मासे खायला आवडत असतील तर आजचा हा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. या आधी आपण चिकनपासून रेसिपी आणि कोळंबीपासून रेसिपी पाहिल्या आहेत. यासोबतच मासे किंवा सीफूड म्हटले की त्यामध्ये खेकडा हा आलाच. कोकण आणि अनेक ठिकाणी खेकडा हा आवर्जून खाल्ला जातो. खेकड्याचे सूप, कालवण, सुके हे फारच प्रसिद्ध आहे. ताटात खेकडा वाढलेला असला आणि अन्य कोणताही मासा असला तरी खेकड्यापुढे हे सगळे फिके पडतात. खेकडे हे समुद्र आणि नदी दोन्हीमध्ये मिळतात. खेकड्याची शेती ही अनेक ठिकाणी केली जाते. भारतातील खेकडे हे अनेक देशांमध्ये निर्यातदेखील केले जातात.समुद्रातील खेकडा लाल रंगाचा असतो. तर खाडी किंवा शेतामध्ये मिळणारा खेकडा काळ्या रंगाचा असतो. खेकड्यांना कुर्ल्या, चिंबोऱ्या या नावांनी देखील ओळखले जाते. खेकड्यांमध्ये प्रोटीन, पोटॅशिअम, सोडीअम,व्हिटॅमिनC, कॅल्शिअम, व्हिटॅमिन B6 असे आवश्यक घटक असतात. त्याचा फायदा शरीराला होतो. खेकडा खाण्याचे फायदे (Khekada Khanyache Fayde) आणि खेकड्याची रेसिपी (Khekada Recipe In Marathi) या देखील ट्राय करु शकता.
Table of Contents
खेकडा खाण्याचे फायदे (Khekada Khanyache Fayde)
खेकडा का खावा असा विचार करत असाल तर तुम्हाला खेकडा खाण्याचे फायदे देखील माहीत असायला हवेत. जाणून घेऊया खेकडा खाण्याचे नेमके काय फायदे असतात ते.
शरीराला पुरवते उर्जा
खेकडा हा एनर्जीचा भंडार आहे. खेकड्याचे सेवन केल्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत मिळते. खेकड्याचे मांस खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते. अनेकदा आजारी असल्यावर किंवा तोंडाची चव गेली असेल तर खेकडा खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते. खाण्याची इच्छा जागृत होते. शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळाल्यामुळे शरीराला बळकटी मिळण्याचे काम करते. शरीराला उर्जा हवी असेल तर तुम्ही नक्कीच खेकड्याचे हमखास सेवन करायला हवे.
शरीराला पुरवते व्हिटॅमिन्स
खेकड्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला आवश्यक असतात. सीफूडमध्ये असलेले फिश ऑईल आणि ओमेगा हे त्वचा आणि केसांसाठी फारच फायदेशीर ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला उत्तम त्वचा आणि केसांसाठी तुम्ही अगदी हमखास खेकडा खायला हवा. खेकड्यामध्ये असलेले अन्य घटक तुम्हाला पुरवून शरीराला फायदा मिळवण्यास मदत करतात.
प्रोटीनचा साठा
शरीरात फॅट वाढू द्यायचे नसतील तर शरीराला प्रोटीन मिळणे गरजेचे असते. खेकडा हा सी फूडचा असा प्रकार आहे. ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेले शरीरात फॅट वाढू द्यायचे नसतील तर शरीराला प्रोटीन मिळणे गरजेचे असते. खेकडा हा सी फूडचा असा प्रकार आहे. ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेले प्रोटीन मिळतात. खूप वेळा खेकड्याचे मांस किंवा सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीराला फॅट मिळत नाही तर प्रोटीनच प्रोटीन मिळते.कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही हमखास खेकड्याचे सेवन करायला हवे.
प्रतिकारशक्ती वाढवते
निरोगी आरोग्यासाठी खेकडा हे उत्तम सीफूड आहे. सर्दी किंवा पडसे झाले असेल तर शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी तुम्ही खेकड्याचे सेवन करायला हवे. त्यामुळे नक्कीच छातीत कफ आणि सर्दी झाली असेल तर त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. उत्तम आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही खेकडा खायला हवा.
