DIY फॅशन

उंची कमी असेल तर अशी करा साड्यांची निवड, दिसाल उंच

Leenal Gawade  |  Dec 16, 2020
उंची कमी असेल तर अशी करा साड्यांची निवड, दिसाल उंच

उंची कमी असणे म्हणजे काही गुन्हा नाही. पण उंची कमी असेल तर आहे ती उठावदारपणे दिसून येण्यासाठी तुम्ही काही सोप्या फॅशन ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करायला हव्या. साडी नेसणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. साडी नेसण्याची पद्धत ही उंच दिसण्यासाठी जितकी महत्वाची वाटते. तितकीच साडीची निवडही महत्वाची आहे. तुम्ही एखादी साडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर सगळ्यात आधी साडीची निवड तुमच्या कमी उंचीमुळे कशी निवडायला हवी हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही कोणतीही साडी नेसली तरी त्यामध्ये तुम्ही उचंच दिसाल. साडी निवडताना नेमके कोणते निकष लावावेत यासाठी काही सोप्या टिप्स

छोटा काठ

Instagram

काही जण साड्यांची निवड त्यांच्या सुंदर काठांवरुन करतात. जितका काठ सुंदर तितकी साडी अधिक उठून दिसते असे अनेकींना वाटते. जर तुम्हालाही असेच वटत असेल तर तुम्ही अशा मोठ्या काठांच्या साड्या मुळीच निवडू नका. साड्यांचा काठ जितका मोठा असेल तितके तुम्ही त्या काठांमध्ये  बुडून जाता. त्यामुळे तुमची उंची आपसुकच कमी वाटते. पैठणी, बनारसी, कांजिवरम, चंदेरी या साड्यांचे काठ खूप मोठे असतात. जर तुम्हाला या साड्यांपैकीच काही साड्या निवडायच्या असतील तर तुम्ही त्यांचे काठ जाणीवपूर्वक बारीक निवडा. बारीक काठांच्या साड्या या तुमच्या उंचीला खुलून दिसतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच उंच आणि ग्रेसफुल दिसता. ही साडी नेसल्यानंतर तुम्ही त्यात अगदी सहज वावरता असे वाटेल. त्यामुळे साड्यांची निवड करताना अगदी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे त्याचा काठ हा बारीक निवडायचा आहे. 

तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी

बारीक डिझाईन

Instagram

साड्यांचा काठ पाहिल्यानंतर अनेकांना साड्यांवरील बुट्टी, फुल, कोयरी अशा काही डिजाईन निवडायला आवडतात. साड्यांवर डिझाईन असणे काहीच वाईट नाही. पण या डिझाईन फार मोठ्या झाल्या तर मात्र त्या साड्या तुमची उंचीवर परिणाम करतात. उंची कमी असली की, शरीराचा भाग हा तुलनेने लहान असतो. जर डिझाईन मोठी असेल तर तुमच्या शरीराचा सबंध भाग हा त्यामध्ये झाकोळला जातो. त्यामुळे तुम्ही आहे त्या उंचीपेक्षाही फार कमी दिसता त्यामुळे बारीक डिझाईन निवडणे  नेहमी उत्तम. महागड्या आणि काठापदरांच्या साड्यांमध्ये हल्ली बारीक डिझाईन्सचे पर्याय मिळतात ते निवडायला विसरु नका. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

प्लेन साड्यांची निवड

Instagram

दोन ते तीन रंगाच्या आणि भगभकीत रंगाच्या सांड्या ही निवड तुमच्यासाठी असू शकत नाही. तुम्ही जितक्या रंगाचा गुंता तुमच्या साडीमध्ये घ्याल तितकी तुम्हाला ती साडी त्यामध्ये बुडवून टाकेलअसे दिसेल.  साड्यांची निवड करताना तुम्ही जास्तीत जास्त प्लेन साड्या निवडा. प्लेन साड्या या दिसायला फारच चांगल्याही दिसतात आणि त्या सुटसुटीत असतात.  प्लेन साडी असेल तर तुमची उंचीही त्यामध्ये चांगलीच उठून दिसते. जर पारंपरिक साड्या वगळता तुम्ही जॉर्जेट किंवा डिझायनर साड्या निवडत असाल तर त्यामध्ये प्लेन साड्यान निवडा. ज्या तुम्हाला फार चांगला लुक देऊ शकतील. 

भरजरी साड्या नको

Instagram

खूप जणांना डिझायनर साड्या नेसायला फार आवडतात. पण त्या साड्या घेतानाही उंचीचा विचार करणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही खूप भरजरी साडी घेतली तर नक्की त्यामध्ये तुमची उंची झाकोळली जाते. तुम्हाला एक प्रकारचा ग्रेस मिळत नाही. जर तुम्हाला डिझायनर साड्या निवडायच्या असतील तर तुम्ही तुमच्या साड्यांचा काठ हा थोडा डिझायनर निवडा. साडी प्लेन आणि बारीक भरलेला काठ असेल तरी देखील त्यामध्ये तुमची उंची चांगलीच उठून दिसते.

आता साड्यांची निवड करताना हे काही मुद्दे लक्षात ठेवा आणि साड्यांची निवड करा. 

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

Read More From DIY फॅशन