Diet

जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे (Kharik Benefits In Marathi)

Leenal Gawade  |  Mar 10, 2021
Kharik Benefits In Marathi

 

‘खारीक’ हा ड्रायफ्रुटचा असा प्रकार आहे जो प्रत्येकाच्या घरी असतोच. खजूर-खारीक हे चवीला गोड असल्यामुळे ते अनेकांना आवडते. चॉकलेटी रंगाचे ओले खजूर वाळल्यानंतर त्याचे रुपांतर खारीकमध्ये होते. खारीक हे दिसायला थोडेसे तपकिरी रंगाचे असते. खजूर हे ओलसर आणि मऊ असतात तर खारीक हे टणक असतात. ते खाण्यासाठी दातांची मदत घ्यावी लागते. हे खारीक थोडे कडक असले तरी देखील ते चवीला फारच छान लागते. खारीक हे नुसते चवीलाच चांगले नाही तर ते आरोग्यासाठीही लाभदायक आहे. जर तुम्ही खारीक खाण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला गोडावर नियंत्रण आणायचे असेल तर तुम्ही खजूर- खारीकचे सेवन करायला हवे. महिलांसाठी मासिक पाळी आणि सुलभ प्रसुतीसाठी ती चांगली असते. शिवाय पुरुषांच्या आरोग्यासाठीही खजूर फायद्याची असते. वीर्यनिर्मितीसाठी खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. खारीकचे आरोग्याशी निगडीत फायदे पाहता त्याचा आहारात नेमका कशा पद्धतीने समावेश करावा आणि खारीक खाण्याचे फायदे काय ते जाणून घेऊया.

खारीकमधील पोषकत्वे (Nutritional Value Of Kharik)

Instagram

खारीकमधील पोषकत्वांचा विचार केला तर खारीकमध्ये अनेक अशा घटकांचा समावेश असतो.

खारीकमधील पोषकत्व पुढीलप्रमाणे:

खारीकमधील पोषकत्वे जाणून घेतल्यानंतर त्याचे फायदे जाणून घेऊयात.

खारीक खाण्याचे फायदे (Kharik Benefits In Marathi)

 

खारीकमधील पोषकत्वे जाणून घेतल्यानंतर त्याचा शरीराला नेमका कोणत्या पद्धतीने फायदा होतो ते जाणून घेणे फारच गरजेचे आहे. खारकाचे सेवन केल्यानंतर तुमच्या शरीराला नेमका काय फायदा होतो त्यासाठी जाणून घेऊया खारीक खाण्याचे फायदे.

लवंगेचा वापर (Uses Of Clove)

इन्स्टंट एनर्जी (Gives Instant Energy)

 

खारीक हे उर्जेचा भंडार आहे. कधीकधी शरीरातील उर्जा कमी झाले असे वाटत असेल अशावेळी एक खारीक जरी तोंडात टाकली तरी बरे वाटते. पटकन एनर्जी मिळण्यासाठी खारीक हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्ही डब्यात चार ते पाच तरी खारीक ठेवा. ज्यावेळी तुम्हाला थोडे लो वाटेल. त्यावेळी तुम्ही तोंडात खारीक टाका. ही खारीक चघळल्यावर थोडासा आराम मिळेल.

काळ्या द्राक्षांमधील पोषक तत्त्वे

हाडाचे आरोग्य (Bone Health)

 

हाडांच्या बळकटीसाठी खारीकाचे सेवन ही फायद्याचे असते. खारीकमध्ये फॉस्फरस,कॅल्शिअम,मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे घटक असतात. ज्यांना हाडांसंदर्भात काही व्याधी असतील तर त्यांनी खजूराचे सेवन करावे त्यामुळे हाडाला बळकटी मिळते. अनेक संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की, हाडांच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरते. हाडांसंदर्भातील आर्थायटीस या आजारासाठी फायदेशीर ठरते.

अॅनेमिया होतो कमी (Good For Anemia)

 

शरीरात रक्ताची कमतरता झाल्यामुळे अॅनेमिया होण्याची शक्यता असते. शरीरात रक्ताची कमतरता झाली की, ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. यासोबतच अन्य काही आजारही डोकं वर काढू लागतात. डोकेदुखी,थकवा, सतत झोप येणे, कंटाळा येणे असे काही त्रास जाणवू लागतात. महिलांमध्ये अॅनेमियाचा त्रास हा काही वयानंतर दिसू लागतो. अपुऱ्या आहारामुळे हा त्रास होऊ लागतो. खारीकच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत मिळते. नैसर्गिक पद्धतीने रक्त वाढण्यासाठी खारीक ही फायदेशीर ठरते.

त्वचेसाठी लाभदायक (Good For Skin)

Instagram

 

खजूरमध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन C,A (Rational) असते. जे त्वचेची इलास्टिसिटी चांगली ठेवण्यास मदत करते. अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये रॅटिनॉल नावाचा घटक असतो. जो त्वचेसाठी फारच फायदेशीर असतो. खारीकच्या सेवनामुळे पिंपल्सचा त्रास होत नाही. त्वचेला नैसर्गिक मॉश्चरायझर मिळते. हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी खारीक हे वरदान आहे. खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला इतर समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात. याशिवाय यामधील अँटी एजिंग घटक त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत करते.

केसांच्या समस्या करते दूर (Reduce Hair Problem)

 

त्वचेसोबत केसांसाठीही खजूर हे फारच चांगले असते हे कळलेच असेलच पण केसांच्या आरोग्यासाठीही खारीक खूप चांगले असते. खजूरमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असते जे केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. कोंडा, केसगळती कमी करण्यासाठी खारीक हे उत्तम आहे. हेल्दी स्काल्प आणि केसगळती कमी करण्यास खारीक मदत करत असल्यामुळे केस हे अधिक सुंदर आणि हेल्दी दिसू लागतात. केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खारीक ही नित्य आहारात असायला हवी

वीर्य वाढवण्यास करते मदत (Increase In Sperm Count)

 

पुरुषांच्या आरोग्यासाठीही खारीक चांगले असते. ज्या पुरुषांमध्ये वीर्याची कमतरता असते त्यांच्या आरोग्यासाठी खारीक हे खूप चांगले आहे. ज्या पुरुषांमध्ये वीर्याची कमतरता असेल किंवा सेक्ससंदर्भात काही समस्या असतील अशांनी दूधामध्ये खारीक पावडर घालून ते दूध प्यावे त्यामुळे वीर्य वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्यांना या संदर्भात काही तक्रार असेल तर तुम्ही खारीकचे सेवन करा.

फायबरचा साठा (High In Fiber)

 

खजूरमध्ये फायबरचा पुरेपूर साठा आहे. खारीकच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेले फायबर मिळते. पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोट स्वच्छ असणे गरजेचे असते. पोटात फायबरयुक्त पदार्थ असतील तर पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल अशांनी खारीक नक्कीच खावे. त्यामुळे पोट भरते. शिवाय नको ते खाण्याची इच्छाही कमी होते. पोट स्वच्छ झाल्यामुळे त्याचा फायदा शरीरालाही होतो.

नैसर्गिक गोडवा (Natural Sweetener)

Instagram

 

साखरेचा त्रास असणाऱ्यांसाठी खारीक हे फारच फायद्याचे आहे. खारीक हे गोड असते. जर तुम्हाला साखरेचा मोह आवरत नसेल तर तुम्ही एक दोन खारका तोंडात टाकायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तुमची खूप गोड खाण्याची इच्छा आटोक्यात येईल. खजूर वाळवल्यानंतर त्याचे खारीक बनते. खजूरच्या तुलनेत खारीक हेे कमी गोड असते. पण तरीही त्याचा गोडवा हे तुमच्या टेस्टबडचे समाधान करु शकते. त्यामुळे डाएबिटीझ म्हणजेच साखरेचा त्रास असणाऱ्यांनी नैसर्गिक गोड म्हणून खारीक खाण्यास काहीच हरकत नाही. जेवल्यानंतर दोन खारीक खाण्यास काहीच हरकत नाही. याशिवाय खजूरचे फायदे ही आहेत. खारीक नसल्यास खजूरही खाऊ शकत

 

 

खारीकपासून बनवा या रेसिपीज (5 Best Recipes Of Kharik)

खारीकचा उपयोग करुन तुम्ही छान चविष्ट रेसिपी बनवू शकता. आरोग्यदायी आणि पौष्टिक अशा या रेसिपी तुम्ही ट्राय करु शकता.

