DIY फॅशन

जयपूर साड्यांचा वाढता ट्रेंड, आकर्षक आणि अप्रतिम साड्या

Dipali Naphade  |  Jan 13, 2021
जयपूर साड्यांचा वाढता ट्रेंड, आकर्षक आणि अप्रतिम साड्या

साडी म्हणजे प्रत्येक महिलेचा जीव. वेगवेगळ्या रंगाच्या आणि स्टाईल्सच्या साड्या या प्रत्येक महिलेल्या आपल्या वॉर्डरोबमध्ये हव्याशा वाटत असतात. सध्या अनेक साड्यांचे ट्रेंड्स आहेत, त्यापैकी एक खास ट्रेंड म्हणजे जयपुरी साड्या. जयपूर हे तर प्रसिद्ध आहेच. पण त्यातही इथल्या साड्यांच्या व्हरायटीदेखील सध्या जास्त प्रसिद्ध होत आहेत. मुळात या साड्या नेसायला हलक्या आणि आकर्षक रंगसंगती असल्यामुळे तरूणाईमध्ये याची जास्त क्रेझ दिसून येत आहे. या साड्यांच्या  वेगवेगळ्या फॅशनही तुम्हाला करता येतात. त्यामुळे शाळा, कॉलेज असो अथवा घरातील एखादा कार्यक्रम असो या जयपुरी साड्या नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतील. आता यामध्ये नक्की कोणकोणती फॅशन आहे ते आपण जाणून घेऊया.  

बंधेज साडी

Instagram

नावाप्रमाणेच ही साडी असून या साड्या बांधलेल्या अर्थात बांधणी स्वरूपातील असतात. बांधणी साडी ही जयपूरचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला यामध्ये अनेक व्हरायटी पाहायला मिळतात. या साड्या अत्यंत हलक्या आणि श्रिंक स्वरूपाच्या असतात.  शिवाय याचे रंग अधिक गडद असतात जे दिसायला अत्यंत सुंदर दिसतात. या साड्या दोऱ्याने बांधून ठेवता येतात. तसंच या साड्या उघडल्यानंतर केवळ दोन मीटरच दिसतात. पण जेव्हा या साड्यांची इस्त्री करण्यात येते तेव्हा या साड्या इतर साड्यांप्रमाणे दिसतात. कोणत्याही कार्यक्रमाला ही साडी नेसल्यास पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. 

सिल्कची साडी धुवा घरी, जाणून घ्या सोप्या टिप्स

ब्लॉक प्रिंट

राजस्थानातील जयपुरमधील ब्लॉक प्रिंट हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. हे नैसर्गिक रंगांनी कॉटनच्या कपड्यांवर करण्यात येते. या कपड्यांवर ब्लॉक्स करण्यात येतात. पहिले ब्लॉक प्रिंटच्या चादर असायच्या. मग नंतर हे कामकाज कुडत्यांवर दिसू लागते आणि आता याचा ट्रेंड साड्यांमध्येही आला आहे. ब्लॉक प्रिंटच्या साड्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. मुळात या हलक्या असतात आणि किंमतदेखील खिशाला परवडणारी असते. त्यामुळे याची खरेदी आजकाल जास्त प्रमाणात दिसून येते.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

कोटा साडी

Instagram

हँडलूम अर्थात हाती तयार करण्यात आलेल्या मऊसूत कोटा साड्यांचाही सध्या ट्रेंड आहे. या साड्या हातमागावर करण्यात येत असल्यामुळे अधिक आकर्षक दिसतात. या साड्यांमध्ये चंदेरी, गोल्डन जरी, रेशम, सूत अर्थात कॉटन या धाग्यांपासून बनविण्यात येतात. या साड्यांमध्ये एका विशेष प्रकारची चमक असल्याने या साड्या दिसायला अत्यंत सुंदर दिसतात. हे धागे विविध प्रसिद्ध ठिकाणांहून आलेले असतात.  कर्नाटक,  गुजरात तसंच तामिळनाडू इथून हे धागे मागविण्यात येतात. तसंच यावर अनेक प्रकारची कलाकुसर असल्याने या साड्यांचा अधिक खप आहे. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

सुपरनेट साड्या

Instagram

जयपुरमधील अजून एक प्रसिद्ध साडी म्हणजे सुपरनेट साडी. आजकाल ही साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे. बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्री अशा साड्यांमध्ये दिसून येतात. या साड्यांना सुपनेट साड्या असं नाव असून या विशेष धाग्यांपासून तयार करण्यात येतात. हेव्ही बॉर्डर, लाईट बॉर्डल, गोटा पत्ती वर्क आणि एपलिक वर्कमध्ये या साड्या दिसून येतात. या साड्या नेसून यावर हलकासा मेकअप केला की तुम्ही अतिशय आकर्षक दिसता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन