Make Up Products

निवडा परफेक्ट लिपस्टिक शेड्स | Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

Leenal Gawade  |  Dec 10, 2019
लिपस्टीक शेड्स

लिपस्टिक हा मेकअपमधील असा प्रकार आहे जो लावल्यानंतर तुमच्या लुकमध्ये लगेचच फरक पडतो. म्हणूनच खूप जणांना मेकअपमधील इतर कोणत्याही गोष्टी आवडत नाहीत. पण त्यांच्यासाठी लिपस्टिक ही एकदम मस्ट असते. लिपस्टिकचे कामच आहे, तुमच्या लुकला अधिक सुंदर करण्याचे. अनेकांकडे वेगवेगळ्या लिपस्टिकच्या शेड्सचे कलेक्शनच असते, असायलाच हवे. कारण वेगवेगळ्या कामानुसार आणि वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार तुमच्या लिपस्टिकचे शेड हे बदलायला हवेत. इतकेच नाही तर तुम्ही लिपस्टिकचा वापरही तुमचा चेहरा, काम, कामाचे स्वरुप आणि कार्यक्रम यानुसार बदलायला हवेत. खूप जणांना त्यांनी निवडलेल्या लिपस्टिक या त्यांच्या स्किनटोनला जातात की नाहीत हे देखील माहीत नसते. अशावेळी तुम्ही लिपस्टिकची परफेक्ट शेड  Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi कशी निवडावी हे सांगणार आहोत.चला करुया सुरुवात.

लिपस्टिकचे वेगवेगळे प्रकार – Types Of Lipsticks In Marathi

लिपस्टिकचे जितके रंग आहेत तितकेच लिपस्टिकचे प्रकारही आहेत. त्यामुळे तुम्ही आधी लिपस्टिकचे प्रकार जाणून घेणे फारच गरजेचे असते. त्यामुळे आधी लिपस्टिकचे जितके रंग आहेत तितकेच लिपस्टिकचे प्रकारही आहेत. त्यामुळे तुम्ही आधी लिपस्टिकचे प्रकार जाणून घेणे फारच गरजेचे असते. त्यामुळे आधी आपण जाणून घेऊया लिपस्टिकचे वेगवेगळे प्रकार. त्यानुसार तुम्हाला कोणती लिपस्टिक अधिक चांगली दिसेल हे देखील तुम्हाला कळेल.

वाचा – लिपस्टिक लावण्याचे दुष्परिणाम

मॅट लिपस्टिक (Matt Lipstick)

मॅट लिपस्टिकचा ट्रेंड सध्या जास्त आहे. तुम्ही एखादी लिपस्टिक लावल्यानंतर जेव्हा ती तुमच्या ओठांना लावल्यासारखीही वाटत नाही किंवा ती तुमच्या ओठांना समरुप झाल्यासारखी वाटते अशी लिपस्टिक मॅट लिपस्टिक असते. हल्ली तुम्हाला मॅट लिपस्टिकमध्ये अनेक शेड दिसतील आणि त्याचे अनेक प्रकारही दिसतील. सर्वसाधारणपणे ही लिपस्टिक तुम्हाला ऑफिसससाठी वापरता येईल. या लिपस्टिक अधिक काळ टिकतात. शिवाय त्या खूप चकचकीत दिसत नाहीत. त्यामुळे एखाद्या फॉर्मल कार्यक्रमांना त्या अधिक चांगल्या दिसतात.

वाचा – मेकअप ब्रश

ग्लॉसी लिपस्टिक (Glossy Lipstick)

ग्लॉसी लिपस्टिक

ज्या लिपस्टिक्स लावल्यानंतर तुमच्या ओठांवर चमक येते. त्याला ग्लॉसी लिपस्टिक म्हणतात. या लिपस्टिक लावल्यानंतर तुमचे ओठ छान चमकतात. ग्लॉसी लिपस्टिकमध्ये लिक्वीडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच तुमचे ओठ तुम्हाला ओले वाटत राहतात. यामध्ये तुम्हाला ग्लिटर आणि रंगाचे अनेक पर्याय मिळतात. गुळगुळीत ओठांसाठी आपण चमकदार लिप ग्लाॅस देखील वापरुन पाहू शकता.

क्रिम लिपस्टिक (Creamy Lipstick)

अनेकदा काहींना लिपस्टिक लावल्यानंतर त्याला ओठांना भेगा पडल्याचे वाटते अशावेळी क्रिम लिपस्टिकचा वापर करा असे म्हटले जाते. तर या क्रिम लिपस्टिकचा बेस हा क्रिम असल्यामुळे ही लिपस्टिक ओठांवर छान राहते. ती छान पसरते सुद्धा म्हणूनच जर तुम्हाला जास्त वेळ लिपस्टिक टिकवायची असेल तर तुम्ही अशा लिपस्टिक वापरु शकता.

सॅटीन आणि शीअर लिपस्टिक (Satin and Sheer lipstick)

लिपस्टीक शेड्स

तसं पाहायला गेलं तर सॅटीन लिपस्टिक आणि क्रिम लिपस्टिकमध्ये फारसा फरक नाही. सॅटीन लिपस्टिकचा स्ट्रोक पटकन बसतो. त्यामध्ये ग्लिटर नसते. तर शीअर लिपस्टिकमध्ये तुम्हाला ग्लीटर पार्टीकल दिसतील. या लिपस्टिक एखाद्या पार्टीसाठी खूप छान दिसतात. साडी असो वा तुमचा हेवी ड्रेस त्यावर या लिपस्टिक जास्त चांगल्या खुलून दिसतात.

वाचा – कोरड्या ओठांसाठी लिप बाम

क्रेऑन लिपस्टिक (Crayon Lipstick)

 लहान मुलांचे खडूचे रंग तुम्हाला माहीतच असतील.खडूच्या स्वरुपात असलेली ही लिपस्टिक ही हल्ली सर्रास उपलब्ध आहे. चॉक फॉर्ममध्ये असल्यामुळे तुम्हाला या लिपस्टिकला टोक काढावे लागते. ही लावणे थोडे कठीण असते. कारण ही लिपस्टिक तुम्हाला नीट लावावी लागते. हल्ली या क्रेऑन लिपस्टिकमध्ये शीआ बटर असल्यामुळे ते लावणे फारच सोपे जाते. या लिपस्टिक कॅरी करायलाही फार सोप्या असतात.

लिक्विड लिपस्टिक (Liquid Lipstick)

लिक्विड लिपस्टिक ही देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. लिक्विड स्वरुपातील या लिपस्टिकमध्ये तुम्हाला मॅट, ग्लॉस असे प्रकार मिळतात. या लिपस्टिकमध्ये हल्ली इतकी विविधता पाहायला मिळते की, तुम्हाला त्या कोणत्याही प्रसंगी लावता येतात. या लिपस्टिक स्मज प्रुफ असतात. त्यामुळे त्या सहज जात नाहीत.

लिपस्टिक शेड्स निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी – Tips for Choosing Right Lipstick Shades

लिपस्टिकचे प्रकार पाहिल्यानंतर आता आपण लिपस्टिक निवडताना तुम्ही नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ते देखील आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.  तुमचा रंग, तुमचे कामाचे स्वरुप आणि वय या सगळ्यावर आधारीत हे निकष ठरलेले असतात. या निकषांनुसार तुम्ही कोणत्या लिपस्टिकची निवड करायला हवी ते आता आपण जाणून घेऊया. 

1. वय (Age)

वयाचे असू द्या भान

लिपस्टिक लावण्याचे वय असे काही नाही. पण लिपस्टिकची शेड निवडताना तुम्हाला तुमच्या वयाचा विचार करावा लागतो. कारण तुम्ही कोणत्याही वयात कोणताही शेड लावू शकत नाही. त्यामुळे लिपस्टिकची निवड करताना तुम्ही या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.  

उदा. जर तुम्ही साधारण 25 ते 30 घरात असाल तर तुम्हाला गोड गुलाबी किंवा फार लाईट कलर उठून दिसेल पण तो तुमची पर्सनॅलिटीला चांगला दिसणार नाही. त्याने तुम्ही अल्लड किंवा लहान वाटाल.

महिन्याभरात मिळवा तुम्हाला हवी असलेली सुंदर त्वचा… तेही घरच्या घरी

चेहरा (Face)

आता तुमचा चेहऱ्याचा आकारही लिपस्टिक निवडीमध्ये महत्वाचा असतो. याचे कारण असे की, तुमचा चेहरा फार लहान असेल आणि तुम्ही फार गडद लिपस्टिक निवडत असाल तर ती तुमचा संपूर्ण चेहरा झाकोळू शकते. जर तुमचा चेहरा मोठा असेल आणि तुम्ही गडद लिपस्टिक लावली असेल तर तुमचा चेहरा पान खाल्ल्यासारखा वाढू शकेल. 

उदा. जर तुमचा चेहरा चौकोनी आहे आणि तुम्ही फार गडद लिपस्टिक लावली असेल तर तुमच्या चेहऱ्यावर ती उठून किंवा खुलून दिसणार नाही.

तुमचा स्किनटोन (Complexion)

स्किनटोनचाही करा विचार

तुमचा रंग सावळा की गोरा असा भेद आम्हाला मुळीच करायचा नाही. पण तुमच्या स्किनटोननुसार तुम्ही त्याची निवड करणे फारच गरजेचे असते. नाही तर तुम्हाला लिपस्टिक चांगल्या दिसणार नाहीत. तुमच्या स्किनटोननुसार लिपस्टिक निवडण्यामागे त्या खुलून दिसणे जास्त आवश्यक असते. 

उदा. तुमचा रंग फारच गोरा आहे म्हणून तुम्ही खूप ब्राईट म्हणजे लाल किंवा भडक रंगाचा प्रयोग करत असाल तर ते तुम्हाला नेहमी लाऊड लुक देऊ शकतात. तुमचा रंग सावळा असेल आणि तुम्ही खूपच फिक्कट रंग निवडला असेल तरी तो तुम्हाला चांगल दिसणार नाही.

4. कामाचे स्वरुप (Work Type)

तुमच्या कामाचे स्वरुप काय या नुसारही तुम्ही लिपस्टिकची शेड निवडायला हवी. लिपस्टिकचा प्रकार निवडायला हवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी बोलायचे असते. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल, शाळेत शिक्षिका किंवा प्रोफेसर असाल किंवा मग मीडिया क्षेत्राशी निगडीत असाल तुम्हाला सतत लोकांशी बोलायचे असते. अशावेळी तुम्ही निवडलेला रंग हा परफेक्टच हवा.

उदा. तुम्ही शिक्षिका असाल आणि तुम्ही लाल रंगाची लिपस्टिक लावली तर ती तुमच्या कामाच्या ठिकाणी अजिबात चांगली नाही. कारण असा रंग तुमची पर्सनॅलिटी चुकीची दाखवतो.

कामाच्या वेळा (Working Hour)

जर तुमच्या कामाच्या वेळा अधिक असतील तर तुम्हाला दिवसभर टिकणारी लिपस्टिक हवी. म्हणजे तुम्हाला जास्त वेळा लिपस्टिक लावायला नको. म्हणूनच कामाच्या वेळा देखील तुम्हाला माहीत असणे फारच गरजेचे असते. 

उदा. जर तुम्हाला मिटींग आणि सतत कोणाशी बोलायचे असेल अशावेळी तुम्ही लाँग लास्टिंग लिपस्टिकची निवड करा.

स्किनटोननुसार निवडा लिपस्टिक शेड्स – Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

लिपस्टिक शेड्स

तुमच्या चेहऱ्याचा रंग कोणताही असला तरी देखील तो सुंदरच असतो. पण प्रत्येक स्किनटोनची Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi) अशी एक खासियत असते. त्यानुसार तुम्ही त्याची निवड केली आता लिपस्टिक अधिक चांगली दिसते आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास देते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्किनटोननुसार लिपस्टिकची कोणती शेड तुमच्यासाठी परफेक्ट आहे ते देखील सांगणार आहोत.

उजळ त्वचेसाठी (Lipstick For Light Skin Tone)

काहींचा वर्ण फारच उजळ असतो अशांना कोणत्याही लिपस्टिकच्या शेड चांगल्या दिसतात हे जरी खरे असले तरी देखील तुम्ही काही काळजी घेणे गरजेचे असते. तुकाहींचा वर्ण फारच उजळ असतो अशांना कोणत्याही लिपस्टिकच्या शेड चांगल्या दिसतात हे जरी खरे असले तरी देखील तुम्ही काही काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही जराही गडद रंग लावला तरी तुमचा लुक पूर्णपणे बदलून जातो. त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही 6 लिपस्टिकच्या शेडची निवड केली आहे. ज्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि वेगवेगळ्या लुकनुसार तुम्हाला लावता येतील.

MYGLAMM LIT CREAMY MATTE LIPSTICK – ROSSINI

उजळ रंगाच्या लोकांना हा रंग खूपच चांगला उठून दिसतो. हा रंग लावल्यामुळे तुमची पर्सनॅलिटी एकदम छान दिसते. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही हा शेड वापरु शकता. हा तुम्हाला खूप छान दिसेल.