सर्दीसाठी उत्तम
खेकड्यामध्ये उष्णता वाढवण्याचे घटक असतात. त्यामुळे शरीरात उष्णता वाढते. जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा कफ झाला असेल. अशावेळी तुम्ही खेकड्याचे कालवण किंवा खेकड्याचे सूप प्यायला हवे. खेकड्याचे कालवण प्यायल्यामुळे सुकलेली सर्दी मोकळी होण्यास मदत मिळते. त्यामुळे अगदी हमखास सर्दी घालवण्यासाठी तुम्ही खेकड्याचे सूप प्यायला हवे
त्वचा आणि केसांसाठी चांगले
खेकड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स हे त्वचा आणि केसांसाठी चांगले असतात. केसांना चमक आणि केसगळती थांबवण्यासाठी खेकडा हा फारच फायद्याचा असतो. सीफूडमध्ये असलेले फिश ऑईल हे त्वचेला तजेला आणि चमक देण्याचे कार्य करतात. शेल असलेले मासे हे केस आणि त्वचेसाठी चांगले असतात. जर तुुम्हाला उत्तम केस आणि त्वचा हवे असतील तर तुम्ही खेकड्याचे सेवन करा.
हाडांच्या मजबूतीसाठी
हाडांच्या मजबूतीसाठी खेकडा हा फारच फायद्याचा असतो. खेकड्यामध्ये कॅल्शिअम आणि असे अनेक घटक असतात. ज्यामुळे हाडांना मजबूती मिळण्यास मदत मिळते. ज्यांना सांंधेदुखी किंवा हाडांच्या ठिसूळपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही आहारात आठवड्यातून एकदा तरी किंवा महिन्यातून दोनवेळा तरी खेकड्याचे सेवन करायला हवे. खेकड्याचे मांस काढून किंवा त्याचे सूप बनवून तुम्ही आहारात त्याचा समावेश करा.
उत्तम हृदयासाठी
खेकड्यामध्ये ओमेगा 3 असते.रक्तातील घातक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहिल्यामुळे स्ट्रोक आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो. आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही खेकड्याचे सेवन करायला हवे.
खेकड्याच्या रेसिपी (Khekada Recipe In Marathi)
खेकड्याच्या रेसिपी (Khekada Recipe In Marathi) तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात. ज्या तुमच्या तोंडाची चव नक्कीच वाढवतील.
खेकड्याचे कालवण
भातासोबत मस्त झणझणीत असा रस्सा खायचा असेल तर तुम्ही मस्त खेकड्याचे कालवण करु शकता. खेकड्याचे कालवण हे फारच चविष्ट लागते. जे ओरपून प्यायला फारच मजा येते. त्यामुळे खेकड्याचे कालवण नक्कीच करायला हवे.
साहित्य:
खेकडे, कांदा-खोबऱ्याचे वाटप, कोळी मसाला, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, कडीपत्ता, हळद इ.
कृती:
- खेकडे चांगले स्वचछ करुन घ्या. खेकडे स्वच्छ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्यानुसार खेकडयांचे छोटे पाय आणि डांग्या काढून घ्या. खेकड्याचा वरचा भाग काढून त्याच्या आतील काळ्या रंगाचा भाग काढून घ्या.
- खेकडा चांगला धुणे गरजेचे असते. कारण त्यामध्ये रेती असते जी स्वच्छ केली नाही तर खेकडा खाताना चरचर लागते.
- आता वाटपासाठी कांदा आणि खोबरे चांगले भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा-खोबरे घेऊन त्यामध्ये लाल तिखट घालून त्याचे बारीक वाटप करुन घ्या.
- खेकडा करण्यासाठी तुम्ही तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता घालून छान तडतडू द्या. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट आणि खेकडा घालून चांगला परतून घ्या.
- हळद घालून चांगले परतून घ्या. खेकड्याचा रंग बदलला की, त्यामध्ये तयार वाटप घाला. वाटपामध्ये एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये कोळी मसाला किंवा गरम मसाला घालून त्यामध्ये कालवणासाठी लागणारे पाणी घालून खेकडा चांगला शिजवून ध्या.
- कालवणाला चांगला कढ आला की, तयार कालवण मस्त भात, भाकरी किंवा चपातीसोबत खा.( खेकड्याचे कालवण तिखट व्हायला हवे)
खेकडा फ्राय
खेकडा फ्राय ही रेसिपी (Khekada Recipe In Marathi)हे देखील ट्राय करु शकता. हा प्रकार कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
साहित्य:
स्वच्छ केलेल खेकडे (खेकड्याचा वरचा भाग टाकू नका), आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कोकम किंवा चिंचेचा कोळ, आवश्यकतेनुसार रवा आणि भाजणीचे पीठ, तेल, पाणी, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोळी मसाला
कृती :
- एका भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये हळद,मीठ घाला. त्यामध्ये स्वच्छ केले खेकडे घालून चांगले शिजवून घ्या.
- मिक्सरच्या भांड्यात आलं-लसूण-मिरची, कोथिंबीर आणि कोकम घालून त्याची एक चांगली चटणी करुन घ्या.
- आता चटणीमध्ये भाजणीचे पीठ घेऊन त्याची एक चांगली पेस्ट करुन घ्या.शिजलेले खेकडे घेऊन त्याला चटणी लावून घ्या. चटणी लावलेल्या खेकड्यांचे तुकडे घेऊन ते छान रव्यामध्ये घोळवा
- गरम तेलात मंद आचेवर छान सोनेरी होईपर्यंत तळा. तुमचा मस्त चटपटीत खेकडा फ्राय तया
खेकडा तंदुरी
चिकन तंदुरी हा प्रकार तुम्ही नेहमीच ऐकला असेल. खेकडा तंदुरी हा प्रकार देखील खायला मस्त लागतो. स्मोकी अशा प्रकारातील खेकडा तंदुरी मस्त घरी करुन तुम्ही एन्जॉय करु शकता.
साहित्य:
खेकडा, मॅरिनेशनसाठी दही,चवीनुसार लाल तिखट,धणे पूड, हळद, जीरा पूड, चांगला तंदुरी मसाला, लिंबाचा रस, मीठ
कृती :
- खेकडा चांगला स्वच्छ करुन घ्या. त्याचे तुमच्या आवडीनुसार तुकडे करुन घ्या. खेकडा चांगला स्वच्छ झाला की, एक भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये दही, मीठ, लाल तिखट,धणे पूड, हळद, जीरा पूड, चांगला तंदुरी मसाला, लिंबाचा रस, मीठ घालून सगळे साहित्य एकजीव करुन घ्या.
- तंदुरीसाठी आच तयार करुन त्यावर खेकडा चांगला भाजून घ्या.खेकड्याचा रंग छान बदलला आणि त्याला स्मोकी असा फ्लेवर आला की, खेकडा तंदुरी गरम गरम खायला घ्या.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. खेकड्याचे प्रकार कोणते?
खेकडा हा नदी आणि समुद्रात दोन्हीकडे मिळतो. शेतातील खेकडे हे चवीला आणि दिसायला तुलनेने थोडे वेगळे असतात. खूप जण समुद्रातील खेकडे खातात. तर काही जणांना शेतात मिळालेले खेकडे खायला फारच आवडते. खेकडे बनवण्याची पद्धत ही त्यानंतर प्रत्येकाची वेगळी असते.
2. खेकडा कोणी खाऊ नये?
खूप जणांना सीफूडची एलर्जी असते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना हमखास काही त्रास होतात. शिवाय ज्यांना हिट सहन होत नाही अशांनी देखील खेकड्याचे सेवन करु नये. खेकडा हा गरम असतो. त्यामुळे ज्यांच्या पोटाचे आरोग्य चांगले नसेल अशांनी खेकड्याचे सेवन मुळीच करु नये.
3. खेकडा खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत का?
हो, काही जणांना खेकडा खायला अजिबात आवडत नाही. खेकडा खाल्ल्यामुळे काहींचे पोट बिघडते. शिवाय जुलाबदेखील होतात. ज्यांचे पोटाचे आरोग्य कमजोर असेल तर त्यांनी खेकड्याचे सेवन करु नये.
अधिक वाचा
मासे खायला आवडतात? मग या गोष्टी ठेवा लक्षात
घरी बनवा असा बिर्याणी मसाला, बिर्याणी होईल परफेक्ट
झणझणीत ठेचा रेसिपी, खास आहेत महाराष्ट्रीयन पद्धती (Thecha Recipe In Marathi)