Dating

Love Test – जीवनसाथी बनविण्यासाठी विचारा हे प्रश्न

Dipali Naphade  |  Jun 7, 2021
Love Test - जीवनसाथी बनविण्यासाठी विचारा हे प्रश्न

प्रेमात पडणं खूप सोपं असतं पण प्रेम निभावणं खूपच कठीण असतं. हे बऱ्याचदा आपण ऐकतोही आणि खऱ्या आयुष्यात अनेक जोड्यांच्या बाबतीत पाहतोही. प्रेम, आकर्षण या सगळ्याच गोष्टी असतात. सुरूवातीला आकर्षण असतं. बरेचदा अनेक वर्ष एकमेकांसह प्रेमाच्या नात्यात (Love Relationship) असूनही एकमेकांना ओळखू शकत नाही. मग अशावेळी लग्नाच्या एका वर्षात घटस्फोट होण्यासारख्या गोष्टीही दिसून येतात. पण तुम्ही ज्याला डेट (Date) करत आहात अर्थात तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहात, त्याच्याबरोबरच तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य घालवू शकता की नाही याबाबत तुम्हाला जर मनात शंका असेल तर तुम्ही त्याला काही प्रश्न विचारणे आणि काही बाबतीत त्याचं निरीक्षण करणे खूपच गरजेचे आहे. आपण हवं तर याला एक गमतीचा अर्थात Love Test Game असं म्हणू. पण तुम्हाला जर मनात तळ्यात मळ्यात असेल तर तुम्ही नक्कीच हे प्रश्न तुमच्या भावी जीवनसाथीला विचारायला हवेत.

कुटुंब की काम, यापैकी काय महत्त्वाचं?

Shutterstock

एकदा प्रेमाच्या नात्यात आलं की दोघांनाही एकमेकांकडून अपेक्षा असणं हे साहजिक आहे. एकमेकांसाठी वेळ देणं, एकमेकांसाठी न सांगता काही सरप्राईज आखणं असो अथवा एकमेकांसाठी कामातून वेळ काढून रोमान्स करणं असो. काम करणं हे महत्त्वाचं आहेच. पण सतत कामाची कारणं सांगून वेळ न देणं नात्यासाठी योग्य नाही. त्यामुळे कुटुंब आणि काम याचा योग्य ताळमेळ बसवता येणारा तुमचा जोडीदार आहे की नाही हे त्याच्या त्वरीत उत्तरावरून तुम्हाला जाणून घेता येईल. याचा योग्य ताळमेळ बसवणारा जोडीदार अगदी योग्य आणि समाधानकारक उत्तर देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही घाई न करता योग्य निर्णय घेऊ शकता. हा प्रश्न खरं तर खूपच विचित्र आहे. पण विचारणंही गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील असा हा प्रश्न नक्कीच विचारू नका. पण ओघाओघात तुम्ही हा प्रश्न नक्कीच विचारू शकता.

तुमचा जोडीदार असेल रागीट तर कसे टिकवाल तुमचे नाते

जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्की काय करायला आवडतं?

खरं तर तुम्ही एकमेकांना ओळखत असाल तर तुम्हाला एव्हाना या गोष्टी माहीत झालेल्या असतात. पण जर तुम्ही ओळखत नसाल तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे जी नात्यात (time for partner is important in relationship) अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या जोडीदाराला घरात बसून झोपा काढायला आवडतात की आपल्या आवडीनिवडी आणि इतरांच्याही आवडीनिवडी जपायला आवडतात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे. कारण केवळ लग्न करणं अथवा प्रेम करणं ही गोष्ट नसते तर ते आयुष्यभरासाठी एक जपणूक असते. एकदा प्रेम केलं तर ते निभावण्याची आणि आपल्या जोडीदाराला वेळ देण्याचीही तितकीच गरज असते. अर्थात याचा अर्थ असा नाही की, 24 तास एकमेकांसह राहायला हवं. पण किमान जितका वेळ एकमेकांसाठी काढणे गरजेचे आहे तितका तरी आपला जोडीदार देईल की नाही याची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. 

कोणती व्यसने आहेत आणि ती किती प्रमाणात आहेत?

Shutterstock

बदलती लाईफस्टाईल आणि इतर गोष्टींमुळे सिगारेट आणि दारूची बऱ्याच जणांना व्यसने असतात. पण आपण किती पित आहोत आणि यामुळे आपल्या जोडीदाराला त्रास तर होत नाही ना याची काळजी घेणेही गरजेचे असते. कोणतीही नशा अति केल्याने नुकसानच होते. त्यामुळे महिन्यातून दोन ते तीन वेळा पार्टी आणि अशा गोष्टी एखाद्याला चालू शकतात. पण रोज जर एखाद्याला दारू पिण्याची सवय असेल तर पुढे जाऊन त्याचा अंत हा केवळ भांडणातच होणार असतो याचादेखील विचार करावा. त्यामुळे आपण ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचा विचार करत आहोत. त्याला कोणत्या सवयी आहेत याचाही विचार करावा. 

नात्यात ‘या’ चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा!

बचतीबाबत (Savings) काय विचार आहे

Shutterstock

हल्ली दोघेही कमावते असतात. त्यामुळे घरात तसा काही त्रास होत नाही. पण सतत उधळपट्टी करणारा जोडीदारही चालत नाही. जिथे हवे तिथे बचत करून घर सांभाळणारी व्यक्ती लागते. कारण आयुष्यभर जितकं प्रेम महत्त्वाचं आहे तितकीच बचतही महत्त्वाची आहे. भविष्यात नक्की काय काय करायचं ठरवलं आहे याबाबत दोघांनाही स्पष्टता असलेली बरी. तरंच तुम्ही पुढे जाऊन व्यवस्थित नातं टिकवू शकता. केवळ प्रेमाने पोट भरत नाही हेदेखील सत्य आहे. त्यामुळे दोघांनीही आपापली जबाबदारी समजून या गोष्टींबाबतही चर्चा करायला हवी. 

भांडण मिटवण्यासाठी उत्तम उपाय आहे मेक-अप सेक्स

रोमँटिक आणि किती भावनाप्रधान आहे

Shutterstock

प्रेमाचं नातं म्हटलं की त्यात भावना (Emotions) आणि रोमान्स (Romace) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याबद्दल आकर्षण आणि त्याच्याशी सेक्स (Sex) करण्याची भावना असणं यात काहीही वाईट नाही. हे अत्यंत नैसर्गिक आहे. पण आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत आणि ज्या आपल्या फँटसी (Fantacy) आहेत. त्या सगळ्याशी आपल्या जोडीदाराचे विचार जुळतात की नाही हेदेखील जाणून घ्यायला हवं. कारण दोघांपैकी एकच जोडीदार रोमँटिक असेल आणि दुसऱ्याला त्यात काहीही वाटत नसेल तर मग अशी जोडी टिकू शकणार नाही. त्यामुळे आपण जितके रोमँटिक आणि भावनाप्रधान आहोत तितकाच आपला जोडीदार असणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुमचा रोमान्स आणि सेक्सलाईफ (Sex Life) अधिक चांगली होईल. 

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Dating