DIY फॅशन

उंची कमी असली तरी तुम्ही घालू शकता ‘मॅक्सी’ ड्रेस, वाचा टीप्स

Leenal Gawade  |  Nov 18, 2019
उंची कमी असली तरी तुम्ही घालू शकता ‘मॅक्सी’ ड्रेस, वाचा टीप्स

अनेकदा उंची कमी असली की, पायघोळ किंवा सैल कपडे घालू नका असे सांगितले जाते. पण काही फॅशन अशा असतात त्या उंच मुलींना जरी शोभून दिसत असल्या तरी त्या आपल्यालाही कधीतरी त्या ट्राय कराव्याशा वाटतात. सध्या मॅक्सी ड्रेसची फॅशन आहे. कधीही कुठेही घालता येतील असे मॅक्सी ड्रेस केवळ तुमच्या कमी उंचीमुळे तुम्ही टाळत असाल. तर आज आम्ही तुम्हाला यासाठी काही खास टीप्स देणार आहोत. म्हणजे तुमची उंची कितीही असो तुम्ही हे ड्रेस आरामात घालू शकता.

तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर (Dressing Tips In Marathi)

मॅक्सी ड्रेस म्हणजे काय?

आता मॅक्सी म्हटल्यावर अनेकांना रात्री घातले जाणारे नाईट गाऊन समोर येतात. सैल आणि पायघोळ असे गाऊन सगळेच घालतात. साधारण तशाच पद्धतीने मॅक्सी ड्रेस असतात. म्हणजे लांब आणि सैल… पण त्यामध्येही वेगवेगळे पॅटर्न आणि रंग असतात. अगदी ऑफिसपासून ते पार्टीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तुम्ही हे मॅक्सी ड्रेस वापरु शकता. कॉटन, ज्युट, शिफॉन, होजिअरी अशा सगळ्या मटेरिअलमध्ये हे मॅक्सी ड्रेस मिळतात. 

मॅक्सी ड्रेसची उंची

Instagram

कमी उंची असणाऱ्यांना कायमच असे घोळदार कपडे घातले की आपण फारच बुटके दिसू अशी भिती असते. त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात घ्यावी ती अशी की, मॅक्सी ड्रेसची उंची तुम्ही तुमच्या अँकल पर्यंतची निवडा. फार पायघोळ असे मॅक्सी ड्रेस निवडू नका. जर तुम्हाला पायघोळ असा मॅक्सी ड्रेस आवडला असेल तरी तो घेणे टाळा कारण त्यामुळे तुमची उंची फारच कमी दिसू शकते. बाजारात अँकल लेंथचे मॅक्सी ड्रेस सहज मिळतात. जे तुम्हाला अगदी तसाच लुक देतात.

ओव्हरसाईज टी-शर्टने असा करा स्टायलिश लुक (How To Style Oversized T-Shirt In Marathi)

मॅक्सी ड्रेसची फिटींग

Instagram

कोणत्याही ड्रेसची फिटींग ही फारच महत्वाची असते. मॅक्सी ड्रेस तुलनेने थोडे सैल असतात. पण जर तुम्ही फारच किडकिडीत असाल तर तुम्ही स्लिवलेस किंवा सिंग्लेट टाळा कारण .यामध्ये तुम्ही फारच बारीक दिसू शकाल त्यापेक्षा तुम्ही थ्री फोर्थ स्लीव किंवा त्यापेक्षा थोडे कमी स्लीव्हज घातले तरी तुम्हाला चांगले दिसू शकतात.

रंगाची निवड करताना

Instagram

रंगाची निवडही मॅक्सी ड्रेस मध्ये फार महत्वाची असते. जर तुम्ही लहान प्रिंटची निवड केली तर तुम्ही त्यामध्ये छान उठून दिसाल. त्यामुळे लहान डिझाईन, लहान प्रिंटची निवड तुम्ही केलीत तर तुम्हाला ते फारच शोभून दिसतील. प्रत्येकाच्या आवडीचा रंग असतो. तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता.

स्टाईलिंग करताना

Instagram

कपड्यांची फॅशन कोणतीही असो तुम्हाला त्यावर स्टाईलिंग करणे जमायला हवे. आता मॅक्सी ड्रेसच्या बाबत सांगायचे झाले तर तुम्ही या ड्रेसला थोडा लुक येण्यासाठी एक बारीक बेल्ट घालू शकता. जर तुम्हाला ज्वेलरीची आवड असेल तर तुम्ही मोठे कानातले किंवा गळ्यालगत काहीही घालू शकता. त्यामुळे तुम्ही मॅक्सी ड्रेसची स्टाईलिंग कशी करता ते महत्वाचे आहे.

फुटवेअरची निवड महत्वाची

Instagram

मॅक्सी ड्रेसचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे फुटवेअर घालता ते देखील महत्वाचे असते. या ड्रेसवर पेन्सिल हिल्स शूजपेक्षा वेजेस किंवा कोल्हापूरीमधील हिल्स चांगले दिसतात. पण काही प्लेन ड्रेसवर पेन्सिल हिल्स चांगले दिसतात. जर तुमचा ड्रेस वेस्टर्नवेअरमधील असेल तर तुम्ही वेजेसमधील वेगवेगळे प्रकर ट्राय करु शकता. जर तुम्हाला फ्लॅट चपला घालायला आवडत असतील तर तुम्ही फ्लॅट चप्पल ट्राय करु शकता. 

त्यामुळे आता मॅक्सी ड्रेस बिनधास्त घाला. पण या टीप्स लक्षात ठेवा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY फॅशन