डेकोर आयडिया

लग्नसोहळ्यासाठी आकर्षक मंडप डिझाईन्स (Mandap Designs For Wedding In Marathi)

Trupti Paradkar  |  Mar 2, 2020
लग्नसोहळ्यासाठी आकर्षक मंडप डिझाईन्स (Mandap Designs For Wedding In Marathi)

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास गोष्ट असते. फक्त वर आणि वधूसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीदेखील हा सोहळा एक अविस्मरणीय क्षण असतो. सहाजिकच लग्नकार्याची खरेदी, लग्नाचा हॉल बुक करणं, वेडिंग थीम, मंडप सजावट अशा अनेक गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. लग्नाचे विधी लग्नाच्या मंडपात केले जातात. लग्नाच्या मंडपाला मांडव असंही म्हणतात. प्राचीन काळापासूनच लग्नाच्या मांडवातच लग्नसोहळा पार पडतो. लग्न लागताना आधी वराला आणि नंतर वधूला लग्न मंडपात आणलं जातं.  लग्नसोहळ्यासाठी लग्नाचा मंडप विशेष पद्धतीने सजवला जातो. लग्नाच्या विधींसाठी नेहमीच्या सजावटीपेक्षा काही तरी हटके डिझाईन्स प्रत्येकाला हव्या असतात. काही लोकांना मात्र पारंपरिक पद्धतीनेच मंडप अथवा मांडव सजवायला आवडतो. तुमची आवड कोणतीही असली तरी आम्ही शेअर केलेल्या मंडप डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील (mandap designs for wedding)

Table of Contents

  1. झेंडूंच्या फुलांचा आकर्षक लग्न मंडप (Flamingo Wedding Mandap)
  2. मनमोहक पडद्यांच्या डिझाईनचा लग्न मंडप (Beautiful Curtain Design For Mandap)
  3. लाकडी चौकटीचा आकर्षक लग्न मंडप (Wedding Mandap With Wooden Box)
  4. पारंपरिक आणि क्लासिक लग्न मंडप (Traditional Mandap Design For Wedding)
  5. अथांग समुद्रकिनारा आणि लग्न मंडप (Beach Wedding Mandap Design)
  6. डेस्टिनेशन वेडिंगसाठी युनिक लग्न मंडप (Unique Wedding Mandap For Destination Wedding)
  7. पानाफुलांचा खास लग्न मंडप (Emerald Special Wedding Mandap)
  8. पांढऱ्या आणि गुलाबी फुलांचा सुंदर लग्न मंडप (White And Pink Flowers Mandap)
  9. हळदी समारंभासाठी खास लग्न मंडप (Mandap For A Light Ceremony)
  10. सिंपल पण युनिक लग्न मंडप (Simple But Unique Mandap)
  11. लाल आणि पांढऱ्या कॉम्बिनेशनची डिझाईन असलेला लग्न मंडप (Red And White Wedding Mandap Design)
  12. पारंपरिक पताका लग्न मंडप (Traditional Wedding Mandap)
  13. पारंपरिक वाड्यातील लग्न मंडप (Traditional Wedding Mandap)
  14. झाडाच्या सावलीतील लग्न मंडप (Wedding Mandap In Tree Shade)
  15. मोराच्या डिझाईन्सचा लग्न मंडप (Wedding Mandap For Maurya Designs)

झेंडूंच्या फुलांचा आकर्षक लग्न मंडप (Flamingo Wedding Mandap)

झेंडूंच्या फुलांचं प्रत्येक मंदल कार्यात एक विशेष महत्व आहे. दसरा, दिवाळी आणि धार्मिक सणसमारंभात झेंडूच्या फुलांची तोरणं आणि माळा दाराला लावण्याची पद्धत आहे. झेंडूची फुलं पिवळ्या, केशरी रंगाची असतात. या सजावटीत पिवळ्या, केशरी झेंडूची फुलं आणि पांढऱ्या सोनटक्क्यांच्या फुलांचा वापर केला आहे. ज्यामुळे तुमच्या सोपे लग्नविधीला अगदी पारंपरिक लुक नक्कीच मिळेल

Instagram

मनमोहक पडद्यांच्या डिझाईनचा लग्न मंडप (Beautiful Curtain Design For Mandap)

लग्नाच्या मंडपामध्ये अगदी पारंपरिकपासून मॉर्डन डिझाईन्सपर्यंत अनेक डिझाईन्सचा समावेश करण्यात येतो. जर तुम्हाला हलक्या, पेस्टल रंगाच्या शेड्स आवडत असतील तर ही मंडप डिझाईन तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. फिकट गुलाबी रंगाच्या पडद्यांच्या मंडपावर केलेली फुलांची डिझाईन याच्या सौदर्यांत आणखी भर घालत आहे.

Instagram

लाकडी चौकटीचा आकर्षक लग्न मंडप (Wedding Mandap With Wooden Box)

जर तुम्हाला गडद रंग आणि जास्त फुलांची डिझाईन नको असेल तर ही साधी आणि सौम्य मंडप डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. याच लाकडाच्या मंडपाची चौकट आहे. शिवाय त्यावर साध्या फुलांच्या माळा सोडल्या आहेत. मागे केशरी रंगाच्या फुलांची गणेशाची डिझाईन करण्यात आली आहे. हिरव्या रंगाच्या पानांवर केशर फुलांची डिझाईन उठून दिसत आहे. श्री गणेशाच्या साक्षीने या लग्न मंडपात पार पडलेला विवाह सोहळा नक्कीच मंगल ठरेल. 

Instagram

पारंपरिक आणि क्लासिक लग्न मंडप (Traditional Mandap Design For Wedding)

लग्नसोहळ्यात लग्न मंडपाचं डेकोरेशन नेहमीच सर्वाच्या लक्षात राहतं. शिवाय फोटोसेशनसाठी अशा आकर्षक डिझाईन्सचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. कारण लग्नाचे फोटो तुमच्या कायम जवळ असतात. म्हणूनच या आठवणींना अविस्मरणीय करण्यासाठी ही मंडप डिझाईन अगदी बेस्ट आहे. मंदीराच्या डिझाईनप्रमाणे दिसणाऱ्या या मंडप डेकोरेशनमुळे तुमचा सोहळा नक्कीच खास असेल. 

Instagram

अथांग समुद्रकिनारा आणि लग्न मंडप (Beach Wedding Mandap Design)

आजकाल समुद्रकिनारी लग्नसोहळ्या करण्याचा खास ट्रेंड आहे. जर समुद्रकिनारी लग्न करण्याचं तुमचंही स्वप्न असेल तर हा लग्न मंडप तुमच्यासाठी नक्कीच खास असेल. अथांग समुद्रकिनारा आणि त्याशेजारी बांधलेला हा हलक्या गुलाबी पडदे आणि फुलांच्या सजावटीचा लग्न मंडप नक्कीच आकर्षक दिसत आहे.

Instagram

डेस्टिनेशन वेडिंगसाठी युनिक लग्न मंडप (Unique Wedding Mandap For Destination Wedding)

डेस्टिनेशन वेडिंग करायला कोणाला नाही आवडणार. मात्र डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्ही जर एखादं निसर्गरम्य ठिकाण निवडलं असेल तर हा लग्न मंडप तुम्हाला नक्कीच आवडेल. एखाद्या डेरेदार झाडाखाली असा युनिक लग्न मंडप तुमच्या लग्नकार्याला नक्कीच आकर्षक करेल. 

Instagram

पानाफुलांचा खास लग्न मंडप (Emerald Special Wedding Mandap)

जर तुम्हाला लग्नकार्याची हिरव्या रंगाची थीम असेल तर ही लग्न मंडप डिझाईन तुम्हाला नक्की आवडू शकेल. या मंडपाच्या मध्येभागी एक आकर्षक घुमट बसवण्यात आला आहे. ज्यामुळे लग्न मंडप अधिकच आकर्षक आणि उठावदार दिसत आहे. लवेंडर रंगाची बैठकव्यवस्थादेखील नक्कीच सुंदर दिसत आहे. 

Instagram

पांढऱ्या आणि गुलाबी फुलांचा सुंदर लग्न मंडप (White And Pink Flowers Mandap)

पांढरी आणि गुलाबी रंगाचं कॉंम्बिनेशन नेहमीच छान वाटतं. शिवाय यामुळे लग्न मंडप फार भपकेदार न वाटता साधा पण सुंदर दिसतो. जर तुम्हाला तुमच्या लग्नसोहळ्यासाठी या रंगाच्या फुलांची थीम ठेवायची असेल तर हा लग्न मंडप अवश्य पाहा. यात पारंपरिक चौकीनी डिझाईन न करता गोलाकार आकाराचा मंडप करण्यात आला आहे. 

Instagram

हळदी समारंभासाठी खास लग्न मंडप (Mandap For A Light Ceremony)

आजकाल लग्नसोहळा तीन ते चार दिवस सुरू असतो. बऱ्याचदा मेंदही, हळद, संगीत, विवाह असे अनेक लग्नविधी केले जातात. बऱ्याचदा निरनिराळ्या विधींसाठी निरनिराळी सजावट केली जाते. हळदी समारंभासाठी नेहमीच पिवळ्या रंगाची थीम वापरण्यात येते. पिवळ्या रंगाच्या फुलांची ही डिझाईन हळदीच्या अथवा इतर कोणत्याही विधीसाठी परफेक्ट आहे. 

Instagram

सिंपल पण युनिक लग्न मंडप (Simple But Unique Mandap)

अनेकांना लग्नसोहळा अगदी साधेपणाने करायला आवडतो.  नातेवाईक आणि अगदी फक्त जवळची मित्रमंडळींच्या उपस्थितीत फार थाटमाट न करता लग्नकार्य केलं जातं. अशा लोकांसाठी हा लग्न मंडप नक्कीच खास असू शकतो. अगदी साधी डिझाईन असूनही ती फारच मनमोहक वाटत आहे. चारी बाजूने बांबू एकत्र करून त्यावर साधी रोषणाई केलेली आहे. 

Instagram

लाल आणि पांढऱ्या कॉम्बिनेशनची डिझाईन असलेला लग्न मंडप (Red And White Wedding Mandap Design)

गोलकार आकाराचा आणि लाल-पांढऱ्या कॉम्बिनेशनने सजवलेला हा लग्न मंडप नेहमीच्या पारंपरिक डिझाईनपेक्षा वेगळा आहे. यासाठी पांढऱ्या रंगाचे पडदे आणि लाल फुलांचा वापर केला आहे. स्विमींगपुलाशेजारी थाटलेला हा मंडप नक्कीच तुमच्या लग्नकार्याला खास दिसत आहे. 

Instagram

पारंपरिक पताका लग्न मंडप (Traditional Wedding Mandap)

जर तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी अथवा गावी लग्न करणार असाल तर ही सजावट अवश्य पाहा. अगदी साध्या कागदी पताका लावून सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीसाठी खर्चदेखील फारच कमी येऊ शकतो.

Instagram

पारंपरिक वाड्यातील लग्न मंडप (Traditional Wedding Mandap)

पुण्यातील ढेपेवाड्याप्रमाणे अनेक ठिकाणी पारंपरिक वाड्यात लग्न करण्याची आवड तुम्हाला नक्कीच असेल. डेस्टिनेशन वेडिंगसाठी अशा जुन्या वाड्यांची निवड केली जाते. वाड्याच्या कमानींना पडद्यांना सजवून असा  सुंदर लग्न मंडप नक्कीच तयार केला जाऊ शकतो. 

Instagram

झाडाच्या सावलीतील लग्न मंडप (Wedding Mandap In Tree Shade)

लग्न मंडपासाठी ही एक अतिशय युनिक आणि सोपी कल्पना आहे. तुम्ही जर डेस्टिनेशन वेडिंगची निवड केली असेल तर तुम्हाला ही कल्पना नक्कीच साकारता येईल. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या झालावर फक्त झेंडूच्या फुलांच्या माळा सोडून ही सजावट करता येईल. मंडपाची सावली ही प्रत्यक्ष त्या झाडाची असेल. हिरव्या गार वृक्षावर सोडलेल्या फुलांच्या माळा अतिशय शोभून दिसतील. ही सजावट अभिनेत्री सखी आणि अभिनेता सुव्रतच्या लग्नात करण्यात आली होती. हा लग्नसोहळा नेरळमधील सगुणाबागेत पार पडला होता. 

Instagram

मोराच्या डिझाईन्सचा लग्न मंडप (Wedding Mandap For Maurya Designs)

लग्न मंडप म्हटलं की त्यात फुलांची डिझाईन असायलाच हवी. मात्र जर तुम्हाला नवीन आणि युनिक डिझाईनचा लग्न मंडप हवा असेल तर हा अगदी मस्त आहे. कारण यात दोन मोरांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे मंडप अतिशय छान आणि आकर्षक दिसत आहे. मंडपाची डिझाईनदेखील नेहमीपेक्षा वेगळी आहे. 

Instagram

लग्नाच्या मंडपाबाबत असलेले काही निवडक प्रश्न – FAQs

लग्नाच्या मंडपाचा अंदाजे खर्च किती असेल ?

लग्नाच्या मंडपाचा खर्च कितीही असू शकतो. तुम्ही लग्नसोहळ्यासाठी सजावटीची कोणती थीम निवडली आहे यावर तो अवलंबून आहे. अगदी साधेपणाने अथवा अगदी राजेशाही थाटात अशा कोणत्याही प्रकारे लग्न मंडप घातला जातो. त्यामुळे पाच हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत त्याचा खर्च असू शकतो.

लग्नासाठी मंडप आणि डेकोरेशनचं बुकींग साधारणपणे किती दिवस आधी करावं ?

लग्नासाठीच्या सजावटीचं आणि लग्न मंडपासाठी आधीच बुकींग करावं लागतं. याचं कारण लग्नसोहळे साधारणपणे डिसेंबर ते जुन या महिन्यादरम्यान असतात. हा लग्नाचा सिझन असल्यामुळे डेकोरेटेरला याची आधीच कल्पना असावी लागते. शिवाय जर तुम्ही फुलांची डिझाईन करणार असाल तर त्या काळात ती फुलं उपलब्ध असतील का हेदेखील पाहावं लागतं. या सर्व गोष्टींचा विचार करून अंदाजे दोन ते तीन महिने आधी याचं बुकींग करावं. 

लग्नाचा हॉल अथवा बॅक्वेट हॉलच्या बजेटमध्ये मंडप डेकोरेशनचा खर्च समाविष्ट असतो का?

नक्कीच, लग्नाच्या हॉल अथवा बॅक्वेट हॉलचे सध्या पॅकेज असतात. जर तुम्ही लग्नाच्या सजावटीचा संपूर्ण खर्च हॉलच्या बुकींमध्ये समाविष्ट केलेलं पॅकेज घेतलं तर असं नक्कीच असू शकतो. मात्र बुकींग करण्यापूर्वी याची आधीच विचारणा करा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

भारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा

नववधूसाठी परफेक्ट आहेत हे स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ (Footwear For Bride In Marathi)

लग्नाच्या मेन्यूमध्ये कधीच नसावेत हे खाद्यपदार्थ

Read More From डेकोर आयडिया