Maybelline New York Color Sensational Creamy Matte Lipstick

जर तुम्हाला गुलाबी रंग आवडत असेल तर तुम्ही असा गुलाबी रंग घेऊ शकता. पण जर तुम्ही कोणत्या ऑफिसच्या कार्यक्रमासाठी जाणार असाल तिथे तुम्ही सिनिअर म्हणून जाणार असाल तर तुम्ही या रंग निवडू नका. जर निवडलात की, तर तो फार लावू नका अगदी हलका लावा.

M.A.C Lipstick / Mini – Lady Danger

गोऱ्या वर्णाला केशरी रंग ही उठून दिसतो. हा रंग तुम्ही कधीही लावू शकता. तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही वेअरवर असे ड्रेस आरामात घालता येतील.

Kay Beauty Matteinee Matte Lipstick

कतरिना कैफच्या ब्युटी रेंजमधील हे प्रोडक्टही फार चांगले आहेत.तुम्हाला हा शेडही नक्की ट्राय करता येईल. तुम्हाला हा रंग ट्रेडिशनलवेअरवर घालता येईल. 

 

Lakme Absolute Lip Pout Matte Lip Color – Pink Fantasy

तुम्हाला थोडा फ्रेश रंग आवडत असतील तर तुम्ही हा रंग ही कधी कधी वापरु शकता. तुमच्या स्किनटोनला हा रंग खुलून दिसतो. पण तुम्ही मध्यमवयीन असाल तर हा रंग टाळा. 

MANISH MALHOTRA SOFT MATTE LIPSTICK – SCARLET DREAM

लिपस्टिकचा असा एखादा शेडही तुमच्या ओठांना खूपच सुंदर दिसू शकतो. ही लिपस्टिक तुम्हाला खास समारंभाना नक्की वापरता येईल

गव्हाळ त्वचेच्या टोनसाठी लिपस्टिक शेड (Lipsticks For Wheatish Skin Tone)

आता सर्वसाधारणपणे सगळ्यांचाच रंग गव्हाळ रंगामध्ये येतो. जर तुमचा रंग गव्हाळ असेल तर तुमच्यासाठीही रंगाचे अनेक पर्याय आहेत जे तुम्ही नक्कीच ट्राय करुन पाहायला हवे तुमच्यासाठीही आम्ही काही रंगाची निवड केली आहे ते रंग कोणते ते पाहुया

MANISH MALHOTRA HI-SHINE LIPSTICK – BERRY WINE

गव्हाळ रंगावर हा रंग खूप चांगला खुलून दिसतो. जर तुम्हाला काही वेगळं लावायची इच्छा असेल तर हा रंग तुम्ही निवडू शकता.

Rimmel London Lasting Finish Matte Lipstick

जर तुम्हाला रेग्युलरसाठी लिपस्टिक हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारचा रंग निवडू शकता. पण हा रंग लावताना जास्ती स्ट्रोक लावू नका. कारण तो जास्त गडद दिसेल. 

 

NYX Professional Makeup Powder Puff Lippie Cream – Boys Tears

तुम्हाला खूप लाल लिपस्टिक नको असेल तर तुम्ही हा रंग नक्कीच निवडू शकता. तुम्हाला क्रिम आणि लाँग लास्टींग अशी लिपस्टिक नक्की ट्राय करु शकता.

 

Mettle Liquid Lipstick – 10 Mimosa (Deep pinkish red with blue undertone)

जर आपल्याला लाल आवडत असेल तर हे चांगले मॅट लिपस्टिक निवडा. ही लिपस्टिक तुम्हाला छान उठून दिसते. तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात किंवा फॉर्मल इव्हेंटला या रंगाची लिपस्टिक लावता येईल.

Always On Liquid Lipstck

चॉकलेटी रंगाची शेड अनेकदा गव्हाळ रंगाला उठून दिसते. जर तुम्हाला थोडा वेगळा रंग ट्राय करायचा असेल तर तुम्ही हा रंग नक्की ट्राय करु शकता.

सावळ्या टोनसाठी लिपस्टिक शेड (Lipstick Shades For Dusky Skin Tone)

जर तुमचा रंग सावळा असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी लिपस्टिकच्या अनेक शेड उपलब्ध आहेत. जरी तुमचा वर्ण उजळ नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला काही शेड्स या स्किनटोनमधील सगळ्यात सुंदर रंग हा सावळा रंग आहे. सावली सलोनी तेरी झिल सी आँखे…. असे या रंगाबद्दल उगीचच म्हटले जात नाही. जर तुमचा रंग सावळा असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी लिपस्टिकच्या अनेक शेड उपलब्ध आहेत. जरी तुमचा वर्ण उजळ नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला काही शेड्स या फारच उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही या शेड्स नक्की ट्राय करुन पाहा.

MANISH MALHOTRA HI-SHINE LIPSTICK – REGAL CRIMSON

सावळ्या रंगाला सुंदर दिसणारा असा हा रंग आहे. हा रंग गडद असला तरी तुमच्या ओठांची शोभा अधिक वाढवतो. त्यामुळे तुम्ही हा रंग ट्राय करायला हवा

Nothing Else Matter Longwear Lipstick – 16 Cloud Wine

गव्हाळ रंगाला गडद रंग फारच उठून दिसतात. तुम्ही बर्गेंटीमधील ही शेड अगदी आरामात निवडू शकता. तुम्हाला ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी हा रंग निवडता येईल. 

Mettle Matte Lipstick – 05 Hedone

हा रंग गोरा आणि सावळा दोघांनाही छान उठून दिसतो. तुम्हाला लाल आणि केशरी रंगाचे कॉम्बिनेशन हवे असेल तर तुमच्यासाठी हा रंग एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तुमच्या मेकअप किटमध्ये हा एक तरी रंग हवा.

Mettle Liquid Lipstick – 05 Polaris

जांभळ्या रंगाची शेड ही थोडी वेगळी आणि नेहमीच चांगली दिसते. जर तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी ही लिपस्टिक चांगली दिसू शकेल.

Maybelline New York Super Stay Matte Ink Liquid Lipstick – 80 Ruler

जर तुम्हाला गुलाबी आणि लाँग लास्टिंग असे काही हवे असेल तर तुम्ही हा पर्याय नक्की निवडू शकता. तुमच्यावर हा रंग नक्कीच खुलून दिसू शकेल. तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये किंवा कॅज्युअल मिटींगसाठी हा रंग तुम्ही निवडू शकता. 

Artist Rouge Lip Stick – Powder Pink

तुम्हाला गुलाबी रंग लावायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा गुलाबी रंग सुद्धा निवडू शकता. हा रंग तुम्हाला अजिबात विचित्र दिसणार नाही.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

लिपस्टिक ग्लुटेन फ्री आहे का?

ग्लुटेन शरीरात पटकन शोषले जातात म्हणूनच ग्लुटेन फ्री प्रोडक्टची नेहमीच मागणी केली जाते. तुमच्या पोटात ग्लुटेन जाऊ नये म्हणून तुम्ही ग्लुटेन फ्री लीप बाम आणि लिपस्टिक वापरायला हवी. लिपस्टिक ग्लुटेन फ्री नसतात. पण काही ब्रँडमध्ये तुम्हाला ग्लुटेन फ्री लिपस्टिक मिळू शकतील. 

लिपस्टिक कशी काढावी?

लिपस्टिक मेकअपचा एक भाग आहे. ती कितीही सुरक्षित असली तरी दिवसाअखेरीस तुम्ही तुमची लिपस्टिक काढणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही मेकअप क्लिनझरचा उपयोग करुन तुमची लिपस्टिक काढू शकता. पाण्याने लिपस्टिक कधीच जात नाही. ती आतपर्यंत तुमच्या त्वचेत जाते. त्यामुळे ओठ काळे पडण्याची शक्यता असते. हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही लिपस्टिक दिवसाअखेरीस काढून टाका.

लिपस्टिक रोज लावणे सुरक्षित आहे का?

लिपस्टिकमध्ये केमिकल्स असले तरी नैसर्गिक घटक असलेले लिपस्टिक मिळतात. त्यामुळे त्या रोज लावणे सुरक्षित असते. जर तुम्हाला रोज लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही चांगल्या प्रतीची लिपस्टिक निवडणेही जास्त गरजेचे असते. त्यामुळे हलक्या प्रतीची लिपस्टिक निवडण्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रतीची लिपस्टिक निवडा. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे लिपस्टिक लावणे तसे सुरक्षित असते. 

You Might Like This:

Types of Lipsticks in Hindi

Read More From Make Up Products