DIY फॅशन

कॉटनची साडी नेसण्याची सोपी पद्धत, देईल एलिगंट लुक

Dipali Naphade  |  Jun 9, 2021
कॉटनची साडी चुण्या न पाडता कशी नेसावी, सोपी पद्धत

कोणताही कार्यक्रम असो वा नसो. काहीही असो साड्या नेसणे हे नेहमीच महिलांना आवडते. विशेषतः बनारसी साडी, कांजिवरम साडी आणि ज्यांना जास्त गरमीचा त्रास होतो अशांसाठी कॉटनच्या साड्या. कॉटनची साडी नेसण्याची मजाच काही वेगळी आहे. कॉटनची साडी (Cotton Saree) नेसल्यानंतर त्याचा लुक अगदीच रॉयल दिसतो. कडक इस्त्री आणि फिकट रंगाच्या कॉटनच्या साड्या या नेहमीच आकर्षक लुक देतात. खरं तर कॉटनची साडी नेसल्यानंतर येणार लुक हा अत्यंत एलिगंट आहे आणि तितकाच कम्फर्टेबलही. पण सर्वांनाच कॉटनची साडी नेसता येते असं नाही. बऱ्याचदा ही साडी नेसताना, पदर अथवा निऱ्या काढताना या साडीच्या इस्त्रीला चुण्या पडतात आणि मग साडीचा लुक खराब होतो. काही महिलांना कोणाच्यातरी मदतीशिवाय कॉटन साडी नेसताच येत नाही. कारण कॉटन साडीचा पदर आणि निऱ्या काढताना खूपच त्रास होतो आणि मग चुण्या येतात. त्यामुळे साडीचा लुक खराब होईल यामुळे कॉटनची साडी आवडत असूनही नेसण्याचा प्रयत्न केला जात नाही. पण तुम्हाला कॉटनची साडी नेसायची आवड असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करून नक्कीच ही साडी नेसू शकता. याचा लुक (saree look) अप्रतिम दिसतो. 

स्टेप 1

सर्वात पहिले याची खात्री करून घ्या की, तुमच्या कॉटन साडीला व्यवस्थित स्टार्च अथवा इस्त्री केली आहे की नाही. यावर कोणतीही चुणी पडलेली नाही ना याची खातरजमा करून घ्या. तुमची साडी जर एका बाजूने कडक आणि दुसऱ्या बाजूने मुलायम असेल तर साडी नेसायला तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे तुम्ही साडी योग्य स्टार्च आणि इस्त्री करण्यात आलेली आहे की नाही हे पाहून घ्या. 

स्टेप 2

कॉटन साडीला जर तुम्ही स्टार्च केले असेल तर अर्थातच ती नेसताना थोडी फुललेली दिसणार. त्यामुळे तुमचा लुक थोडा जाडसर तुम्हाला वाटेल. त्यामुळे तुम्ही परकरच्या जागी डिकोटची निवड करा. यामुळे तुमच्या साडीचे फिटिंग अत्यंत व्यवस्थित येईल आणि तुम्हीही या साडीमध्ये बारीक दिसाल. इतकंच नाही तर डिकोटच्या वर साडी नेसल्याने तुम्हाला उठण्याबसण्याचा आणि चालण्याफिरण्याचा त्रास होणार नाही. बाजारामध्ये तुमच्या आकाराचा आणि साडीच्या रंगाचा डिकोट सहज मिळतो.  

स्टेप 3

आता साडी नेसण्यासाठी एक बेसिक फोल्ड करा. हा फोल्ड करताना आणि साडीत खोचताना या गोष्टीची काळजी घ्या की, डिकोट अथवा परकरच्या आत इतकाच हा फोल्ड खोचा जितका तुम्हाला साडी घट्ट करण्यासाठी लागणार आहे. तुम्ही तुमच्या उंचीनुसार साडी खोचा. अधिक फोल्ड केल्यास, साडीच्या पेटीकोट अथवा डिकोटच्या बाहेर दिसेल. 

स्टेप 4

ही स्टेप तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला यामध्ये साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. साडीच्या निऱ्या काढण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक आधी पदर काढून घ्या. पदर काढून त्याच्या व्यवस्थित प्लेट्स काढून खांद्यावर पिनअप करा. उरलेल्या साडीच्या निऱ्या काढा. कॉटन साडी जर कडक स्टार्च केलेली असेल तर याच्या निऱ्या काढण्यासाठी त्रास होतो. कारण साडी फुलते. त्यामुळे निऱ्या सरळ येत आहेत की नाही याचा अंदाज येत नाही. त्यामुळे निऱ्या काढण्यापूर्वी साडीवर थोडेसे पाणी मारून इस्त्री करून घ्या. यामुळे साडीमध्ये थोडा ओलावा येईल आणि तुम्ही अगदी व्यवस्थित निऱ्या काढू शकाल. 

स्टेप 5

साडीच्या निऱ्या एकदम किनाऱ्यापासून सुरू करू नका. असं केल्यास निऱ्या सरळ येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही साडी थोडी बाजूने सोडून मग निऱ्या काढा. साडीला स्टार्च असेल तर निऱ्यांचा आकार थोडा मोठा ठेवा आणि प्लेट्स कमी काढा. साडीच्या स्टार्चमुळे त्याचा वॉल्युम नियंत्रणात आणू शकतो. 

स्टेप 6

साडीच्या जेव्हा सर्व निऱ्या काढून होती तेव्हा व्यवस्थित पिन लावा आणि डिकोटच्या आत खोचा. निऱ्या एकदा हाताने व्यवस्थित टाईट प्रेस करून घ्या. त्यानंतर पदर पुन्हा एकदा सेट करा. कॉटनची साडी नेसाल तेव्हा पदर हातावर सोडण्यापेक्षा प्लेट्स काढून पिनअप केलेला जास्त चांगला हे नेहमी लक्षात ठेवा. तसंच हा पदर अति मोठा ठेऊ नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन