणा अर्थात लालिमा ही कपाळ, नाक, गाल आणि डोळ्यांच्या आसपास दिसून येते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता यावर वेळेवर उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा त्वचेसंबंधी अधिक समस्या होऊ शकतात. लवकरात लवकर हा लालपणा दूर करण्यासाठी उपाय करायला हवा. यावर कोणत्याही इतर उपायांपेक्षा घरगुती आणि सोपे उपाय करणे सोयीस्कर आहे. असेच काही उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जाणून घ्या काय आहेत हे सोपे उपाय. पण त्याआधी नक्की चेहऱ्यावर लालिमा (रेडनेस) का येते त्याची कारणे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. 

चेहऱ्यावर लालपणा येण्याची कारणे (Causes Of Redness On Face In Marathi)

instagram

चेहऱ्यावर लालिमा येण्याची समस्या अनेक जणांना असते. ही समस्या सूर्यप्रकाशात जास्त वेळ आल्याने अथवा मेनोपॉज आणि रोसेसिया या कारणांमुळे होते. रोसेसिया ही एक त्वचेसंबंधित स्थिती आहे जी त्वचेमधील रक्तवाहिन्यांना पातळ करून त्वचेमध्ये लालपणा आणते. बऱ्याचदा त्वचेची जळजळ झाल्यानेही त्वचेवर लालपणा दिसून येतो. तर काही जणांना तापमानात बदल झाल्यास, चेहऱ्यावर लालिमा येते. तर काही जणांना दारूचे सेवन जास्त केल्यास हा त्रास होतो. प्रत्येकाच्या त्वचेनुसार याची कारणं आहेत. तर काही जणांना व्यायाम केल्याने आणि काही औषधांनीही ही समस्या सुरू होऊ शकते. विविध कारणांमुळे त्वचेवर रेडनेस येताना दिसून येतो. तसंच अगदी संवेदनशील त्वचा असणाऱ्यांपासून ते कोरडी त्वचा असणाऱ्या सर्वांना ही समस्या उद्धवू शकते. जाणून घेऊया महत्त्वाची कारणे 

अशी लाल त्वचा लपवणं अशक्य आहे. पण तुम्हाला यापासून घरगुती उपाय करून नक्कीच सुटका मिळू शकते. तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीतूनही तुम्ही यावर उपाय करू शकता. जाणून घेऊया काय आहेत सोपे उपाय. त्याचप्रमाणे तुम्ही नियमित MyGlamm च्या वाईपआऊट सॅनिटाईझिंगचाही उपयोग करून घेऊ शकता.

चेहऱ्यावर लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी टिप्स (Tips To Reduce Facial Redness In Marathi)

घरातल्या काही वस्तूंचा वापर करून आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी नक्की काय करायचे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

कोल्ड कंप्रेस (Cold Compress)

Shutterstock

अधिक तापमानामुळे आपल्या त्वचेवर सूज आणि लालपणा येऊ शकतो. अशावेळी कोल्ड कंप्रेसने आपण आपल्या चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी मदत घेऊ शकतो. हा अतिशय सोपा आणि परिमाणकारक उपाय आहे. चेहर्‍यावरील लालसरपणाशिवाय मराठीमध्ये बिकिनी शेव्हिंगबद्दल जाणून घ्या.

नारळाचे तेल (Coconut Oil)

Shutterstock

नारळाचे तेल तर सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असते. कधी कधी बॅक्टेरियामुळे त्वचेवर सूज आणि लालसरपणा अर्थात लालिमा येते. यासाठी नारळाचे तेल हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये लॉरिक अॅसिड आढळते, ज्यामध्ये अँटिफंगल गुण असतात. याशिवाय हे संक्रमणावर योग्य उपचार करते आणि त्यामुळे चेहऱ्यावर लालिमा निघून जाण्यास मदत होते. 

लवेंडर तेल (Lavender Oil)

Shutterstock

काही शोधानुसार, लवेंडर तेलामध्ये अँटिफंगल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबाय घटक असतात, जे बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढा देण्यास फायदेशीर ठरतात. तसंच बॅक्टेरियल इन्फेक्शन चेहऱ्यावरील लालिमा आणि सूज येण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता. 

पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly)

चेहऱ्यावर लालिमा पूर्ण तऱ्हेने नाहीशी होण्यासाठी पेट्रोलियम जेली हा उत्तम उपाय आहे. वास्तविक यामध्ये यौगिक असते ज्याला पेट्रोलियम म्हटले जाते. हे त्वचेमध्ये जाऊन त्वचा अधिक चांगली आणि स्वच्छ बनविण्यास फायदेशीर ठरते. पेट्रोलियम जेलीमध्ये अँटिमायक्रोबायल घटक असतात जे संक्रमणाशी दोन हात करून आपल्याला लालसरपणाविरुद्ध लढण्यास मदत करतात. 

दही (Curd)

Shutterstock

दही वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण दही हे एक प्रोबायोटिक पदार्थ आहे. यामुळे तुमची त्वचा बाहेरील प्रदूषणापासून वाचते आणि त्वचेबद्दल संवेदनशीलता नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे लालसरपणापासून सुटका मिळते. दह्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील लालिमा काढून टाकू शकता. आपण चॉकलेट, रिका आणि नियमित मेणाद्वारे अवांछित केस काढू शकता.

काकडी (Cucumber)

Shutterstock

काकडी हे फायटोकेमिकल्सचा एक चांगला स्रोत आहे. जो चेहऱ्यावरील लालिमा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. इतकंच नाही तर त्वचा स्वच्छ करण्यासह त्वचेवर मुलायमपणा ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो. चेहऱ्यावरील लालपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग कसा करायचा जाणून घ्या. 

कोरफड जेल (Aloe Vera Gel)

Shutterstock

कोरफड जेलमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात आणि यामुळे चेहऱ्यावरील लालिमा कमी होण्यास मदत मिळते. तसंच कोणतेही घाव असल्यासदेखील त्यावरील लालिमा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. कारण हे घाव लवकर भरण्यास मदत करते. 

मध (Honey)

Shutterstock

त्वचेसंबंधी समस्या असल्यास, मध हा त्यावरील उत्तम उपाय आहे. वास्तविक मधामुळे घाव आणि लालसरपणा पटकन भरला जातो. त्यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा हा त्वरीत कमी करण्यसाठी मधाचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्समुळे मदत मिळते.

ग्रीन टी (Green Tea)

Shutterstock

ग्रीन टी मध्ये बरेचसे अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे त्वचेवरील सूज आणि लालिमा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचा वापर करणेही अत्यंत सोपे आहे

हळद (Turmeric)

Shutterstock

हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक म्हणून वापरली जाते. त्यामुळे त्वचेसंबंधी कोणत्याही समस्येवर हा उत्तम उपाय आहे. हळद एक हर्बल अँटिइन्फ्लेमेटरी आहे. यामुळे कितीही त्रासदायक लालसरपणा असला तरीही तो कमी करण्यास फायदा मिळतो. तसंच चेहऱ्यावरील लालिमा पूर्ण नष्ट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ओटमील (Oatmeal)

Shutterstock

कोलायडल ओटमील चेहऱ्यावर दिसणाऱ्या लालिमा काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. कोलायडल ओटमील हा दलियाचे एक स्वरूप आहे. यामुळे केवळ मॉईस्चराईजिंगच होत नाही तर अँटिइन्फ्लेमेटरी गुणामुळे होणाऱ्या जळजळीतूनही सुटका मिळते. 

चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी करा हे बदल (Lifestyle Changes To Remove Redness On Face In Marathi)

चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्येही काही बदल करण्याची आवश्यकता आहे. ते बदल नक्की काय आहेत ते जाणून घेऊया. मऊ चमकणार्‍या त्वचेसाठी रासायनिक त्वचेची साल सोलून पहा.

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. टूथपेस्टमुळे लालसरपणा कमी होतो का?

टूथपेस्टमुळे पिंपल्स, रॅशेस अथवा पुरळ हे डिहायड्रेट करता येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी फायदे होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून याबाबत सल्ला घेणे जास्त सोयीस्कर ठरेल.

2. चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी कोणते उत्कृष्ट मॉईस्चराईजर आहे?

तुमच्या चेहऱ्यावर लालिमेमुळे डाग आले असतील तर तुम्ही हर्बल फेसवॉशचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे सूज कमी करून लालिमा कमी करता येते. तसंच यामध्ये असणारा कोरफडचा अर्क तुम्हाला फायदा मिळवून देतो.

3. लालिमेपासून वाचण्यासाठी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी?

पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करून घ्या. बाहेर जाताना नेहमी सनस्क्रिन लावा आणि उष्णतेपासून दूर राहा. तसंच चेहरा नेहमी मॉईस्चराईज करा आणि दिवसातून किमान एकदा तरी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य