भारतात अनेक वेगवेगळी फळं आहेत. काही आपण नेहमीच्या वापरात बघतो तर काही फळं आपल्याला माहीत नसतात. असंच एक फळ आहे कोकम. उन्हाळा आला की, कोकम पन्हं, कोकम सरबत आपण आवर्जून पित असतो. पण या फळाचा उपयोग आपण औषध आणि मसाला म्हणूनही करू शकतो माहीत आहे का? या फळामुळे केवळ आरोग्याला फायदाच मिळतो असं नाही तर अनेक आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठीही कोकमाचा उपयोग होतो. कोकमाचं वैज्ञानिक नाव आहे गार्सिनिया इंडिका (garcinia indica). कोकम सरबत फायदे अनेक आहेत. उन्हाळा आला की आपण हमखास कोकम सरबत पित असतो. कोकम सरबत पिण्याचे फायदे (kokam beneftis in marathi) नक्की काय आहेत हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. कोकम आपल्यासाठी किती फायदेशीर ठरते ते पाहूया.
Table of Contents
कोकम सरबत पिण्याचे फायदे (Kokam Sharbat Benefits In Marathi)
कोकम आपण भाजी अथवा आमटीमध्ये नियमित वापरतो. पण कोकम सरबताचा उपयोग आपण उन्हाळ्यात जास्त करतो. कोकम सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. नक्की याचे काय काय फायदे करून घेता येतात आपण पाहूया.
डायरियासाठी उपयोगी
डायरिया ही अशी स्थिती आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिवसातून 3-4 वेळा पातळ संडासला होते. अशा अवस्थेत तुम्हाला कोकमाचे फळ अथवा कोकम सरबताची मदत घेता येते. वास्तविक कोकमात अँटीडायरिया गुण आढळतात. याच्या सेवनाने डायरियावर उपचार करणे सोपे होते. डायरिया होत असेल तर अशा स्थितीत रूग्णाला कोकम सरबत देण्यात येते. यामुळे शरीरातील कमकुवतपणा कमी होतो. एनर्जी येते आणि योग्य पोषक तत्व मिळून अंगात जोर राहतो. तसंच अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा कोकम सरबतामुळे पोटाला शांतता मिळून डायरियापासून मुक्तता मिळते.
अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट म्हणून उपयोगी
अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट स्वरूपात कोकमाचा तुम्ही तुमच्या आयुष्यात उपयोग करून घेऊ शकता. कोकमामध्ये हे दोन्ही गुण आढळतात. एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की, कोकमामधील अँटिफंगल गुणांच्या मदतीने अल्सरचा प्रभावदेखील कमी केला जाऊ शकतो. पोटात जर सतत आग होत असेल अथवा जळजळ होत असेल तर तुम्ही कोकम सरबत पिऊन ही जळजळ कमी करू शकता. उन्हाळ्यात याचा सर्वात जास्त त्रास होताना दिसतो. त्यामुळेच कोकम सरबत हमखास प्यायले जाते.
अँटीऑक्सिडंट असल्यामुळेच याचा वापर करता येतो. वास्तविक कोकमामध्ये अँथोसायनिन्स नावाचे फायटोन्यूट्रिएंट्स सापडतात. ज्यामध्ये सक्रिय अँटिऑक्सिडंट गुण असतात. यामधील अँटीऑक्सिडंट गुण त्वचेला फ्री रॅडिकल्स डॅमेजपासून वाचविण्यास मदत करतात. त्यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सकाळी कोकम खाणे चांगले असते. तसंच तुम्ही उन्हातून जेव्हा बाहेरून घरात येता तेव्हा कोकम सरबत तुम्हाला पोटाला आणि डोक्यालाही शांतता मिळवून देण्यास फायदेशीर ठरते.
ट्यूमरपासून वाचण्यासाठी
ट्यूमरपासून वाचण्यासाठीही कोकमाचा उपयोग करता येतो. कोकम फळाच्या सेवनाने शरीरात ट्यूमर होण्याची जोखीम कमी होते. यामध्ये अँटी ट्यूमर गुण आढळतात. तसंच त्वचेवर होणारा ट्यूमर ठीक करण्यासाठीही कोकमाची आणि कोकम सरबताची मदत होते असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. अर्थात हा पूर्ण उपचार नाही. पण याचे सेवन तुम्हाला फायदेशीर ठरते. डॉक्टरांना विचारूनच याचे किती आणि कसे सेवन करायचे हे योग्य ठरते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात कोकम सरबत प्या. अतिसेवन करू नका.
निरोगी हृदयासाठी
निरोगी हृदयासाठी
कोकमाचे सेवन हे हृदयरोगांपासून दूर ठेवण्यासाठीही चांगले आणि फायदेशीर ठरते. एका वैज्ञानिक रिसर्चनुसार, कोकमाच्या फळामध्ये बी कॉम्प्लेक्स, विटामिन्स, पोटॅशियम, मँगनीज आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व असतात. हे सर्व गुण हृदयाची गती आणि रक्तदाबाची मात्रा नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारही योग्य असणे गरजेचे आहे. तसंच हे स्ट्रोक आणि हृदय रोगाची जोखीम कमी करण्यासाठीही परिणामकारक वाटते. याशिवाय यामध्ये कार्डियोप्रोटेक्टिव्ह गुण जे हृदयसाठी सुरक्षात्मक असतात ते आढळतात. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा उपयोग करून घ्या. कोकम सरबत तुम्ही नियमित पिऊ शकता. मात्र तुमच्या शरीराला याचे सेवन किती योग्य आहे हेदेखील पाहणे गरजेजे आहे.
गॅस दूर करण्यासाठी उपयुक्त
गॅस दूर करण्यासाठी उपयुक्त
बऱ्याच जणांना पोटात गॅस होण्याचा त्रास असतो. गॅसच्या त्रासावर अनेक घरगुती उपाय आपण करतो. पण यावर कोकम सरबत हा उत्तम उपाय आहे. कोकम सरबत पिण्याचे फायदे असून गॅस निघून जाण्यास याची मदत होते. कोकम हे सेवन पाचन संबंधित समस्या उदाहरणार्थ पोट फुगणे, बद्धकोष्ठ, अपचन अशा समस्या सोडविण्यास मदत करते. याशिवाय कोकम सरबतामध्ये शरीराला थंडावा देण्याचा गुणही असतात. त्यामुळेच उन्हाळ्यात कोकम सरबत अधिक प्रमाणात सेवन केले जाते. हे अॅसिडिटी कमी करण्याचे काम करते आणि त्याशिवाय शरीर अधिक हायड्रेट राखण्यासही मदत करते. वास्तविक कोकम सरबत या सर्व समस्यांवर उपयोगी ठरते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारही कोकम सरबताचा गॅसची समस्या सोडविण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता.
निरोगी लिव्हरसाठी
लिव्हरच्या आरोग्यासाठीही कोकमाचा फायदा करून घेता येतो. एका वैज्ञानिक रिसर्चनुसार, कोकमामध्ये भिन्न भिन्न बायोअॅक्टिव्ह यौगिक अर्थात गार्सिनोल असतात. जे अँटिऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणाप्रमाणे काम करतात. हे गुण लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि कॅन्सरपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा स्थितीत डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून मेडिकल उपचार करून घेऊ शकतात. तर एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या एका वैद्यकिय तपासानुसार, कोकमाच्या फळांच्या प्रयोगाने लिव्हरसंबंधित आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी मदत मिळते.
बद्धकोष्ठतेपासून सुटका
कोकम सरबत प्यायल्याने तुम्हाला प्रेग्नंसीमध्येही बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. कारण यामध्ये अँटीपाईल्स गुण आढळतात. या विकारापासून वाचण्यासाठी तुम्ही कोकम फळ, त्याची साले आणि कोकमाच्या पानांचाही उपयोग त्याचा रस काढून करून घेऊ शकता. मात्र संपूर्णतः यावर अवलंबून राहू नका. तुम्हाला यासाठी डॉक्टरांकडून उपचार करून घेणेही गरजेचे आहे. पण तुम्ही नियमित कोकम सरबत प्यायल्याने तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. यावर अधिक संशोधन होणेही गरजेचे आहे.
त्वचा जळल्यास
त्वचा जळल्यास
त्वचा जळल्यासदेखील तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. जळण्याच्या अवस्थेत कोकमाचे सरबत अथवा कोकम फळाचा उपयोग औषधाप्रमाणे करण्यात येतो. यासाठी तुम्ही कोकम सरबताचा उपयोग करून सूर्य आणि अन्य कारणाने होणाऱ्या त्वचेच्या जळण्यावर आणि स्किन डॅमेजवर रोख लावू शकता. कॉस्मेटिक अर्थात अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही कोकमाचा वापर करण्यात येतो. कोकम बटरचा उपयोग फूट क्रिम बनविण्यासाठीही करण्यात येतो. कोकम सरबत हे विशेष गुणांनी युक्त असल्याने त्वचेसाठी उपयुक्त ठरते. विशेषतः सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी तुम्ही कोकम सरबाताचा उपयोग करू शकता.
नोट – कोकमाचे इतकेच फायदे नाहीत तर कोकम सरबतामध्ये असणारे हायड्रॉक्सी अॅसिडचा उपयोग हा वजन कमी करण्यासाठी बर्निंग एजेंटप्रमाणे करता येतो. इतकंच नाही तर कोलेस्ट्रॉल आणि चिंतेची समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग करता येतो.
कोकमाचा कसा करावा वापर (How To Use Kokam In Marathi)
कोकमाचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया. काही जणांना याचा नक्की वापर कसा करतात हे माहीत नाही. त्यामुळे असा वापर करावा.
- कोकमाचे फळ धुतल्यावर त्याचे साल काढा आणि तुम्ही नुसतेही हे फळ खाऊ शकता
- कोकमाचे ज्युस अर्थात रस काढून सरबत करून पिऊ शकता
- कोकमाची स्मूदी करून पिता येते
- फ्रूट सलाडच्या स्वरूपात खाता येते
- सोलकढीमध्ये याचा वापर करता येतो
- जेवणामध्ये वेगळा स्वाद हवा असल्यास, तुम्ही कोकमाचा वापर करून घेऊ शकता. डाळ, सांभार आणि भाजीमध्ये आंबटपणा आणण्यासाठीही याचा उपयोग होतो.
कधी खावे
कोकम तुम्ही सकाळी नाश्ता केल्यानंतर खाऊ शकता. उन्हातून आल्यानंतर कोकम सरबत पिता येते. तसंच तुम्ही सकाळी नाश्त्यासहदेखील हे कोकम सरबत पिऊ शकता. हे थंडावा देण्यासाठी पोटातील गॅसची समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरते. जेवणानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता. उन्हाळ्यात थंड पेय तुम्हाला कूल ठेवतील. त्यापैकीच एक कोकम सरबत आहे.
किती प्रमाणात खावे
कोकम सरबत चांगले लागते म्हणून अतिप्रमाणात पिऊ नये. याचेही एक ठराविक प्रमाणात सेवन ठरलेले असते. दिवसभरात तुम्ही दोन ते तीन कोकम खाऊ शकता. दिवसातून एक ते दोन ग्लास कोकम सरबत पिता येते. मात्र यापेक्षा अधिक सेवन करणे अजिबात चांगले नाही.
कोकमाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम (Side Effect Of Kokam Sharbat In Marathi)
वास्तविक कोकमाच्या सेवनाने जास्त दुष्परिणाम तर होत नाही. पण तरीही याचे तुम्ही योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.
- ज्या व्यक्तींना त्वचेसंबंध कोणतीही अलर्जी आहे, त्यांनी कोकम सरबत पिण्यापूर्वी अथवा कोकमाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
- कोणीही गंभीर आजारांचा उपचार करून घेत असेल तर त्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
कोकम सरबत तुम्ही केवळ उन्हाळ्यात नाही तर नियमित पिऊ शकता. मात्र हे अति थंड असते. त्यामुळे ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात न पिणं योग्य.
कोकम तुम्ही भाजी अथवा आमटीमध्ये वापरत असाल तर तुम्ही साधारण दोन ते तीन पाकळ्या इतकंच वापरावं. तसंच त्याचे आगळ वापरत असाल तर त्याचे प्रमाणही ठरवून घ्यावे. सोलकढी अथवा सरबतामध्ये ठरलेल्या प्रमाणानुसार वापरावे.
ज्यांना अलर्जी आहे केवळ अशाच व्यक्तींना डॉक्टरांचा सल्ला कोकम खाण्याआधी घ्यावा लागेल. अन्यथा सल्ल्याची गरज भासणार नाही.