Planning

डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाण्यापूर्वी या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या

Trupti Paradkar  |  Nov 22, 2021
keep these things in mind before going to the destination wedding in Marathi

डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कमीत कमी लोकांमध्ये लग्नसोहळ्याचा आनंद लुटण्याचा हा एक उत्तम प्रकार आहे. कारण अशा लग्नात पाहुण्यांची उपस्थिती कमी असल्यामुळे लग्नसोहळ्याचा आनंद प्रत्येकाला घेता येतो. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत लग्नातील प्रत्येक विधी मस्त एन्जॉंय करता येतात. सहाजिकच लग्नाचा सीझन सुरू होताच एखाद्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण येतेच. अशा लग्नासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवस उपस्थित राहावं लागणार असल्यामुळे व्यवस्थित प्लॅन करून जावं लागतं. यासाठीच जर तुम्ही यंदा डेस्टिनेशन वेडिंगला उपस्थित राहणार असाल तर त्यााधी या गोष्टी जरूर जाणून घ्या.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

तिकीट बुकिंग –

डेस्टिनेशन वेडिंगचे आमंत्रण हे नेहमी वेळेआधीच पाठवलं जातं. कारण अशा लग्नासाठी तुम्हाला जास्त दिवस सु्ट्टी घेण्यासाठी आणि प्रवासाची गरज असते. जर नातेवाईक अथवा मित्रमंडळींपैकी कोणाकडून तुम्हाला अशा लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण असेल तर वेळीच तिकीट बूक करा. कारण लग्नाच्या आणि वेकेशन सीझनमुळे तातडीने ट्रेन अथवा विमानाचे तिकीट मिळू शकत नाहीत. शिवाय तात्काळ अशी तिकीट मिळवणे महागात पडू शकते. यासाठीच ट्रॅव्हल साईट्सच्या मदतीने वेळीच लग्नाच्या स्थळी जाण्याचे तिकीट बूक करा. ज्यामुळे नंतर ऐन वेळी त्रास होणार नाही. 

keep these things in mind before going to the destination wedding

घरात लग्नकार्य आहे, मग मुंबईतील हे ‘वेडिंग प्लॅनर्स’ तुमच्यासाठी आहेत बेस्ट

प्रवासात लागणारे साहित्य –

डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाताना प्रवास आणि एक ते दोन दिवसांसाठी राहणे तुम्हाला करावे लागणार असते. त्यामुळे या कालावधीमध्ये लागणारे सर्व साहित्य तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असायला हवे. लग्नासाठी लागणारे आऊटफिट्स, दागदागिने, मॅचिंग अॅक्सेसरीज यासोबतच चार्जर, पासपोर्ट, तिकीट, व्हिसा, औषधे आणि प्रवासातील इतर महत्त्वाचे साहित्य वेळीच पॅक करून ठेवा. 

80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे खास सणांसाठी

वेडिंग डेस्टिनेशनचे वातावरण –

लग्नाची तारिख नेमक्या कोणत्या महिन्यातील आहे याची आधीच चौकशी करा. कारण बऱ्याचदा लग्न हिवाळ्यात अथवा उन्हाळ्यात असतात. त्यामुळे त्यानुसार लग्नासाठी आऊटफिट निवडणं गरजेचं आहे. शिवाय लग्न कोणत्या ठिकाणी आहे तिथले वातावरण कसे असेल याची चौकशी करून तुमच्याजवळ तिथे लागणारे कपडे अथवा इतर गोष्टी ठरवाव्या लागतात. 

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस (Best Wedding Dresses In Marathi)

थोडक्यात जरी तुम्ही लग्नासाठी जात असला तरी त्यासाठी तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि अनोळखी ठिकाणी दोन ते चार दिवस राहायचे आहे हे ओळखून त्यानुसार तयारी करा. 

Read More From Planning