Care

हेअर पॅक लावताना नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी

Trupti Paradkar  |  Jul 26, 2022
keep these things in mind while applying hair pack in marathi

आजकाल धुळ, माती, प्रदूषण, स्टायलिंग प्रॉडक्ट यामुळे केसांचे खूप नुकसान होत असते. सहाजिकच केसांची योग्य निगा राखली तरच केस मजबूत आणि मुलायम राहतात. यासाठी फक्त शॅम्पू आणि कंडिशनर करणं पुरेसं नाही. केसांची निगा राखण्यासाठी नियमित हेअर पॅक वापरणंही फायद्याचं ठरू शकतं. कारण हेअर पॅकमधील पोषक घटकांमधून केसांना चांगले पोषण मिळतं.  पण यासाठी कोणताही हेअर पॅक थेट केसांसाठी वापरू नका. केसांवर पॅक लावण्यापूर्वी प्रत्येकाला काही बेसिक गोष्टींची माहिती असायला हवी. कारण हेअर पॅक विविध घटकांपासून बनलेले असतात. प्रत्येक घटक तुमच्या केसांवर परिणामकारक ठरेलच असं नाही. हेअर पॅक तुमच्या केसांसाठी योग्य नसेल तर केसांना फायदा होण्याऐवजी केसांचे नुकसानच होऊ शकते. यासाठी केसांवर कोणताही हेअर पॅक लावण्यापूर्वी काही गोष्टी अवश्य तपासून पाहा. तसंच वाचा केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उत्तम आहे अंड्याचा हेअर मास्क (Egg Hair Mask In Marathi), Hair Spa Benefits In Marathi | घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल, केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

हेअर पॅक केसांवर लावण्यापूर्वी हे जाणून घ्या

केसांवर कोणताही हेअर पॅक लावण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्या.

केसांच्या प्रकारानुसार निवडा हेअर पॅक

जाहिरात पाहून अथवा कोणीतरी सांगितलं म्हणून केसांवर एखादा हेअर पॅक लावू नका. आजकाल बाजारात विविध प्रकारच्या केसांसाठी विविध प्रकारचे हेअर पॅक विकत मिळतात. मात्र हेअर पॅक खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या केसांचा प्रकार माहीत असायला हवी. तुमचे केस तेलकट, कोरडे, कुरळे, पातळ, जाड कसे आहेत यावरून केसांना कशाची गरज आहे हे ठरू शकतं. 

हेअर पॅक केसांना कसा लावावा

हेअर पॅक फक्त केसांच्या मुळांना लावून केसांना पोषण मिळेल असं अनेकांना वाटत असतं. पण असं मुळीच नाही हेअर पॅक नेहमी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावे. कारण स्काल्पप्रमाणेच तुमच्या संपूर्ण केसांना पोषण आणि स्वच्छतेची गरज असते. त्यामुळे केसांवर व्यवस्थित हेअर पॅक अप्लाय करा.

हेअर पॅक किती वेळा लावावा

हेअर पॅक किती वेळा केसांवर लावला तर केसांचे पोषण होते हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. यासाठी नेहमी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केसांना हेअर पॅक लावावा. हेअर पॅकमध्ये केस मऊ करणारे आणि केसांचे आरोग्य सुधारणारे गुणधर्म असतात. जसं अन्नातून केसांना पोषण मिळतं तसंच हेअर पॅकमधूनही केसांचे पोषण होत असतं. यासाठी आठवड्यातून दोनदा तरी केसांची अशी निगा राखायला हवी.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care