सणसमारंभासाठी, खास कार्यक्रमासाठी अथवा अगदी एखाद्या खास व्यक्तीसोबत डेटवर जाण्यासाठी तुम्ही जेव्हा तयार होता तेव्हा सर्वात जास्त त्रास होतो हेअर स्टाईल करताना. कारण नेहमी अगदी परफेक्ट दिसणारे तुमचे केस ऐनवेळी मात्र अचानक विचित्र दिसू लागतात. केस सुंदर दिसावे यासाठी काही तासांपूर्वीच तुम्ही केस धुता ज्यामुळे ते सुंदर दिसतील असं तुम्हाला वाटतं… मात्र होतं अगदी उलट. असं का ? हा प्रश्न तुम्ही कधी तुमच्या मनाला विचारला आहे का
केस धुतल्यानंतर नीट ते न दिसण्यामागे अनेक कारणं असू शकतात एक म्हणजे तुम्ही ते नीट वॉश केलेले नसतील. कदाचित तुमच्या केसांमध्ये अजूनही काही प्रमाणात तेलाचा अंश असेल ज्यामुळे ते असे विचित्र दिसत आहेत. किंवा तुम्ही तुम्ही केस वाळवण्यासाठी योग्य टेकनिकचा वापर करत नाही आहात. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की केस पुसण्याचा आणि केस खराब दिसण्याचा काय सबंध आहे. मात्र हे एक सत्य आहे की जर तुम्ही केस नीट पुसले नाहीत तर ते नीट सेट होत नाहीत.
धुतल्यानंतर तुम्ही केस कसे पुसता ?
केस धुतल्यावर बऱ्याचजणी केस फक्त मोकळे सोडून सरळ नैसर्गिकपणे म्हणजे वातावरणातील हवेवर वाळवतात. तर काही जणी ते पटकन सुकण्यासाठी बऱ्याचदा हेअर ड्रायर सारखे टूल्स वापरतात. अगदी साध्या पद्धतीने केस वाळवण्याची एक प्रचलित पद्धत म्हणजे टर्किशच्या टॉवेलने केस पुसणे. अंघोळ केल्यावर लगेचच आपण केस टॉवेलने गुंडाळून ठेवतो. कारण केसांमधून गळणारं पाणी चेहरा, मान आणि पाठीवर ओघळू लागतं जे कोणालाच आवडत नाही. यासाठी आपण मान खाली करून केसांवर टॉवेल गुंडाळून ठेवतो. इतर कामं करता करता तो टॉवेल केसांवर तसाच किती तरी वेळ गुंडाळून ठेवला जातो किंवा मग केस लवकर कोरडे करण्यासाठी ते रगडून पुसतो. मात्र असं टॉवेलने रगडून केस पुसणे अथवा बराच वेळ केसांवर टॉवेल गुंडाळून ठेवणं ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. ज्यामुळे वाळल्यावर तुमचे केस अतिशय विचित्र दिसू लागतात. रगडल्यामुळे ते कमजोर होतात आणि तुटू लागतात.
यासाठीच केस पुसण्यासाठी वापरा मायक्रो फायबर टॉवेल –
जर तुम्हाला तुमच्या केसांची योग्य निगा राखायची असेल आणि केस धुतल्यावर ते नीट दिसावे असं वाटत असेल. तर तुमच्या रेग्युलर टॉवेलऐवजी मायक्रोफायबर टॉवेल वापरा. ज्यामुळे तुमचे केस तर सुंदर दिसतीलच शिवाय केसांचे आरोग्यही सुधारेल. कारण मायक्रोफायबर टॉवेलमुळे तुमच्या केसांचे नुकसान होत नाही. केस सुकवताना ते या सॉफ्ट टॉवेलमुळे तुटत अथवा गळत नाहीत. या टॉवेलचा वापर केल्यावर तुम्हाला केस गळणे जवळजवळ पन्नास टक्के कमी झालेले जाणवेल. कारण यामध्ये जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्याची क्षमता असते.ज्यामुळे केसांचा गुंता कमी होतो आणि केस जास्त सुळसुळीत होतात. यासाठीच त्वरीत तुमचा टॉवेल बदला आणि केसांचे आरोग्य वाढवा.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं