DIY सौंदर्य

Ice Water Facial चे त्वचेला मिळतात फायदे, घ्या जाणून

Dipali Naphade  |  Apr 20, 2022
ice-water-facial-benefits-for-skin-in-marathi

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी महिला घरगुती उपायांपासून ते फेशियल करण्यापर्यंत सर्व प्रयत्न करतात. उन्हाळ्याच्या दिवसात केमिकलयुक्त क्रिम्समुळे त्वचेची जळजळ होणे अथवा फेशियल केल्याने अनेकांना त्रास होतात. पण चेहऱ्यावर चमक राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्वचेला थंडावा मिळावा यासाठी तुम्ही चेहऱ्यावर बर्फाच्या पाण्याने फेशियल (Ice Water Facial) करू शकता. सध्या आईस वॉटर फेशियल खूपच ट्रेंडमध्ये आहे. आईस फेशियलच्या मदतीने केवळ चेहऱ्याला थंडावाच मिळत नाही तर तुमची त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर होण्यासही मदत मिळते. त्याशिवाय हे फेशियल करण्यसाठी तुम्हाला पार्लरमध्ये जायचीही गरज नाही. हे तुम्ही आरामात घरच्या घरीदेखील करू शकता. कोरियन आणि जपानी महिला (Korean and Japanese Women) या आईस वॉटर फेशियलचा अधिक वापर करतात. आईस वॉटर कसे करावे (How To Do Ice Water Facial) आणि याचे आईस वॉटर करण्याचे काय फायदे (Benefits Of Ice Water Facial) आहेत आपण पाहूया.

आईस वॉटर फेशियल करण्याची पद्धत 

आईस वॉटर फेशियल तुम्ही घरात अगदी सहजपणाने करू शकता. हे फेशियल करण्यासाठी ही आहे सोपी पद्धत 

आईस वॉटरचे फायदे (Benefits Of Ice Water Facial) 

Ice Water Facial

चेहऱ्याची सूज कमी करण्यासाठी – चेहऱ्याची सूज कमी करण्यासाठी आईस वॉटरचा उपयोग होतो. सकाळी उठल्यानंतर काही जणांच्या चेहऱ्यावर अथवा डोळ्यांवर सूज अर्थात पफीनेस दिसून येतो. हा पफीनेस कमी करण्यासाठी तुम्ही आईस वॉटर फेशियलचा वापर करू शकता. 

अॅक्नेपासून मिळते सुटका – उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा महिलांना चेहऱ्यावर पुळ्या येतात. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्यांना अॅक्नेचा त्रास होतोच. चेहऱ्यावरील मुरूमं ही कोणत्याही महिलेच्या सौंदर्यामध्ये त्रासदायकच ठरतात. एकदा चेहऱ्यावर मुरूमं आल्यास, लवकर बरे होत नाहीत. मग अशावेळी तुम्हाला आईस वॉटर फेशियलची मदत घेता येते. 

डोळ्याखालील काळी वर्तुळं – आईस वॉटर हे केवळ चेहऱ्यावरील डागच कमी करत नाहीत, तर डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं कमी करण्यासाठीही याची मदत होते. डार्क सर्कल (Dark Circle) कमी करण्यासाठी बाजारामध्ये अनेक क्रिम्स आहेत. पण त्याहीपेक्षा आईस वॉटरचा अधिक चांगला फायदा होतो. आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा डोळ्याखाली हा आईस वॉटर फेशियलचा प्रयोग केल्यास, काळी वर्तुळं जाण्यास मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी आहे फायदेशीर – उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट चेहऱ्यावर अतिरिक्त तेल आल्याने चेहऱ्यावर मुरूमं आणि अॅक्ने येतात. तेलकट त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये आईस फेशियल लुक समाविष्ट करून घ्या. या फेशियलमुळे चेहऱ्यावरील तेल कमी होण्यास मदत मिळते. 

आईस फेशियल करताना लक्षात ठेवा या गोष्टी 

Ice Water Benefits

आईस वॉटर फेशियलचे नुकसान 

आईस वॉटरचे फायदे आहेत त्याप्रमाणे त्याचे काही नुकसानही आहे. फेशियल करण्यापूर्वी तुम्हाला याबाबतही माहिती असायला हवी. जास्त थंड पाण्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते. तसंच काही वेळ थंड पाण्यामुळे त्वचेवरील पोर्स बंद होतात. ज्यामुळे त्वचेत घाण साचून राहाते. त्यामुळे याचा वापर वर सांगितलेल्या योग्य पद्धतीनेच करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य