चित्रपटांची आवड असो किंवा नसो पण तुम्ही काही चित्रपट हे पाहावे असे असतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये तुमचे काही प्लॅन नसतील तर तुम्ही तुमचा वेळ मस्त चित्रपट बघण्यात घालवा. कारण हे चित्रपट तुम्ही रिलीजच्यावेळी मिस केले असतील पण ते वर्ष संपण्याच्या आत पाहा म्हणजे तुम्ही हे चित्रपट आवर्जुन पाहाच.
मराठीतील ही नवीन गाणी तुम्ही ऐकलीत का? नाही..मग नक्की ऐका
1. सुपर 30 (Super30)
शिक्षक दिनाचं महत्त्व आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा हे सगळेच जाणातात. शिक्षणाचा हल्ली सगळ्यांनीच बाजार केला आहे. कोचिंग क्लासेसच्या वाढत्या फी सर्वसामान्य मुलांना परवडणाऱ्या नसतात. अशा मुलांना शिकवून त्यांना टॉप करण्याचा मानस यामध्ये दाखवण्यात आला आहे. हृतिक रोशनने यामध्ये गणिताच्या शिक्षकाची भूमिका साकारली असून तो लठ्ठ पगाराची नोकरी सोडून गरीब मुलांसाठी काम करतो.
2. गली बॉय ( Gully boy)
मुंबईसारख्या ठिकाणी गल्लीबोळात रॅप गाणारे आहेत. पण रॅप हे एक टॅलेंट आहे जे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ‘गली बॉय’ हा चित्रपट पाहायला हवा. ही गोष्ट खरी असून एका रॅपरची ही गोष्ट आहे. झोया अख्तरचा हा चित्रपट असून तुम्हाला लव्हस्टोरी व्यतिरिक्त काही वेगळे पाहायचे असेल तर तुम्ही हा चित्रपट अगदी हमखास पाहायला हवा. हा चित्रपट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.
3. कबीर सिंह ( Kabir singh)
तेलुगु चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चा हिंदी रिमेक म्हणजे कबीर सिंह… हिंदीमध्ये शाहीद कपूरने प्रमुख भूमिका बजावली असून ही एका अशा डॉक्टरची प्रेम कहाणी आहे. जो अतिशय रागीट आणि तापट आहे. आयुष्यातील प्रेमाच्या बाबतीत तो एक निर्णय घेतो. पण त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात घडणारा गोंधळ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या सगळ्यावर आधारीत हा चित्रपट आहे. जर तुम्हाला कोणी आधीच काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या असतील तर तुम्ही त्याचा विचार न करता एकदा तरी चित्रपट पाहा.
मराठीतील बहारदार लावण्या (Best Marathi Lavani Songs In Marathi)
4. उरी (URI)
2019 चा सगळ्यात जास्त कमाई केलेला चित्रपट होता उरी (URI). उरी येथे झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय सेना त्यांचे बंकर्स उद्धवस्त करते. त्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केले जाते. या सर्जिकल स्ट्राईकवर हा चित्रपट असून तुम्ही हा चित्रपट अगदी पाहायलाच हवा असा आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट होता.
5. हाऊसफुल 4 (Housefull 4)
आता तुम्हाला काही हलकी फुलकी कॉमेडी पाहायची असेल तर तुम्ही ‘हाऊसफुल4’ पाहायला हवा. त्यातील बाला हे गाणं फारच प्रसिद्ध झालं. या चित्रपटाची स्टोरी फारशी चांगली नसली तरी तुम्हाला हा चित्रपट खळखळून नक्कीच हसवण्यास समर्थ आहे.
