पावसात भिजू नये याची आपण किती काळजी घेतो. छत्री, विनचिटर, रेनकोट, टोपी, कपड्यांवर चिखल उडू नये म्हणून खास चपलाही घालतो. पण या चपलांमुळे तुमच्या नखांना अनेकदा त्रास होण्याची शक्यता असते. पायांची नखं या चपलांमध्ये राहून अनेकदा तुटतात. जर तुमचा पाय तुमच्या पावसाळी चपलांमध्ये उघडा असेल तर तुमच्या नखांमध्ये घाण जाण्याची शक्यता असते. एकूणच काय पावसात तुमच्या पायांना सगळ्यात जास्त त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण पावसाळ्यात पायांची स्वच्छता नेमकी कशी करायची ते पाहुया. करुया सुरुवात
तुमच्या चपलांवरुन कळतो तुमचा स्वभाव, जाणून घ्या तुमचा स्वभाव
रोज स्वच्छ करा नखं
बाहेरुन आल्यानंतर पाय धुण्याची सवय आता आपल्याला कोरोनामुळे लागली आहेच. पण तरीही पावसाळ्यात पाय धुणेच पुरेसे नसते. तर तुमची नखं स्वच्छ करणेही गरजेचे असते. तुमच्याकडे पेडिक्युअरचा किट असेल तर तुम्ही त्यातील नखं साफ करण्याच्या यंत्राने नखं स्वच्छ करु शकता. त्यामुळे तुमच्या नखांना कोर होण्याची भीती कमी होईल. त्यामुळे नखांना कोर होण्याचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही नखं वेळोवेळी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.
हायड्रोडन पेरॉक्साईडचा करा वापर
अनेकांना पावसाळ्यात नखांना कोर होण्याचा त्रास अगदी ठरलेला असतो. त्यांना नखं स्वच्छ ठेवणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला हा त्रास पावसाळ्यात होत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नखांमध्ये अगदी थोडे हायड्रोजन पेरॉक्साईड घाला. म्हणजे तुमच्या नखांमधील घाण आपोआप निघेल. मेडिकलमध्ये अगदी सहज उपलब्ध असते.
मेडिफेशियल’ आहे तुमच्या चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर, नक्की ट्राय करा
पायांना होऊ देऊ नका जखम
आता पाय स्वच्छ करण्यासाठी विशेषत: नख स्वच्छ करण्यासाठी जर तुम्ही अणुकुचीदार गोष्टींचा वापर करत असाल तर तुम्ही तो वापर आताच थांबवा. कारण त्यामुळे तुमच्या पायांना जखम होण्याची शक्यता अधिक असते अशी जखम लवकर बरी होत नाही. तुमच्या पायांना सतत पाणी लागत राहते. त्यामुळे कोणत्याही कारणाने तुमच्या पायांना जखम होऊ देऊ नका. नखांमधील घाण काढताना हा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
गरम पाण्याचा शेक
पावसाळ्यात पायांना गरम पाणी लागले की, मस्त वाटते. पेडिक्युअर करताना तुमच्या पायांना गरम पाण्यात बुडवले जाते. पावसाळ्यात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही छान गरम पाण्यात पाय बुडवा. त्यामुळे तुमच्या पायांना आणि तुमच्या पायाच्या त्वचेला आराम मिळेल.
केस धुण्याआधी करा हा उपाय, केसांचे गळणे होईल कमी
तेलाचा करा मसाज
पावसाळ्यात नखं तुटण्याचा त्रास सर्रास होतो. जर तुम्हाला तुमची नखं तुटू नये असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नखांना रोज रत्री कोणत्याही तेलाने मसाज करायला विसरु नका. पायांना आलेला थंडावा तेलाच्या मसाजामुळे तुमच्या पायांना आराम मिळतोच. शिवाय तुमची पायांची त्वचा आणि नखंही मजबूत होण्यास मदत मिळते.
आता या पावसाळ्यात अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या पायांची विशेषत: नखांची स्वच्छता करायला विसरु नका.