DIY सौंदर्य

मेकअप वाईप्स की क्लिन्झर काय आहे सगळ्यात चांगले

Leenal Gawade  |  Sep 15, 2020
मेकअप वाईप्स की क्लिन्झर काय आहे सगळ्यात चांगले

मेकअप केल्यानंतर तो काढणे हा सर्वात मोठा टास्क असतो. कारण मेकअप योग्यपद्धतीने आणि योग्यवेळी काढला नाही तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.हल्ली मेकअपचे इतके वेगवेगळे प्रकार मिळतात की, जास्त काळ टिकणारा मेकअप घेण्याच्या नादात अनेकदा आपल्या त्वचेवरुन मेकअप काढतानाच आपल्याला जास्त त्रास होतो. मेकअप काढण्यासाठी पूर्वी क्लिन्झिंग मिल्क नावाचा एक प्रकार मिळायचा पण आता त्यातही वेगवेगळी व्हरायटी आली आहे. मेकअप वाईप्स आणि मिस्लेअर वॉटर असे अनेक प्रकार यामध्ये मिळतात. यापैकी नेमका कोणता प्रकार त्वचेसाठी घ्यायचा असा विचार करत असाल तर आज आपण या संदर्भात अत्यत महत्वाची माहिती जाणून घेऊया.चला करुया सुरुवात

मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स

मेकअप वाईप्स (Makeup Removal Vibes)

इतर कोणत्याही वाईप्सप्रमाणे हे  वाईप्स असतात. फक्त त्यामध्ये मेकअप रिमुव्हिंगचे घटक  त्यात घातलेले असतात.तुमच्या त्वचेवरुन मेकअप काढून टाकण्यासाठी हे वाईप्स फारच उत्तम असतात. कारण तुम्हाला कापूस आणि त्यावर क्लिन्झर असे काही घ्यावे लागत नाही.  तुम्ही थेट तुमच्या चेहऱ्यावर हे क्लिन्झर वाईप्स वापरु शकता. यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या इसेन्शिअल ऑईलचा समावेश केलेले वाईप्स मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची निवड करु शकता.

तोटा: मेकअप वाईप्स वापरताना डोळ्यांचा मेकअप हा पूर्णपणे निघत नाही. डोळ्यांचा मेकअप काढताना अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनेकांना आवडत नाही. पण प्रवासासाठी हे मेकअप वाईप्स बेस्ट आहेत. 

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

मिस्लेअर वॉटर (micellar Water)

जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही मिस्लेअर वॉटरच्या जाहिराती हमखास पाहिल्या असतील. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला यामध्ये प्रकार मिळतात. ऑईली आणि नॉर्मल स्किनसाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय यामध्ये मिळतात. कॉटन पॅडमध्ये हे पाणी घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हे थेट लावू शकता. तुमच्या हेवी आयलायनर पासून ते जिद्दी आयमेकअपपर्यंत सगळं काही काढून टाकण्यासाठी हे मिस्लेअर वॉटर चांगले असते. त्यामुळे अनेक जण  मेकअप काढण्यासाठी याचा वापर करतात. मेकअप काढण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

तोटा: हे वापरायचा अनेकांना कंटाळा येतो. कारण त्यासाठी तुम्हाला सतत कॉटन पॅडचा उपयोग करावा लागतो.  त्यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी मेकअप काढताना मेकअप पॅडचा उपयोग करावा लागतो. असे सतत मेकअप पॅडचा प्रयोग करणे अनेकांना जमत नाही. शिवाय प्रवासात या बॉटलची खूप काळजी घ्यावी लागते. 


आता या मेकअप वाईप्स आणि क्लिन्झरचे फायदे आणि तोटे पाहता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा वापर करा.

मेकअप कधी करावा? तुम्हालाही पडतो का प्रश्न 

याशिवाय तुम्हाला सॅनिटाईज करुन तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही आमचे हे प्रोडक्टही वापरुन पाहू शकता. 

Read More From DIY सौंदर्य