खारीक लाडू (Kharik Ladoo)

खारीकचा लाडू हा फारच पौष्टिक असतो. हा लाडू चवीला आणि आरोग्यासाठी फारच चांगला असतो. हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो

साहित्य:
दोन वाट्या खारीक पूड, एक वाटी भाजलेले सुके खोबरे,डिंक,गव्हाचे पीठ तूप, काजू-बदाम पूड,वेलची पूड

कृती:
खारीक पूड, सुके खोबरे, गव्हाचे पीठ तूपात छान भाजून घ्या. त्यामध्ये गरम तूप घालून छान एकत्र करुन घ्या. काजू-बदाम पूड घालून वेलची पूड घालून सगळे साहित्य एकत्र करुन घ्या. त्याचे लाडू वळा. रोज एक लाडू आहारात असू द्या.

खारीक हलवा (Kharik Halwa)

Instagram

खारीकच्या मदतीने हलवाही करता येतो जो फारच चविष्ट लागतो.

साहित्य:
एक वाटी खारीक, अर्धी वाटी काजू-बदाम पूड, साजूक तूप, दूध, वेलची पूड

कृती:

खारीक मिल्कशेक (Kharik Milkshake)

अनेक ठिकाणी खारीकचा रसही तयार केला जातो.दूधात घालून खारीक खाल्ली जाते जी फारच फायद्याची सते.

साहित्य:
खारीक, दूध

कृती:
दूधात खारीक भिजवून ते वाटून घ्या. चवीप्रमाणे त्यामध्ये दूध वाढवून घ्या. थंडगार असे हे खारीक मिल्कशेक तयार

खारीक बर्फी (Kharik Barfi)

Instagram

खारीक हे नॅचरल स्विटनर आहे. याच्या मदतीने तुम्हाला गोड पदार्थ तयार करता येऊ शकतो.

साहित्य:

खारीक, दूध, तूप

कृती:

स्मोकी पनीर आणि खारीक पूड (Smokey Paneer With Dried Dates powder)

जर तुम्हाला काहीतरी हटके खायचे असेल तर तुम्ही पनीर आणि खारीक पूडची ही रेसिपी ट्राय करु शकता.

साहित्य:
पनीर, आलं-लसूण पेस्ट, सैंधव, चाट मसाला, खारीक पूड

कृती:

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. खारीकचा उपयोग जेवणात केला जातो का?

खारीक अनेक गोड रेसिपीमध्ये वापरले जाते. पण भारतात खारीकचा उपयोग काही ठराविक पदार्थांमध्येच केला जातो. उदा. लाडू, हलवा, रस किंवा चॉकलेट असे काही बनवतानाच खारीक पावडर वापरली जाते. खारीक ही कडक असल्यामुळे तिच्या थेट सेवनाशिवाय त्याचा उपयोग केला जात नाही.

2. खारीक पावडर घरी करता येते का?

हो, ज्यांच्याकडे जास्त क्षमतेचा मिक्सर आहे अशांना खारीक पावडर घरी करता येऊ शकते. खारीक ही कडक असल्यामुळे ती कोणत्याही मिक्सरमध्ये वाटून चालत नाही. त्यासाठी मिक्सर चांगला असावा लागतो. त्यामुळे घरी खारीक पावडर करताना थोडा विचार करा. सध्या बाजारात खारीक पावडर मिळते. तयार खारीक पावडर वापरणे हे अधिक फायद्याचे ठरते.

3. खारीक पावडर कशी खाल्ली जाते?

खारीक पावडर ही काही खास रेसिपीमध्ये वापरली जाते. विशेषत: लाडूमध्ये खारीक पावडर वापरली जाते. या शिवाय काही खास रेसिपीजमध्ये खारीक पावडर वापरली जाते.

Read More From Diet