घर आणि बगीचा

घरात हे प्लांट्स असतील तर वाढले सकारात्मक उर्जा

Leenal Gawade  |  Nov 19, 2021
सकारात्मक उर्जा टिकवण्यासाठी

घरातील माणसांमध्ये सलोख्याचे आणि चांगले संबंध असतील तर घरात शिरल्या शिरल्या आपल्याला त्या घरातील सकारात्मक उर्जा खेचून घेते. पण काही घरात प्रवेश केल्यानंतर कधी कधी मन विषण्ण आणि खिन्न होते याचे कारण या घरात नकारात्मक उर्जा ही अधिक बलवान असते. हल्ली घरात सकारात्मक उर्जा टिकून ठेवण्यासाठी काही खास झाडं लावण्याचा किंवा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. इनडोअर प्लांन्टस प्रकारातील ही झाडे तुम्ही घरात ठेवली तर त्यामुळे सकारात्मक उर्जा पसरते असे म्हटले जाते. घरासाठी वास्तू टिप्सचा वापर आपण करत असतोच. हेही नक्की करून पाहा.

लवेंडर

लवेंडर

 जांभळ्या रंगाची सुंदर फुलं येणारी हे झाडं लव्हेंडर नावाने ओळखले जाते. हे झाड आनंद आणि शांतता याचे प्रतीक आहे. काही रंग असे असतात जे सुखावणारे असतात. लव्हेंडरच्या झाडाला येणारी छडी ही पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे हे झाडं शक्य असेल तर तुमच्या लिव्हिंग रुम किंवा जोडप्याच्या बेडरुम्समध्ये लावायला काहीच हरकत नाही.जर तुम्हाला प्रत्यक्ष लव्हेंडरचे झाड लागणे शक्य नसेल तर तुम्ही त्याचा एखादा फोटोही लावण्यास काहीही हरकत नाही. पण झाडं लावणं हे नेहमीच चांगले. या झाडाची फार देखभाल करावी लागत नाही. थोडासा सूर्यप्रकाश आणि योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यावर हे झाड छान टिकते.

ॲलोवेरा प्लँट

ॲलोवेरा प्लँट

त्वचा आणि आरोग्याच्या तक्रारींसाठी ॲलोवेरा लावणे किंवा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ॲलोवेरामध्ये जखमा भरण्याची क्षमता असते. त्यामुळेच की काय हे झाड लावण्याचा सल्ला दिला जातो. घरात असणारी दु:ख शोषून घेण्याची क्षमता या झाडामध्ये असते असे म्हणतात. हल्ली अगदी बोनसाय स्वरुपात देखील ही अशी झाडे मिळतात. त्यामुळे तुम्हाला ती कुठेही ठेवता येतात. या झाडाची खूप वाढही होऊ देऊ नका. अगदी छोटे आणि घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात फिट होईल असे झाड लावा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल.

ऑर्किड

ऑर्किड

जांभळ्या, गुलाबी. पांढरी अशा वेगेवेगळ्या रंगामध्ये मिळणारी ऑर्किडची फुलं ही खूप ठिकाणी फ्लोरिस्टकडे तुम्ही पाहिली असतील.या फुलांचे झाड किंवा फुलांची छडी जरी तुम्ही घरी आणून ठेवली तरी देखील चालू शकते. या फुलांमुळे घरात सकारात्मक उर्जा वाहू लागते. एक वेगळा आनंद आणि आल्हाददायक वातावरण असे होऊन जाते. विशेषत: नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांनी त्यांच्या खोलीत अशाप्रकारे ऑर्किडचे झाड आणून लावले की, त्यांच्यामधील प्रेम टिकून राहते असे म्हणतात. त्यामुळे घरातील प्रेम आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ऑर्किडचे झाड लावा.

पीस लिली

पिस लिली

शोभेचे झाड किंवा इनडोअर झाड म्हणून ओळखले जाणारे झाड म्हणजे पीस लिली. या लिलीच्या फुलांचा रंग पांढरा असतो पांढरा रंग हा शांततेच प्रतीक असते. पीस लिलीची पाने ही चकचकीत हिरव्या रंगाची असतात. त्याचा आकार हा सुंदर असतो. पीस लिलीची फुले ही देखील पानांच्या आकाराची असतात. ज्यांना अस्थमा आणि डोकेदुखीचा त्रास असेल अशांसाठी पीस लिली ही शांतता देण्याचे कार्य करते. 

आता घरात प्लांट्स ठेवले असतील तर घरात सकारात्मक उर्जा वाढवण्यास मदत होईल.

अधिक वाचा

घरात लावा स्नेक प्लांट, होतील अनेक फायदे – जाणून घ्या

घरात लावलेली झाडे लवकर वाढावी यासाठी सोप्या टिप्स

Read More From घर आणि बगीचा