6. आर्टिकल 15 (Article 15)
बलात्कार हा बलात्कार असतो. तो कोणत्याही महिलेवर झाला तरी तो गुन्हाच आहे. जातीच्या तराजूत सगळ्यांना तोलणाऱ्या एका गावाची ही सत्य घटना आहे. एका दलित समाजातील लहान मुलीवर बलात्कार केला जातो. पण तिची साधी तक्रारही नोंदवून घ्यायला कोणी तयार नसते. त्यातच या मुलीसोबत असलेली आणखी एक मुलगी हरवली आहे हे कळूनही पोलीस त्याचा तपास घेत नाही. आता या जातीला प्रथम स्थान देणाऱ्या समाजात एक असा पोलीस अधिकारी येतो तो या घटनेच्या मुळाशी जातो. कोणताही जातीभेद न पाळता तो याचा तपास घेतो तेच सांगणारी या चित्रपटाची कथा आहे.
7. बदला (Badla)
एका चुकीच्या गुन्ह्यात एका तरुणीला गुंतवू पाहणाऱ्यांना गरज असते एका चांगल्या वकिलाची. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट असून हा चित्रपट खूप काही सांगून जाणारा आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने हा चित्रपट पाहायला हवा. एकटं जगत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते. पण ही काळजी भीतीमध्ये न बदलता तुम्ही लढण्याची तयारी दर्शवणे फारच गरजेचे असते.
8. ड्रिम गर्ल ( Dream girl)
काहींच्या आवाजात जादू असते ते अगदी खरं आहे. याचे कारण असे की, ड्रिम गर्ल या चित्रपटातील मुख्य नायकाचा आवाज अगदी हुबेहूब मुलीसारखा असतो. नोकरीच्या शोधात असताना तो एका अशा कॉलसेंटरला लागतो जिकडे नॉटी टॉक होत असते. या नोकरीच तो इतका पैसा कमावतो की त्याचे दिवस बदलून जातात. पण हे काम करत असताना एकटया पडलेल्या पुरुषांना एका साथीदाराची गरज असते. हे सगळं करत असताना घडणारी कॉमेडी हसवणारी असली तरीसुद्धा यातून एक मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लुका छुपी (Luka chuppi)
लिव्ह-इन- रिलेशनशीपवर आधारीत ही स्टोरी असून यामध्ये घडणारी कॉमेडी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मुलीचे वडील राजकारणी असून त्यांना या गोष्टी अजिबात पटणाऱ्या नसतात. पण त्यांचीच मुलगी लिव्ह- इन- रिलेशनशीपमध्ये राहत असते हे कळल्यानंतर घडणारी कॉमेडी पाहण्यासारखी आहे.
10. दे दे प्यार दे (De De pyar de)
तुम्हाला थोडा रिलॅक्स आणि विनोदी चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही दे दे प्यार दे हा चित्रपट सुद्धा पाहायला हवा. थोड्या वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असून या मध्ये अजय देवगणला त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी प्रेम होतं. पण समाजासाठी ही गोष्ट गैर आहे. पण तरीही ही प्रेमाला वयाचे बंधन नसते तर दोघांकडूनही ती भावना असणे महत्त्वाचे असते हेच सांगणारा हा चित्रपट आहे.
वाचा – जागतिक हास्य दिनानिमित्त पाहा हे दर्जेदार मराठी कॉमेडी चित्रपट
11. जजमेंटल है क्या? (Judgemental hein kya?)
लहानपणी आई वडिलांचा होणारा मृत्यू पाहताच एका मुलीच्या डोक्यावर इतका परिणाम होतो की तिला अनेक गोष्टींमध्ये चुकीच्या गोष्टी दिसू लागतात. याचे दुष्परिणाम ती अनेकांचे आयुष्य उद्धवस्त करते. पण तिच्यासमोर आणखी एक खून होतो. तिला या मागे असणारी व्यक्तीही माहीत असते. पण तरीदेखील तिच्या या मेंटल कंडीशनमुळे कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही. पण ती आपल्या मतावर ठाम राहते आणि अचानक सगळ्या गोष्टी बदलतात. आता तुम्हाला कंगनाआवडत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा गोंधळात घालणारा चित्रपट वर्ष संपण्याआधी एकदा पाहाच.
आता तुम्ही जर चित्रपट पाहिले नसतील तर आताच हे चित्रपट पाहा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील हे चित्रपट पाहायला सांगा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje