Shoes

निऑन फुटवेअरचा ट्रेंड आहे हिट, नक्की करा ट्राय

Leenal Gawade  |  Dec 20, 2020
निऑन फुटवेअरचा ट्रेंड आहे हिट, नक्की करा ट्राय

फुटवेअरचा नवा ट्रेंड ट्राय करायला तुम्हाला आवडत असेल तर निऑन फुटवेअरचा नवा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून निऑन रंगाचे टॉप्स, जीन्स आणि हेअर क्लीप बाजारात दिसून आले आहेत. हे रंग कितीही गडद असले तरी या रंगाना पसंती मिळाली आहे. निऑन रंग हे कोणत्याही कॉम्प्लेक्शनवर उठून दिसतात. त्यामुळे या रंगाना पसंती मिळते. डिसेंबरचा महिना आला की, पार्टी आणि नवीन महिन्याचे वेध लागतात. याकाळात तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच काहीतरी चांगले आणि हटके असायला हवे. तुम्ही अद्याप निऑन रंगाचे कधीच काही वापरले नसेल आणि आता तुम्ही निऑन रंगाचे फुटवेअर निवडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर निवडू शकता.

फेस्टिव्ह सीझनसाठी तुमच्याकडे हवेत हे फुटवेअरचे पर्याय

यलो निऑन पार्टी पम्प्स

पार्टीसाठी निऑन रंग हे कायमच बेस्ट दिसतात. तुमच्या कोणत्याही पार्टीवेअरला उठावपणा आणण्याचे काम निऑन पम्प्स असतात. पम्प्स हे हिल्सचा एक असा प्रकार आहे जो पेन्सिल हिलमध्ये येतो. पण हे हिल्स हाय हिल्सच्या तुलनेत थोडे कमी असतात. त्यामुळे तुम्हाला ते इतरवेळी ऑफिसवेअरवर ही घालता येतात. हे रंग जरी गडद असले तरी देखील त्याचा एक वेगळा लुक आहे. जो तुम्ही योग्य स्टायलिंग केल्यानंतर निऑन पम्प्स वापरता येतात. हे यलो निऑन पम्प्सशिवायही तुम्हाला यामध्ये वेगळे रंग नक्कीच मिळतील.

निऑन कोल्हापुरी चप्पल्स

कोणत्याही ट्रेडिशनलेवअर घालता येणारा आणि उठून दिसणारा प्रकार म्हणजे कोल्हापुरी चपला. या कोल्हापुरी चपलामध्ये आतापर्यंत अनेक ट्रेंड दिसून आले आहेत. अगदी डिझायनर कोल्हापुरी चपलांचेही वेगवेगळे प्रकार तुम्ही या आधी पाहिले असतील. कोल्हापुरी चपलांमध्ये निऑन कोल्हापुरी चपला मिळत आहेत. निऑन रंगाच्या कोल्हापुरी चपला या हिल्स आणि फ्लॅट अशा दोन्ही प्रकारामध्ये मिळतात. तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही याची निवड करु शकता. 

नववधूसाठी परफेक्ट आहेत हे स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ (Footwear For Bride In Marathi)

निऑन स्पोर्टस शूज

स्पोर्टस शूज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही निऑन रंगाच्या शूजची निवड करु शकता. निऑन रंगाचे शूज दिसायला खूपच फॅन्सी दिसतात. तुम्हाला स्पोर्टस असलेला लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे स्पोर्टस शूज निवडू शकता. वेगवेगळ्या ब्रँडमध्ये आणि पॅटर्नमध्ये तुम्हाला असे निऑन स्पोर्टस शूज मिळतात. यामध्ये निऑन ग्रीन, निऑन पिवळा, निऑन पिंक आणि केशरी असे सुंदर रंग मिळतात. त्यामुळे तुम्ही हे स्पोर्टस शूज नक्कीच ट्राय करायला हवे.

निऑन फ्लीप फ्लॉप

फ्लीप फ्लॉप या सगळ्या चपला अनेकांना आवडतात. कारण त्या एकदम कुल दिसतात. फ्लिल फ्लॉप चपला या अगदी फ्लॅट असतात. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग मिळतात. फ्लिप फ्लॉप चपला या ट्रान्सपरंट आणि पायाला अधिक चांगल्या दिसतात. जीन्स- टिशर्टवर त्या अधिक उठून दिसतात. तुम्हाला त्या कधीही घालता येतात असे आहेत. तुम्हालाही अशा कुल चपला आवडत असतील तर तुम्ही अशा चपलांचीही निवड करु शकता.

 आता निऑन रंगाचे फुटवेअर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हा पर्याय नक्की निवडू शकता. 

 सतत टाचदुखी होत असेल तर करा हे घरगुती उपाय

Read More From Shoes