DIY सौंदर्य

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे

Trupti Paradkar  |  Jan 12, 2021
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे

कमळाचं फुल आजवर तुम्ही फक्त पूजेसाठी अथवा शोभेसाठी वापरलं असेल. मात्र या फुलापासून काढलेल्या तेलाचा वापर सौंदर्यासाठी देखील चांगला वापर  केला जाऊ शकतो. कारण कमळाचं तेल तुमच्या त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरतं. हिवाळ्यातील कोरड्या आणि थंड वातावरणामुळे केस निस्तेज आणि त्वचा कोरडी होते. अशावेळी तुमच्या केसांचा आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी कमळाचे तेल फार उपयुक्त ठरतं. कमळाचं तेल कमळाच्या फुलापासून काढलं जातं. बाजारात अनेक ठिकाणी तुम्हाला तयार कमळाचं तेल मिळू शकतं. त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी जाणून घ्या या तेलाचा कसा करावा उपयोग

केसांसाठी वरदान का ठरतं कमळाचं तेल –

केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही केसांवर कमळाचं तेल लावू शकता. कारण या तेलात अॅंटि ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात शिवाय केसांची वाढही चांगली होते. नियमित कमळाचं तेल केसांना लावल्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. ज्यामुळे केस गळणे मोठ्या प्रमाणावर कमी होते. जर केसांना कमी महिनाभर कमळाचं तेल लावलं तर तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्याही कमी होऊ शकते. 


कसा करावा वापर –

कमळाच्या तेलाचा वापर करण्यासाठी तुम्ही या तेलाने केस कंडिशनर करू शकता.  केस शॅम्पू केल्यावर कंडिशनरप्रमाणे थोडं कमळाचं तेल तुमच्या केसांना लावा आणि साध्या पाण्याने केस पुन्हा धुवून टाका. ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार होतील.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरा कमळाचं तेल –

हिवाळ्यात केसांप्रमाणेच तुमची त्वचाही कोरडी आणि निस्तेज होते. कमळाच्या तेलाचा वापर केसांप्रमाणेच त्वचेवरही करता येतो. नियमित कमळाचे तेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचेचा डलपणा कमी होतो आणि टवटवीतपणा दिसू लागतो. या तेलामुळे तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळते. त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा हळू हळू कमी होत जातो. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. सुरकुत्यांमुळे तुम्ही वयाआधीच वयस्कर दिसू लागता. मात्र या तेलामुळे तुमचे सौंदर्य चिरतरूण टिकण्यास मदत होते.


कसा करावा वापर  –

आम्ही सांगितलेले हे घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट मध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे मायग्लॅमचे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हे ब्युटी प्रॉडक्टही अवश्य ट्राय करा.

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

सैल पडलेली त्वचा होईल टाईट, ट्राय करा जुही परमारचं ब्युटी सिक्रेट

लाल चंदनमुळे कमी होतील चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग

डाळिंबाच्या सालीने वाढवा सौंदर्य, चेहऱ्यावर येईल ग्लो

Read More From DIY सौंदर्य