त्वचेसंबंधित समस्यांपैकी सर्वात कॉमन समस्या आहे ती म्हणजे ब्लॅकहेड्सची (Blackheads). ब्लॅकहेड्समुळे चेहरा अत्यंत खराब दिसतो. त्यामुळे महिला पार्लरमध्ये जाऊन यासाठी हजारो रुपयांची ट्रीटमेंट करून घेतात. पण अनेकदा याचाही फायदा मिळत नाही आणि ब्लॅकहेड्स पुन्हा चेहऱ्यावर येऊ लागतात. तुम्हालाही या समस्येतून सुटका हवी असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून पाहा. यामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे तुम्हाला त्वचेवर याचा काहीही दुष्परिणाम दिसून येत नाही. कॉफीचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून टाकू शकता. काही सोप्या टिप्स जाणून घ्या.
कॉफीचे फायदे
कॉफीचे अनेक फायदे आहेत. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट तत्व आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. कॉफीच्या बिया या डेड स्किनचा वरील लेअर स्वच्छ करण्याचे चांगले काम करते. त्यामुळे त्वचेचा मूळ रंग आणि मूळ त्वचा दिसून येते. तर लिंबू क्लॉग पोर्समुळे होणाऱ्या डागांपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते. दही आणि नारळाचे तेल चेहऱ्याला मॉईस्चराईज करतात आणि कॉफीचा वापर केल्याने चेहऱ्याला चमकही मिळते. तुमच्या डोळ्यांवर पफीनेस आला असेल तरीही तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. कॉफी स्क्रबने त्वचेवर अधिक चमक येते.
ब्लॅकहेड्सची कारणे (Reason of Blackheads)
स्किन ग्लँड्समध्ये हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे ब्लॅकहेड्स होतात. आपल्या शरीरात सेबेसियस ग्लँड तेलाचे उत्पादन करतात, म्हणून ब्लॅकहेड्स होतात. स्किन मॉईस्चराईज करण्यासाठी सीबमची गरज असते. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन बदल अधिक प्रमाणात होतात आणि त्वचा अधिक संवेदनशील होते. ब्लॅकहेड्सचे आकार अधिक वाढतात, ज्यामुळे सीबमचे प्रमाण अधिक होते. या कारणामुळे त्वचा अधिक तेलकट होते. ग्लँड्स ओपनिंगजवळ त्वचेचे सेल्स वाढतात, त्यामुळे ग्लँड्सची ओपनिंग काळी होते. धूळ आणि घाण या ब्लॉक ग्लँड्सवर जमते आणि ब्लॅकहेड्सचे स्वरूप घेते.
कॉफी स्क्रब (Coffee Scrub)
ज्याप्रमाणे आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण स्क्रबचा वापर करतो, त्याप्रमाणे ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही कॉफी स्क्रबचा उपयोग करून घेता येतो.
साहित्य
- 2 चमचे कॉफीच्या बी
- अर्धा चमचा लिंबाचा रस
- 1 चमचा नारळाचे तेल
- अर्धा चमचा दही
बनविण्याचे विधी
- सगळे साहित्य एकत्र करून घ्या
- हा स्क्रब तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नीट लावा. थोडा सुकल्यावर तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करा
- कॉफी तुमच्या चेहऱ्यावर यामुळे शोषली जाईल
- नीट मसाज करून झाल्यावर चेहऱ्यावर स्वच्छ पाणी मारून चेहरा स्वच्छ धुवा
- तुम्हाला हवं असेल तर केवळ ब्लॅकहेड्सासाठीच नाही तर संपूर्ण भागावरही कॉफी स्क्रब लाऊ शकता
- आठवड्यातून दोन वेळा तुम्ही स्क्रबचा वापर करा. यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातील
ब्लॅकहेड्ससाठी पॅक
तुम्ही कॉफीच्या बनलेल्या पॅकनेदेखील ब्लॅकहेड्स काढू शकता. कॉफीपासून बनलेले हे फेसपॅक ब्लॅकहेड्ससह चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी उपयोगी ठरते. घरगुती वस्तूंचा वापर करून ब्लॅकहेड्सच्या त्रासापासून सुटका करून घ्या.
साहित्य
- अर्धा कप नारळाचे तेल
- कॉफी बी
बनविण्याची पद्धत
- सर्वात पहिल्यांदा नारळाचे तेल गरम करून घ्या
- एका बाऊलमध्ये अर्धा कप गरम नारळाचे तेल आणि अर्धा कप ताजी कॉफीची बी घाला
- आता या स्क्रबचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर करा आणि साधारण 5 मिनिट्स चेहऱ्यावर मसाज करा
- मसाजनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा
- आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर नक्की करा. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होतील
कॉफी मास्क बनवा (Coffee Mask)
कॉफी मास्कमुळे केवळ ब्लॅकहेड्स कमी होत नाहीत तर संपूर्ण चेहरा स्वच्छ होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर याचा वापर करून घेऊ शकता. कॉफी मास्क आणि कॉफी स्क्रबमुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.
साहित्य
- कॉफी बी
- साखर
- 2 चमचा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
- 3 विटामिन ई कॅप्सुल
बनविण्याची पद्धत
- सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करून घ्या
- या स्क्रबने केवळ ब्लॅकहेड्स निघणार नाहीत तर तुमच्या चेहऱ्यावर यामुळे चांगले मॉईस्चराईजरदेखील राहील. यामुळे त्वचा मुलायम होईल
- त्यामुळे हे संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा
- सुकल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा
कॉफी स्क्रब वापरून तुम्ही सोप्या पद्धतीने ब्लॅकहेड्स हटवू शकता. अशी सोपी पद्धत तुमच्या कामी नक्की येईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक